Current Affairs of 6 March 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (6 मार्च 2017)

चालू घडामोडी (6 मार्च 2017)

सुनीत जाधव ठरला दुसऱ्यांदा ‘भारत श्री’चा मानकरी :

 • पीळदार शरीरयष्टीच्या महाराष्ट्रीयन सुनीत जाधवने आपल्या लौकिकास साजेसे अप्रतिम प्रदर्शन करताना सलग दुसऱ्यावर्षी भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली.
 • महिला गटात मणिपूरच्या सरिता थिंगबैजमने पुन्हा एकदा बाजी मारली. दरम्यान, सांघिक गटात बलाढ्य रेल्वेने वर्चस्व कायम राखले असून महाराष्ट्र आणि सेनादलाला संयुक्तपणे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
 • गुरगाव येथील लेझर व्हॅलीत झालेल्या या स्पर्धेत प्रेक्षकांची प्रचंड प्रमाणात गर्दी केली. 4 मार्च रोजी झालेल्या अंतिम फेरीत रेल्वेच्या खेळाडूंचा भरणा अधिक होता.
 • गतविजेत्या सुनीतसह राम निवास, जावेद अली खान, महेश्वरन आणि सर्बो सिंग यांच्यामध्ये रंगतदार लढत झाली.
 • सात पोजेसनंतर सुनीत आणि राम निवासचे गुण समान झाले. अखेर कंपेरिझनमध्ये सुनीतने बाजी मारत ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’ पुरस्कारावर कब्जा केला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 मार्च 2017)

शस्त्रनिर्मितीत भारत तिसऱ्या क्रमांकावर :

 • जगाच्या पाठीवर सर्वाधिक शस्त्रनिर्मिती करणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 • सरकारी कंपनीच्या माध्यमातून सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारत प्रथम आहे.
 • मात्र, आता थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून खाजगी कंपन्यांनाही उत्पादन करण्याचे अधिकार दिले जात आहेत.
 • तसेच हे उत्पादन वापरण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारचाच राहणार आहे.
 • आधुनिकतेवर संरक्षण मंत्रालयाने लक्ष केंद्रित केल्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले.

नागपुरच्या महापौरपदी श्रीमती नंदा जिचकार :

 • नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार यांनी 82 मतांनी आणि दीपराज पार्डिकर यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळविला.
 • महापालिकेच्या निकालानंतर शहराच्या नव्या महापौर कोण? याविषयी सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना भाजपने पूर्णविराम देत भाजपने महापौर म्हणून नंदा जिचकार तर उपमहापौरपदासाठी दीपराज पार्डीकर यांची नावे निश्‍चित केली होती.
 • तसेच या झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत नंदा जिचकार यांनी 82 मतांनी विजय मिळविला. त्यांना एकूण 108 मते मिळाली. तर, काँग्रेसच्या स्नेहा नीकोसे यांना 26 मते आणि बसपाच्या वंदना चांदेकर यांना 10 मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत दीपराज पार्डिकर यांनी 80 मतांनी विजय मिळविला.

युएईला खाद्य पुरवठा करण्यासाठी भारताकडून सहकार्य :

 • भारत आणि संयुक्त अरब आमिराती(यूएई)चे संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहेत.
 • ऊर्जा क्षेत्रात सुरक्षेसाठी भारताच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं यूएईने उचललेल्या पावलाची सकारात्मक पद्धतीने भारत परतफेड करण्याच्या तयारीत आहे.
 • भारत संयुक्त अरब आमिराती(यूएई)साठी विशेष अशा शेतांची निर्मिती करणार आहे. यासाठी दोन्ही देश एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहेत.
 • अबूधाबीचे शहजाद्यांनी भारताचा दौरा केल्यानंतर दोन्ही देशांनी हा विचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 मध्ये अबूधाबीमध्ये जाऊन यूएईसोबत काही करार केले होते. त्यानुसारच जानेवारी 2017 मध्ये हा प्रकल्प करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे.

आता अ‍ॅसिड पीडितांना पाच लाखांची मदत मिळणार :

 • अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांना आता तीन लाखांऐवजी पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय आजच कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे.
 • आता खऱ्या अर्थाने समाजाने या पीडितांसोबत उभे राहण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 • राज्य महिला आयोगाने अ‍ॅसिड पीडितांविषयी सर्वंकष धोरण तयार करावे, राज्य शासन या धोरणाला निधी, कायदा अशा सर्व स्वरूपांत मदत करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
 • महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि ‘दिव्यज् फाऊंडेशन आयोजित सक्षमा : कॉन्फिडन्स वॉक’ हा कार्यक्रम वरळीतील ‘नॅशनल स्पोटर्स क्लब ऑफ इंडिया’ येथे पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
 • अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपींच्या शिक्षेचे स्वरूप अधिक कठोर करण्यात येईल, त्यासाठी कायद्यातही आवश्यक तरतूद करण्यात येणार आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 मार्च 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.