Current Affairs of 7 February 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 फेब्रुवारी 2017)

चालू घडामोडी (7 फेब्रुवारी 2017)

महाराष्ट्राच्या सुशिकलाला कांस्यपदक :

 • महाराष्ट्राची सुशिकला आगाशे केरळच्या अ‍ॅलिना रेजेने महिलांच्या ज्युनिअर टीम स्प्रिंट प्रकारात 36.643 सेकंदाची वेळ नोंदवून एशियन सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
 • भारतीय सायकलिंग महासंघाच्या वतीने नवी दिल्लीत यमुना वेलोट्रममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मूळच्या निलज गाव (जिल्हा भंडारा) येथील जिल्हा परिषदेच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या सुशिकलाने आणि अ‍ॅलिनाने प्रत्येकी 250 मीटरच्या या सायकल शर्यतीत कांस्यपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.
 • तसेच या प्रकारात चीनच्या संघाने 35.807 तर तैपेईच्या मुलींनी 36.623 सेकंदाची वेळ नोंदवून अनुक्रमे सुवर्णरौप्यपदक जिंकले. या प्रकारात प्रत्येक संघातील 2 सायकलपटूंनी 250250 मीटर अंतर पूर्ण करायचे असते.
 • भारतीय महिलांच्या 4 किलोमीटर टीम परस्युट प्रकारात मनोरमा, आबेदेवी, ऋतुजाअम्रिता पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेटीअरची निर्मिती करणार :

 • महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या गॅझेटीअर डिपार्टमेंट यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेटीअरची निर्मिती करण्यात येणार आहे. याविषयी नुकतीच दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादकसचिव डॉ.दिलीप बलसेकर यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व इतिहास संशोधकाची बैठक घेतली.
 • सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या गॅझेटिअरमध्ये एकूण 12 प्रकरणे आहेत. जिल्ह्याचा भूगोल, इतिहास, लोक राहणीमान, जीवनमान, उद्योगधंदे, कृषीजलसिंचन, प्रशासन, संस्कृती, प्रेक्षणीय स्थळे, सामाजिक सेवा या व अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकणारा संदर्भपूरक ग्रंथ असणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांच्या संबंधित विषयाच्या अनुषंगाने माहिती संकलन करून योगदान करावे, असे आवाहन गॅझेटिअर विभागाने केले आहे.
 • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड व किल्ले, तेथील बोलीभाषा, साहित्य, कविता, तेथील यात्रा व उत्सव या विषयावर समग्रपणे माहिती गॅझेटिअरमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा ग्रंथ निर्माण करण्याच्या दृष्टीने दर महिन्याला दुसऱ्या सोमवारी गॅझेटीअरसाठी नियुक्त केलेल्या सदस्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात येईल.
 • तसेच हे गॅझेटीअर सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगाच्या दृष्टीने केवळ पुस्तक रूपातच न राहता ई-बुक स्वरुपातही येणार आहे. त्यासाठी आवश्यक ध्वनीचित्रफित हे जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती डॉ.बलसेकर यांनी दिली.

व्दितीय राणी एलिझाबेथ यांची सफायर ज्युबिली :

