Current Affairs of 7 December 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 डिसेंबर 2016)

चालू घडामोडी (7 डिसेंबर 2016)

‘एसएनडीटी’ला ‘टागोर लिटरसी पुरस्कार’ प्रदान :

  • महिलांना शिक्षण देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या एसएनडीटी महिला विद्यापीठाला 4 नोव्हेंबर रोजी ‘टागोर लिटरसी पुरस्कार 2014’ने लखनऊ येथील एका कार्यक्रमात गौरविण्यात आले.
  • महिला शिक्षणातील भरीव कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • नवी दिल्ली येथील भारतीय प्रौढ शिक्षा संघातर्फे ‘टागोर लिटरसी पुरस्कार’ दिला जातो.
  • 1987 पासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून 2014 साली हा पुरस्कार श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी अर्थात एसएनडीटी विद्यापीठाला जाहीर झाला.
  • हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त लखनऊ येथे भारतीय प्रौढ शिक्षा संघातर्फे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
  • तसेच या सोहळयादरम्यान उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. शशिकला वंजारी यांना प्रदान करण्यात आला.
  • भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांनी 1916 साली सुरू केलेल्या या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.

नॅशनल पार्क आता ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून जाहीर :

  • पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून जाहीर केला आहे.
  • मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशान्वये 59.46 चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी 19.25 चौरस किलोमीटर क्षेत्र वनजमिनीत येते. 40.21 चौरस किलोमीटर क्षेत्र बिगर वनजमीन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून किमान 100 मीटर आणि कमाल 4 किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे.
  • वनसंवर्धन, वन्यजीव संवर्धन करणे हे आदेश जारी करण्यामागील उद्देश असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

विश्वविद्यालयाच्या भौतिक विभागाला अब्दुस सलाम यांचे नाव :

  • पाकिस्तानचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते डॉ. अब्दुस सलाम यांचा सन्मान करीत पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एका विश्वविद्यालयाच्या भौतिक विभागाला त्यांचे नाव दिले आहे.
  • पाकिस्तानचे थोर वैज्ञानिक डॉ. अब्दुस सलाम यांना 30 वर्षांपूर्वी पदार्थविज्ञानातील नोबेल पुरस्कार मिळाला; परंतु ते अहमदिया पंथाचे असल्याने पाकिस्तान सरकारने त्यांना वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली.
  • कारण, पाकिस्तानमध्ये अहमदियांना कायद्याने गैरइस्लामी ठरविले गेले आहे. आता पाकिस्तान सरकारला उपरती झाली आहे.
  • पाकिस्तान सरकारच्या काईदे आझम केंद्रीय विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागास डॉ. अब्दुस सलाम यांचे नाव देण्याचा निर्णय पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केला आहे.

शिर्डीत आंतरराष्ट्रीय विश्वस्तांची परिषद :

  • शिर्डीतील साईबाबांनी घेतलेल्या समाधीला पुढील वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेतर्फे साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव वर्ष जागतिक स्तरावर साजले केले जाणार आहे.
  • तसेच या महोत्सवाच्या नियोजनासाठी संस्थानने नगर-मनमाड रोड येथील साईआश्रम भक्त निवासस्थान येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन 11 डिसेंबर रोजी केले आहे.
  • संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हावरे म्हणाले की, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव 1 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2018 या काळात साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनासाठी ही परिषद होईल.
  • परिषदेच्या माध्यमातून जगभरातील साई मंदिरांमध्ये सुरू असलेल्या साईबाबांच्या कार्याचा प्रचार व प्रसारामध्ये एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जाईल.

चतुरंग प्रतिष्ठानाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर :

  • ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव पुरस्कार यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे निवृत्त संचालक सदाशिव गोरक्षकर यांना जाहीर झाला आहे.
  • रंगसंमेलनात नृत्य कार्यक्रम, स्मरणिका निर्मिती, व्यासपीठ रचना, प्रेक्षागृह प्रांगण अशा अनेक माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची आभासी प्रतिमा-पार्श्वभूमी निर्माण केली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक कार्यकर्ता विद्याधर निमकर यांनी दिली.
  • रंगसंमेलनाचा रौप्यमहोत्सव मागील वर्षी मुंबईत गेट वे ऑफ इंडियासोबत चिपळूण, डोंबिवली आणि गोवा अशा चार ठिकाणी दिमाखात साजरा केला होता.
  • तसेच यंदापासून रंगसंमेलन वेगवेगळ्या शहरात पण बंदिस्त सभागृहात होईल.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.