Current Affairs of 3 February 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 फेब्रुवारी 2017)
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात :
- साहित्य सृजकांच्या वार्षिक सोहळ्यात राजकीय लुडबुड नको, असा अक्षय सूर उमटत असतानादेखील 3 फेब्रुवारी पासून डोंबिवलीत भरणाऱ्या 90 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात राजकीय मांदियाळी जमणार आहे.
- संमेलनाच्या उद्घाटन समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तर समारोप सत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहे.
- डोंबिवलीत प्रथमच साहित्य संमेलन होत असून, त्यासाठी पु.भा. भावे साहित्यनगरी सज्ज झाली आहे. शं.ना. नवरे यांच्या नावाने सजलेल्या मुख्य सभामंडपात सायंकाळी 4 वाजता या संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे यांच्या हस्ते होईल.
- मावळते संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी असहिष्णुतेचा मुद्दा मांडत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने गतवेळी संमेलनाध्यक्षांचे भाषण चर्चेत आले होते.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (2 फेब्रुवारी 2017)
टी-20 रँकिंगमध्ये विराट कोहली प्रथम स्थानी :
- विराट कोहली आयसीसी टी-20 फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. तसेच इंग्लंडला नमवणारा भारतीय संघ क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
- विराट कोहली दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचपेक्षा 28 गुणांनी पुढे आहे. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आहे.
- कोहली कसोटीत दुसऱ्या आणि वन डे क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. तो क्रिकेटच्या सर्वच स्वरूपात अव्वल तीनमध्ये असणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
- तसेच गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराह दुसऱ्या, तर इम्रान ताहीर त्याच्यापेक्षा 4 गुणांनी मागे आहे. आश्विन या यादीत आठव्या तसेच आशिष नेहरा 24व्या स्थानावर आहे.
‘ट्राय’कडून रिलायन्स जिओला क्लीनचिट :
- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (ट्राय) रिलायन्स जिओला क्लीनचिट देण्यात आली आहे.
- जिओची वेलकम ऑफर आणि हॅप्पी न्यू इअर ऑफर ही ट्रायच्या नियमांनुसारच आहे आणि यामुळे ट्रायच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन होत नसल्याचे ट्रायने म्हटले आहे.
- ‘ट्राय’ने रिलायन्स जिओला मोफत सेवा चालू ठेवण्यास परवानगी देऊन नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप इतर टेलिकॉम कंपन्यांकडून करण्यात आला होता.
- तसेच ट्राय याबाबत लवकरच एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांना कल्पना देणार आहे. या कंपन्यांनी जिओची वेलकम ऑफर 90 दिवसांनंतरही सुरू करण्याला आव्हान दिले होते. यापुर्वी अॅटर्नी जनरल यांनीही रिलायन्स जिओकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन होत नसल्याचे म्हटले होते.
अमेरिकेचे नवे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलर्सन :
- वॉशिंग्टनमधील एक्सॉन मोबीलचे माजी अध्यक्ष रेक्स टिलर्सन यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रिपदाची शपथ घेतली. सिनेटने सकाळी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश निश्चित झाला.
- व्हाईट हाऊसच्या ओव्हल हाऊसमध्ये शपथविधी समारंभ पार पडल्यानंतर बोलताना ते म्हणाले, “पश्चिम आशिया आणि भवतालच्या जगात प्रचंड आव्हाने आपल्यासमोर असली तरी अत्यंत बिकट काळात आपण शांतता आणि स्थैर्य मिळवू शकतो यावर माझा विश्वास आहे.”
- सिनेटने 56-43 अशा मतांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिल्यानंतर 64 वर्षीय टिलर्सन यांना उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. व्हाईट हाऊस आणि रिपब्लिक पक्षाच्या वतीने त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले.
नाशिकमधील पहिले कॅशलेस गाव चापडगाव :
- अती डोंगराळ भाग तसेच मोबाईलची रेंज कमी असतांना महाराष्ट्र बॅँकेचा पुढाकार व ग्रामस्थांची मानसिकता या व्दारे चापडगाव हे गाव नाशिक महसूल विभागातील पहिले कॅशलेस गाव ठरले असल्याचे उद्गार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी काढले. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या हस्ते एटीएम कार्ड व क्युआर कोड ग्रामस्थांना वितरित करण्यात आले.
- सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथे झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्यासह निफाडचे उपविभागीय अधिकारी महेश पाटील, महाराष्ट्र बॅँकेचे उपविभागीय व्यवस्थापक वसंत पाटील, बॅँक अधिकारी अशोक चव्हाण, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, शाखा व्यवस्थापक रवींद्र तनपूरे आदी उपस्थित होते.
- नोटाबंदीच्या निर्णयानंतर आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य दिले जावे यासाठी शासन स्तरावरुन उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
- कॅशलेस गाव त्याच उपक्रमातील एक भाग आहे. दापूरच्या महाराष्ट्र बॅँकेच्या शाखेने राबविलेल्या कॅशलेस गाव उपक्रमाची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी संवाद साधला.
- नाशिक महसूल विभागातील चापडगाव हे पहिले गाव ठरले असून त्यामुळे गावाची जबाबदारी वाढली आहे. दुर्गम भागात गावात अडचणी असून सुध्दा गाव कॅशलेस केले याबद्दल समाधान व्यक्त केले.
दिनविशेष :
- 3 फेब्रुवारी 1925 रोजी भारतातील पहिली विद्युत रेल्वे मुंबई ते कुर्ला या लोहमार्गावर सुरु झाली.
- भारतीय अर्थशास्त्री रघुराम राजन यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1963 रोजी झाला.
- 3 फेब्रुवारी 1832 हा महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा