Current Affairs of 5 December 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (5 डिसेंबर 2016)

चालू घडामोडी (5 डिसेंबर 2016)

आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला संघ विजेता :

 • भारतीय महिला क्रिकेटपटूंनी 4 डिसेंबर रोजी आशिया कप स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखताना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानाचा पराभव केला आणि सहाव्यांदा विजेतेपदाचा मान मिळवला.
 • अनुभवी मिताली राजच्या नाबाद 73 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 5 बाद 121 धावांची मजल मारली. स्पर्धेपूर्वी मितालीकडून टी-20 संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. मितालीने मात्र चमकदार खेळी करीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
 • फलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत पाकिस्तानचा डाव 6 बाद 104 धावांत रोखला आणि संघाला 17 धावांनी विजय मिळवून दिला.
 • गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा फिरकीपटू एकता बिष्टने छाप सोडली. तिने चार षटकांत 22 धावांच्या मोबदल्यात 2 बळी घेतले. या स्पर्धेत भारताने दुसऱ्यांदा पाकिस्तानचा पराभव केला.
 • साखळी फेरीत भारताने पाच गडी राखून विजय मिळवला होता. भारतातर्फे या स्पर्धेत गोलंदाजीमध्ये एकताची कामगिरी सर्वोत्तम ठरली.
 • महिला क्रिकेटची कपिल देव समजली जाणारी झुलन गोस्वामी टी-20 (महिला) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये 50 विकेट घेणारी पहिली भारतीय महिला ठरली.

स्मार्ट सिटीतून वसई महापालिका बाद :

 • वसई-स्मार्ट सिटी अभियानात वसई विरार महापालिका चौदाव्या क्रमांकावर गेली आहे योजनेची अंमलबजावणी आणि नागरीकांचा सहभाग यात पालिकेला अवघे आठ गुण मिळाले आहेत.
 • प्रकल्पांची अयोग्यरित्या हाताळणी आणि सादर केलेल्या शहर विकासाच्या व्हिजन मध्ये प्रत्यक्ष नागरिकांचा सहभाग नसल्यामुळे वसई-विरार महापालिका स्मार्ट सिटीतून बाद झाली आहे.
 • स्मार्ट सिटी अभियानासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या निकषांच्या आधारे राज्यातील सर्वांधिक गुण मिळवणाऱ्या वीस शहरांचे प्रस्ताव पाठवले होते. त्यामध्ये वसई विरार महापालिकेचाही समावेश होता. त्यांना राज्य सरकारने निश्चित केलेल्या चार अतिरिक्त मुद्यांच्या अनुषंगाने सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली होती.
 • राज्यस्तरीय उच्चाधिकारी समितीने त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यातील नवी मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद या 10 महापालिकांची निवड निवड केली होती.
 • तसेच त्यामुळे उर्वरीत कोल्हापूर, नांदेड, उल्हासनगर, मीराभार्इंदर, चंद्रपूर, सांगली, इचलकरंजी,वसई-विरार ही शहरे स्मार्ट सिटीतून बाद ठरली.

भारताचे गोल्फर मुकेशला एशियन टूर किताब :

 • भारताचे अनुभवी गोल्फर 51 वर्षीय मुकेश यांनी ऐतिहासिक कामगिरी करीत येथील दिल्ली गोल्फकोर्सवर झालेल्या स्पर्धेत चार लाख डॉलर्स इनाम रकमेचा सहावा पॅनॉसॉनिक ओपन गोल्फ किताब जिंकला.
 • मुकेश यांचा हा पहिला एशियन किताब आहे. स्थानिक सर्किटमध्ये 120 हून अधिक विजेतेपद मिळवणाऱ्या मुकेश यांनी 51 व्या वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय किताब मिळवून इतिहास रचला आहे.
 • मुकेशने तिसऱ्या आणि अंतिम फेरीत दोन अंडर 70 चे कार्ड खेळून एकूण 10 अंडर 206 गुणांसह विजेतेपद आपल्या नावावर केले.
 • भारताच्या ज्योती रंधवा आणि राशिद खान यांनी 9 अंडर 207 च्या संयुक्त गुणांवर दुसरे स्थान पटकावले.

ज्युनिअर हॉकी संघाला विश्वचषकाची संधी :

 • भारतीय संघ मायभूमीत ज्युनिअर हॉकी विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. हा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असून भारतीय संघाला चांगली संधी आहे, असा विश्वास भारतीय संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांना आहे.
 • संघ दबावापुढे नतमस्तक होत नाही, तसेच त्यांच्यात सांघिक खेळ करण्याची क्षमता आहे, त्यामुळे भारतीय संघाकडून आशा केली जाऊ शकते.
 • एफआयएच ज्युनिअर हॉकी स्पर्धा लखनौ येथे 8 ते 19 डिसेंबरदरम्यान होणार आहे. यामध्ये यजमान भारतासह 16 संघ सहभागी होत आहेत.
 • भारत कॅनडा, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यासोबत ‘ड’ गटात आहे.
 • 15 वर्षांपूर्वी एकमेव ज्युनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाबद्दल हरेंद्र यांनी पूर्ण विश्वास दाखविला.

दिनविशेष :

 • 5 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन म्हणून साजरा करतात.
 • क्रिस्टोफर कोलंबसने हिस्पॅनियोला बेटावर 5 डिसेंबर 1492 रोजी पाय ठेवला व नव्या जगात पाउल ठेवणारा पहिला युरोपियन ठरला.
 • 5 डिसेंबर 2013 हा दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष व राष्ट्रपिता नेल्सन मंडेला यांचे स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.