Current Affairs of 8 December 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 डिसेंबर 2016)

चालू घडामोडी (8 डिसेंबर 2016)

राज्य सरकार काढणार ‘महावॅलेट’ योजना :

  • नोटाबंदीमुळे निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेता भविष्यात मोबाइल माध्यमातून कॅशलेस व्यवहार करण्यासाठी राज्य सरकार स्वत:चे ‘महावॅलेट’ काढणार आहे.
  • महावॅलेटव्दारे व्यवहार कसे करावे हे शिकविण्यासाठी कॅशलेस महाराष्ट्र व्हॉलेंटियर योजना राबविली जाईल. असे करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
  • तसेच या अंतर्गत एक हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशिक्षित केले जाणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार चो रामास्वामी कालवश :

  • ज्येष्ठ पत्रकार, अभिनेते, राज्यसभेचे माजी सदस्य आणि राजकीय टीकाकार चो रामास्वामी (वय 82 वर्ष) यांचे आजारपणामुळे 7 नोव्हेंबर रोजी निधन झाले. तसेच लोक प्रेमाने त्यांना चो अशी हाक मारत.
  • रामास्वामी ‘तुगलक’ या तामिळ नियतकालिकाचे संस्थापक संपादक होते. उपहासात्मक लेख लिहिणारे म्हणून ते ओळखले जात. अनेक चित्रपटांत अभिनयही केला आहे.
  • चरित्र अभिनेते, विनोदी नट, संपादक, राजकीय उपहासात्मक लेखन करणारे, तसेच नाटककार आणि संवादलेखक म्हणून त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले होते.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उत्कर्ष काळेला सुवर्णपदक :

  • आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या उत्कर्ष काळे आणि सागर लोखंडे यांच्यात गादी विभागात झालेल्या 65 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत उत्कर्ष काळेने एकेरीपटाचा डाव टाकून सागरला नमवित 60 व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपदमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पुण्याचे खाते उघडले.
  • तसेच हे दोन्ही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
  • सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुणे राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने वारजे येथील कै. रमेशभाऊ वांजळे क्रीडानगरीत सुरू झालेल्या या स्पर्धेत पुण्याच्या मल्लांनी झोकात सुरुवात केली.

डोनाल्ड ट्रम्प ठरले टाइम्स पर्सन ऑफ द इअर :

  • अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम मॅग्झिनने यंदाच्या वर्षीचे पर्सन ऑफ दी इयर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची घोषणा केली आहे.
  • मागच्या महिन्यात झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्य उमेदवार हिलरी क्लिटंन यांच्यावर मोठा विजय मिळवला होता.
  • पर्सन ऑफ द इअरच्या निवडीने आनंद झाला असून हा मोठा बहुमान आहे असे निवडीनंतर ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजशी बोलताना सांगितले.
  • ट्रम्प यांच्याबरोबर हिलरी क्लिंटन, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे सुद्धा टाइम पर्सन ऑफ द इअरच्या शर्यतीत होते.  

दिनविशेष :

  • 8 डिसेंबर हा जागतिक मतिमंद पुनर्वसन दिन आहे.
  • 8 डिसेंबर 1985 रोजी सार्क परिषदेची स्थापना झाली.
  • जगद्विख्यात नर्तक, उदयशंकर यांचा जन्म 8 डिसेंबर 1900 रोजी झाला.
  • 8 डिसेंबर 1942 हा भारतीय क्रिकेट खेळाडू, हेमंत कानिटकर यांचा जन्मदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.