 • ब्रिटिश राजवटीत सफायर ज्युबिली (65 वर्ष) पूर्ण करण्याचा मान राणी एलिझाबेथ व्दितीय यांना मिळाला आहे. इतक्‍या दीर्घ कालावधीसाठी सिंहासनावर राहण्याचा आणि राणीचा मुकुट मिरविण्याचा बहुमान मिळविलेल्या त्या जगातील पहिल्याच राणी ठरल्या आहेत.
 • नोरफोल्क येथील सॅण्ड्रिगहॅम इस्टेट या त्यांच्या निवासस्थानी खासगीरीत्या सफायर ज्युबिलीचा कार्यक्रम साजरा झाला. याचे औचित्य साधून बकिंगहॅम पॅलेसतर्फे राणींचे नीलम या मौल्यवान खड्यांचे दागिने घातलेले छायाचित्र पुन्हा जारी करण्यात आले.
 • 2014 मध्ये प्रसिद्ध छायाचित्रकार डेव्हिड बेली यांनी हे छायाचित्र काढले होते. त्या वेळी ब्रिटनला जगभरात नेण्यासाठी राबविलेल्या एका मोहिमेसाठी हे छायाचित्र काढण्यात आले होते. या चित्रात राणी एलिझाबेथ व्दितीय यांनी घातलेला हा नीलम खड्यांचा निळ्या रंगांचा हार त्यांचे पती किंग जॉर्ज सहावे यांनी 1947 मध्ये त्यांना लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून दिला होता.
 • तसेच या दिवशी 6 फेब्रुवारी 1952 ला राणी एलिझाबेथ व्दितीय यांचे वडील पंचम जॉर्ज यांचा मृत्यू झाला होता. या झालेल्या विशेष कार्यक्रमात ग्रीन पार्क येथे अश्‍व तोफखाना विभागाने 41 तोफांची सलामी दिली, तर तोफखाना विभागाने 62 तोफांची सलामी दिली. या कार्यक्रमाप्रसंगी निळ्या रंगाचे पाच पौंडच्या टपाल तिकिटाचेही अनावरण करण्यात आले.
 • राणींची पूर्ण नाव ‘एलिझाबेथ ऍलेक्‍झांडर मेरी’ असे आहे. त्यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी जन्म स्थळ लंडन येथे झाले.
 • तसेच त्यांची सत्ता कालावधी 6 फेब्रुवारी 1952 ते आजपर्यंत आहे. त्यांचा राज्याभिषेक 2 जून 1953 रोजी झाला.

अमित माळवदे ठरला ‘शिवथर श्री’चा मानकरी :

 • सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेनेकै. स्वा. किसनराव साबळे-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत साताऱ्याचा अमित माळवदे ‘शिवथर श्री’चा मानकरी ठरला.
 • या स्पर्धेचे उद्घाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच किरण साबळे-पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यामध्ये 50 ते 55 किलो वजनी गटात निवांत पाडळे, किरण मोरे, सुधीर गायकवाड, सिद्धेश शिवणकर, शुभम बनकर.
 • 55 ते 60 किलो वजनी गटात विश्वनाथ हिनकुले, प्रफुल्ल नायकवडी, विशाल निकम, गणेश कारंडे, किशोर बाबर. 60  ते 65 किलो वजनी गटात रामा मैनाक, प्रतीक काटकर, अमित गोडसे, विजय जाधव, सुजीत पोळ. 65 ते 70 किलो वजनी गटात फैय्याज शेख, सनी सय्यद, विक्रम करांडे, शुभम भोईटे, आकाश शेलार.
 • 70 ते 75 किलो वजनी गटात अमित माळवदे, वैभव जाधव, दिग्विजय डांगे, विशाल परिहार, हर्षल लोहार तसेच 75 च्या वरील वजनी गटात गौरव यादव, समीर शेख, वैभव गवळी, अभिजित पाडळे, राहुल निकम यशस्वी ठरले.

अमरावती पदवीधर मतदारसंघातून रणजित पाटील विजयी :

 • अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतमोजणीत भाजपाचे उमेदवार रणजित पाटील यांना 78 हजार 51 मते मिळालीत. विजयासाठी 61 हजार 992 मते आवश्यक असताना पाटलांना पहिल्याच फेरीत 16 हजार 60 मते अधिक मिळवीत एकतर्फी विजय प्राप्त केला.
 • अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजतापासून 30 टेबल्सवर मतमोजणीला सुरुवात झाली. यापूर्वी 3 फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण 1 लाख 33 हजार 982 मतदान झाले होते. यापैकी अवैध मते व नोटा वगळता उर्वरित मतांच्या निम्मे अधिक एक असा विजयी उमेदवाराचा कोटा असतो.
 • एकूण मतदानाची प्रत्येक टेबलवर हजार अशी 30 टेबलवर 30 हजार अशी मतमोजणी करण्यात आली.

दिनविशेष :

 • 7 फेब्रुवारी 1848 रोजी पुण्यातनगरवाचन मंदिराची स्थापना झाली.
 • महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना 7 फेब्रुवारी 2003 रोजी जाहीर.
 • 7 फेब्रुवारी 1938 हा भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेता एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्मदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.