Current Affairs of 6 December 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (6 डिसेंबर 2016)
मुख्यमंत्रीकडून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन :
- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभुमीवर जाऊन आंबेडकरांना अभिवादन केले.
- तसेच यावेळी त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि महापौर स्नेहल आंबेकरदेखील उपस्थित होते.
- महापरिनिर्वाण दिनानिमित्त, महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह, हिंदू कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक (कुर्ला) टर्मिनस येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
- अनुयायांसाठी पुरविण्यात येत असलेल्या नागरी सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकातर्फे करण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन :
- एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे 5 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वाजता निधन झाले.
- 68 वर्षीय जयललिता यांना 22 सप्टेंबररोजी ताप आल्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र 4 डिसेंबर रोजी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला.
- तसेच त्यांच्या निधनानंतर तामिळनाडू राज्य सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या कार्यकाळात सर्व शासकीय इमारतींवरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे.
मुंबई महापालिका बसविणार डॉप्लर रडार :
- मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यामुळे अखेर वेगाने चक्र फिरली असून, वेरावली उच्च जलाशय येथील जागेत अतिरिक्त डॉप्लर रडार बसविण्याचा निर्णय 5 डिसेंबर रोजी सुधार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
- मुंबईतील हवामानाचा अंदाज घेण्यासाठी कुलाबा येथे एक रडार कार्यरत आहे, परंतु मुंबई शहरातील गगनचुंबी इमारतींमुळे निरीक्षणात अडथळे येत आहेत. त्यामुळेच भारत मोसम विज्ञान विभागाचे दुसरे अतिरिक्त डॉप्लर रडार बसविण्यात येत आहे.
- 26 जुलै 2005 मध्ये आलेल्या पुरानंतर खबरदारी म्हणून अटलबिहारी दुवे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
- मिठी नदीचे रुंदीकरण, हवामानाचा आगाऊ अंदाज घेण्यासाठी अत्याधुनिक यंत्र बसविणे याचा याचिकेमध्ये समावेश होता. मात्र, महापालिकेने यावर वेळकाढू धोरण अवलंबिल्यामुळे न्यायालयाने नुकतेच आयुक्तांना फटकारले होते. त्यानंतर, तत्काळ हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
- भारत मोसम विज्ञान विभागाचे दुसरे डॉप्लर रडार बसविण्यासाठी चार आठवड्यांत जागा निश्चित करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहे.
तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम :
- जयललिता यांच्या निधनानंतर अवघ्या दीड तासात मध्यरात्री सव्वा वाजता ओ. पन्नीरसेल्वम यांचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.
- जयललिता यांच्या निधनाची घोषणा अपोलो हॉस्पिटलमधून 5 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वाजता झाली. त्यानंतर एआयएडीएमके पक्षाची तातडीची बैठक झाली.
- तसेच बैठकीनंतर आमदारांनी थेट राजभवन गाठले. तेथे राज्यपालांनी पन्नीरसेल्वम यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
- पन्नीरसेल्वम यापूर्वी दोनवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 2001 ते 2002 ही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा पहिली वेळ. त्यानंतर सप्टेंबर 2014 ते मे 2015 या काळात सर्वोच्च न्यायालयाने जयललिता यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केल्यावर हा कार्यभार पुन्हा पनीरसेल्वम यांच्याकडे आला.
भारत-अमेरिकेत सर्वात दृढ संबंध :
- भारत आणि अमेरिकेचे संरक्षण संबंध आतापर्यंतचे सर्वात दृढ संबंध आहेत, असे मत अमेरिकेचे संरक्षणमंत्री एश्टन कार्टर यांनी व्यक्त केले.
- कार्टर हे 8 डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे.
- कॅलिफोर्नियातील सिमी व्हॅली येथे बोलताना ते म्हणाले की, अमेरिका-भारत हे दोन देश सध्या ज्या प्रकारे सैन्य अभ्यास करीत आहेत तसे पूर्वी कधीही झाले नाही.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. भारतासोबत आम्ही व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही हातमिळवणी केली आहे.
- दरम्यान, कार्टर हे भारतासह जपान, बहरीन, इस्रायल, इटली आणि ब्रिटनचा दौरा करणार आहेत. याच दौऱ्यात ते संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि अन्य नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा