Current Affairs of 8 March 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 मार्च 2017)

चालू घडामोडी (8 मार्च 2017)

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून ‘बडीकॉप’ ग्रुपची निर्मिती :

 • नोकरदार महिलांना विशेषतः आयटी आणि इतर कंपन्यांमध्ये कार्यरत महिलांना सुरक्षिततेबाबत कोणतीही अडचण आल्यास शहर पोलिस त्यांच्या मदतीला तातडीने धावून येणार आहेत. त्यासाठी पोलिसांनी ‘बडीकॉप’ हा ग्रुप सुरू केला असून, 40 महिलांच्या मागे एक यानुसार पोलिस कर्मचारी ‘बडीकॉप’ म्हणून नेमण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिली.
 • शहरात आयटी कंपन्यांमधील अंतरा दास आणि रसिला राजू या दोन अभियंता तरुणींचा खून झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
 • तसेच त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे.
 • हिंजवडी आयटी पार्कमधील कार्यक्रमात ‘वॉक विथ सीपी’ ही संकल्पना नुकतीच राबविण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त ‘बडीकॉप’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 मार्च 2017)

चीनचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत करार :

 • भारतीय क्रिकेट संघाला नवा प्रायोजक मिळाला आहे. चिनची मोबाइल निर्माती कंपनी OPPO मोबाइलने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत करार केला आहे.
 • पाच वर्षांसाठी हा करार करण्यात आला असून एप्रिल 2017 पासून याची सुरूवात होईल. बीसीसीआय आणि OPPO मध्ये 538 कोटींपेक्षा जास्तचा करार झाल्याचे वृत्त आहे.  
 • सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रायोजक असलेल्या स्टार इंडियाने दुस-यांदा प्रायोजकत्वासाठी बोली न लावण्याचा निर्णय घेतला होता.
 • स्टारसोबत 1 जानेवारी 2014 ला करार झाला होता. 31 मार्चला हा करार संपणार आहे. डिसेंबर 2013 मध्ये सहाराची स्पॉन्सरशिप संपल्यानंतर स्टार भारतीय संघाचे मुख्य स्पॉन्सर बनले होते.

महिलांच्या सुरक्षेसाठी नवी टोल फ्री दूरध्वनी सेवा सुरू :

 • सोशल मीडियाद्वारे महिलांचा मानसिक छळ करणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी बळ मिळावे यासाठी 8888809306 या टोल फ्री क्रमांकाची घोषणा करण्यात आली.
 • “नाना चुडासामा आय लव्ह मुंबई कमिटी”च्या वतीने हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला. भाजपच्या प्रवक्‍त्या शायना एन.सी. यांनी पुढाकारातून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
 • जागतिक महिला दिनाच्या आदल्या दिवशी आझाद मैदानातील ‘प्रेस क्‍लब’मध्ये झालेल्या कार्यक्रमात ही टोल फ्री दूरध्वनी सेवा सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले.
 • सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोदे आदी मान्यवरांनी या वेळी उपस्थित राहून लोकोपयोगी उपक्रमास पाठिंबा दर्शविला.

एअर इंडियाच्या विमानांमध्ये महिलाराज :

 • एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय महिला दिवस ऐतिहासिकदृष्ट्या साजरा केला आहे. एअर इंडियाने देशासह परदेशातील दहापेक्षा अधिक ठिकाणांना जोडणाऱ्या विमानांमध्ये सर्व महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करत महिला सामर्थ्याचे दर्शन घडवले आहे.
 • 26 फेब्रुवारीपासून 8 मार्चपर्यंत एअर इंडियाच्या 11 फेऱ्यांमध्ये फक्त महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यासोबतच हवाई उड्डाण क्षेत्राशी संबंधित असलेल्या, मात्र कधीही विमान प्रवास न केलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एअर इंडियाने दिल्ली ते आग्रा अशा हवाई प्रवासाचे आयोजन केले आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त या प्रवासाचे आयोजन करण्यात आले आहे.
 • एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच ऐतिहासिक कामगिरी करत इतिहास रचला आहे. एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याची कामगिरी करुन दाखवली आहे.
 • संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या एअर इंडियाच्या विमानाने दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली हे अंतर यशस्वीपणे कापत इतिहास रचला आहे. याआधी फक्त महिलांचा समावेश असलेल्या कोणत्याही विमानाने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केलेली नाही. या विक्रमी कामगिरीचा गौरव जागतिक महिला दिनाच्या निमित्तान करण्यात येणार आहे. यावेळी ऐतिहासिक कामगिरी करत इतिहास रचणाऱ्या एअर इंडियाच्या पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या विमानातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येईल.

जगभरातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत हैदराबाद प्रथम :

 • जगभरातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत हैदराबाद विमानतळाने अव्वल स्थान गाठले आहे. वर्षाला 50 लाख ते दीड कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या गटात हैदराबाद अव्वल स्थानी आहे.
 • तर वर्षाला चार कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या गटात दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळाने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
 • एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनलतर्फे (एसीआय) दरवर्षी जगभरातील सर्वोत्तम विमानतळांची निवड केली जाते.
 • विमानतळावर मिळणा-या सुविधेच्या (एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी -एएसआय) आधारे ही निवड केली जाते. यात विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येच्या आधारे विमानतळांची विभागणी केली जाते.
 • हैदराबादमधील जीएमआर आंतरराष्ट्रीय विमातळाने 2016 मधील जगातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. जीएमआर हैदराबाद आंतराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ एसजीके किशोर यांनी या यशाचे श्रेय केंद्र सरकार, सीआयएसएफ, विमान कंपन्यांना दिले आहे. हैदराबामधील विमानतळाला यंदा 9 वर्ष पूर्ण झाली आहेत.

दिनविशेष :

 • 8 मार्च 1948 रोजी सर्व संस्थाने भारतीय जिल्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आली.
 • सन 1975 पासून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 मार्च 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World