Current Affairs of 7 March 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 मार्च 2017)

चालू घडामोडी (7 मार्च 2017)

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. वायुनंदन :

  • दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक डॉ ई. वायुनंदन यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी डॉ वायुनंदन यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ वायुनंदन यांची नियुक्ती पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.
  • डॉ माणिकराव साळुंखे यांनी दिनांक 19 ऑगस्ट 2016 रोजी, नियत मुदतीपूर्वी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा राजीनामा दिल्ल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
  • आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.
  • डॉ वायुनंदन यांचा जन्म 18 डिसेम्बर 1957 रोजी झाला. तसेच यांनी हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून लोकप्रशासन या विषयात एम.ए., एम.फील., पीएच.डी. प्राप्त केली असून उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन संशोधनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 मार्च 2017)

ठाण्याच्या महापौरपदी मीनाक्षी शिंदे यांची निवड :

  • शिवसेना-भाजप युतीची 25 वर्षे सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेवर यंदा प्रथमच शिवसेनेची एकहाती सत्ता आली असून, ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
  • शिवसेनेचे नवनिर्वाचित शिलेदार महापौर-उपमहापौरपदी विराजमान होत आहेत. महापालिका मुख्यालयात हा पदग्रहण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार असल्याने अवघे ‘ठाणे’ शिवसेनामय झाले.
  • ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 131 पैकी 67 जागा जिंकून शिवसेनेने एकहाती विजय मिळवला.
  • महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचेच रमाकांत मढवी विराजमान झाले. 

अटारी सीमेवर सर्वांत मोठा भारतीय तिरंगा :

  • भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील अटारी सीमेवर येथे एक मोठा तिरंगा झेंडा फडकविण्यात आला आहे. हा देशातील सर्वांत मोठा तिरंगा असल्याचे सांगितले जाते. पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी या ध्वज स्तंभाचे उद्घाटन केले.
  • तसेच या ध्वजस्तंभाची उंची 110 मीटर (360 फूट), रुंदी 24 मीटर आणि वजन 55 टन आहे. रांचीतील 91.44 मीटर (300 फूट) उंच ध्वज स्तंभाला या ध्वजाने मागे टाकले आहे.
  • सीमेपासून 150 मीटर अंतरावर हा झेंडा स्थापन करण्यात आला आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथे जमणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी हा झेंडा आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
  • पंजाब सरकारच्या अमृतसर सुधार न्यास प्राधिकरणाने 3.50 कोटी रुपये खर्च करून ही योजना आकाराला आणली आहे.

स्पाईसजेटमध्ये महिला प्रवाशांसाठी आरक्षित जागा :

  • एअर इंडियानंतर आता स्पाईसजेटनेही एकट्याने प्रवास करणा-या महिलांसाठी आरक्षित जागा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बोईंग 737s आणि Q-400s ची चौथी रांग महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
  • संपुर्ण विमानातील बसण्याची व्यवस्था पाहता पुरुषांना खिडकीच्या बाजूची सीट देण्यात येणार आहे. महिलांना सर्व सेवांचा प्रथम लाभ मिळावा तसेच सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी पहिली आणि मधली सीट आरक्षित असणार आहे.
  • ‘एकट्याने प्रवास करणा-या महिलांनी कोणताही अडथळा किंवा त्रास होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या आणि मधील सीटमधून हालचाल करणे सुरक्षा आणि आणीबीणीच्या परिस्थितीत जास्त सोपे असते, त्यामुळे महिलांसाठी या जागा आरक्षित ठेवत आहोत’, असं स्पाईसजेटने म्हटले आहे.
  • महिलांसाठी आरक्षित जागा ठेवण्याची सुरुवात एअर इंडियाने केली. गतवर्षी 18 जानेवारीपासून एअर इंडियाने आंतरदेशीय विमानांमधील इकॉनॉमिक क्लासमध्ये एकट्याने प्रवास करणा-या महिलांसाठी एक रांग म्हणजेच सहा जागा आरक्षित ठेवल्या.

दिनविशेष :

  • सन 1771 मध्ये हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.
  • 7 मार्च 1983 रोजी नवी दिल्ली येथे सातव्या अलिप्त राष्ट्रपरिषदेस सुरुवात झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 मार्च 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.