Current Affairs of 6 February 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (6 फेब्रुवारी 2017)
भारताला ज्युनिअर स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद :
- हाँगकाँग अव्वल मानांकित भारतीय संघाने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना अंतिम सामन्यात मलेशियाला 2-0 असे पराजित करून ज्युनिअर स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत मुलांचे विजेतेपद पटकावले.
- एकतर्फी झालेल्या या लढतीत भारताने मलेशियाला पुनरागमनाची फारशी संधी दिली नाही. भारताच्या मुलांच्या संघाने दुसऱ्यांदा या स्पर्धेत बाजी मारली आहे.
- तसेच याआधी 2011 साली भारताच्या मुलांनी येथे जेतेपद उंचावले होते. कोलंबो येथे झालेल्या स्पर्धेत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धक्का देत आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.
- आशियाई वैयक्तिक आणि ब्रिटिश ज्युनिअर ओपन विजेत्या सेंथिलकुमारने मलेशियाचा व्दितीय मानांकित ओंग साई हुनला धक्का देत भारताचे विजेतेपद निश्चित केले.
Must Read (नक्की वाचा):
गुगल ठरला जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅंड :
- गुगलने प्रतिस्पर्धी टेक्नॉलॉजी कंपनी अॅपलला मागे टाकत जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅंड म्हणून आपले नाव कोरले आहे.
- ब्रॅंड फायनान्स या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार 2017 मध्ये गुगल सर्वात विश्वासार्ह आणि मौल्यवान ब्रॅंड बनला आहे.
- ब्रॅंड फायनान्सनुसार गुगलची किंमत 109.4 अब्ज डॉलर (7,194 अब्ज कोटी रुपये) आहे. वर्ष 2011 पासून अॅपल एक नंबरवर विराजमान होता. मात्र, यंदा गुगलने हे स्थान काबीज केले. आकड्यांनुसार गुगलने मागील वर्षीच्या तुलनेत गुगलने 24 टक्क्यांनी वाढ मिळवली आहे.
- अॅपलची ब्रॅंड व्हॅल्यू 145 अब्ज डॉलर होती यावर्षी ती 107 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. गेल्या वर्षी आयफोन 7 आणि 7 प्लस लाँन्च करुनही अॅपलची ब्रॅंड व्हॅल्यू कमी झाली.
- तसेच या सर्वेक्षणानुसार, तिसऱ्या स्थानावर अॅमेझॉन आहे, चौथ्या स्थानावर अॅटी अॅंड टी आहे, पाचव्या स्थानावर मायक्रोसॉफ्ट आणि सहाव्या स्थानावर सॅमसंग आहे.
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध भारताचा विजय :
- रामकुमार रामनाथन आणि युकी भांबरी या नव्या दमाच्या खेळाडूंनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताने वर्चस्व गाजवताना न्यूझीलंडचा 4-1 ने पराभव केला.
- 5 फेब्रुवारी रोजी रामकुमारने फिन टिअर्नीला सहजपणे पराभूत करताच भारताने 5 सामन्याच्या मालिकेत 4-1 ने विजयी आघाडी घेतली होती.
- म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस स्टेडियमवर आशिया-ओशनिया अ गटातील ही लढत झाली. परतीच्या पहिल्या एकेरीत रामकुमारने टिअर्नीचा प्रतिकार 7-5, 6-1, 6-0 ने संपवून लढतीचा फैसला भारताच्या बाजूने केला.
- रामकुमारने विजय मिळविताना भारतीय संघांतील खेळाडूंसह स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष केला.
शशिकला नटराजन तमिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री :
- तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शशिकला नटराजन यांची निवड 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत निश्चित झाली. सध्याचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी राजीनामा दिला असून, शशिकला यांना विधिमंडळाच्या नेत्या म्हणून निवडण्यात आले आहे.
- अण्णा द्रमुक पक्षाच्या अध्यक्षा जे. जयललिता यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते ओ. पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रीपदी तर पक्षाच्या सरचिटणीसपदी जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांची बहुमताने निवड झाली होती.
- शशिकला यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी पक्षाच्या आमदारांची मागणी होती. अखेर या झालेल्या पक्ष बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला गेला. पनीरसेल्वम यांनीच शशिकला यांची विधिमंडळ नेतेपदासाठी शिफारस केली. याला सर्व आमदारांनी मान्यता दिल्यानंतर त्यांना विधिमंडळाच्या नेत्या म्हणून निवडण्यात आले. या निर्णयामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.
- शशिकला यांनी मुख्यमंत्राच्या खुर्चीत विराजमान व्हावे, यासाठी लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांनीही पाठिंबा दिला होता. पक्षनेता व राज्याचा नेतेपदी एकच व्यक्ती असावी, अशी अपेक्षा थंबीदुराई यांनी गेल्या महिन्यात व्यक्त केली होती.
दिनविशेष :
- 6 फेब्रुवारी 1931 हा पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडिल पंडित मोतीलाल नेहरू यांचा स्मृतीदिन आहे.
- दादासाहेब फाळके यांचा ‘अयोध्येचा राजा (चित्रपट)’ हा पहिला मराठी बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात 6 फेब्रुवारी 1932 रोजी प्रदर्शित करण्यात आला.
- 6 फेब्रुवारी 2001 रोजी पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (7 फेब्रुवारी 2017)