Current Affairs of 4 February 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (4 फेब्रुवारी 2017)
2017 चे दीपस्तंभ फाऊंडेशन पुरस्कार जाहीर :
- दीपस्तंभ फाऊंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा दरवर्षी 12 जानेवारी युवक दिनानिमित्त करण्यात येते.
- राज्यातील महत्वाच्या पुरस्कारांपैकी एक अत्यंत महत्वाचा पुरस्कार म्हणून दीपस्तंभ पुरस्कार ओळखला जातो.
- या वर्षीचा दीपस्तंभ जीवनगौरव पुरस्कार हा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांना जाहीर झाला आहे. आपल्या प्रशासकीय अधिकारी म्हणून कारकिर्दीत सामान्य जनांसाठी अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
- विविध पदांवर काम करत असताना श्री. बोंगीरवार यांनी अनेक लोकहितैशी उपक्रम राबविले आहेत. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय सर्वसामान्य जनतेला सुखावह ठरणारे आहेत.
- तसेच या पुरस्काराचे वितरण 5 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 10 वाजता जळगाव येथील कांताई सभागृहात होणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
राज्यातील महापालिकांचे महापौर आरक्षण जाहीर :
- महाराष्ट्रातील 27 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढण्यात आली. त्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी (खुला) 16, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) 7, अनुसूचित जातींसाठी 3, अनुसचूति जमातीसाठी एक असे आरक्षण काढण्यात आले.
- 27 पैकी 14 महापालिकांमधील महापौरपद हे विविध प्रर्वगातील महिलांसाठी आरक्षित असेल.
- मंत्रालयात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर–म्हैसकर, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, मिरा भाईंदरच्या महापौर गीता जैन, पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.
- तसेच हे आरक्षण सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु असलेल्या महानगरपालिकासाठी असून उर्वरित महानगरपालिकांच्या महापौर पदाची मुदत संपल्यानंतर हे आरक्षण लागू होणार आहे.
चीनकडून प्रबळ क्षेपणास्त्र चाचणी :
- घातक शस्त्रांची निर्मिती करण्यात आघाडीवर असलेल्या चीनने एकाच वेळी 10 अण्वस्त्रे डागण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे.
- अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्यानंतर भविष्यात चीन आणि अमेरिका यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनने केलेल्या या क्षेपणास्त्र चाचणीला महत्त्व प्राप्त झालेले आहे.
- ‘द वॉशिंग्टन फ्री बिकन’च्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात चीनने एकाचवेळी दहा वेगवेगळ्या ठिकाणी मारा करण्याची क्षमता असलेल्या डीएफ-5 सी या क्षेपणास्त्राची चाचणी केली.
- शांक्शी प्रांतातील ताईयुआन अवकाश केंद्रावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. अशा प्रकारचे एमआयआरव्ही क्षेपणास्त्र दहा वेगवेगळ्या ठिकाणी डागता येते. यात अनेक अण्वस्त्रे ठेवण्याची क्षमता असते. तर पारंपरिक अण्वस्त्रे एका वेळी एकच लक्ष्यावर निशाणा साधू शकतात.
क्रोम ब्राऊझरच्या जुन्या व्हर्जनवर Gmail सपोर्ट बंद होणार :
- टेक्नॉलॉजीमधील दिग्गज गुगलने क्रोम ब्राऊझरच्या जुन्या व्हर्जनवर Gmail सपोर्ट बंद होणार असल्याची घोषणा केली आहे.
- Windows XP आणि Windows Vista या ऑपरेटिंग सिस्टिमवर Gmail वापरणा-यांवर याचा परिणाम होईल असंही गुगलने स्पष्ट केले. या वर्षाअखेरपर्यंत Gmail सपोर्ट सुरू असेल मात्र, त्यानंतर बंद होईल अशी घोषणा गुगलने केली.
- क्रोम व्हर्जन 53 किंवा त्याहून जुने व्हर्जनचे ब्राऊझर वापरणा-यांना 8 फेब्रुवारी 2017 पासून बॅनर नोटीफीकेशन दिसेल असे गुगलने सांगितले.
- जुन्या ओएस किंवा ब्राऊझरमध्ये सिक्युरिटी अपडेट मिळत नाही त्यामुळे त्यांना हॅक करणे सोप्पे असते म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
- सामान्यतः युजर्स ब्राऊझर्स अपडेट करतात त्यामुळे याचा सर्वाधिक परिणाम Windows XP आणि Windows Vista या ऑपरेटिंग सिस्टिमवर Gmail वापरणा-यांवर होणार आहे.
- जुन्या क्रोम व्हर्जनवर Gmail वापरलं तर हॅकिंगचा धोका वाढेल म्हणून ब्राऊझर अपडेट करण्यास आणि नव्या ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्याचं गुगलकडून आवाहन करण्यात आलं आहे.
दिनविशेष :
- प्लुटो हा ग्रह शोधणारे क्लाईड विल्यम टॉमबॉ यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1906 रोजी झाला.
- 4 फेब्रुवारी 1922 हा स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा जन्मदिन आहे.
- 4 फेब्रुवारी 1944 रोजी ‘चलो दिल्ली’ चा नारा देत आझाद हिंद सेनेनी दिल्लीकडे कूच केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा