Current Affairs of 7 August 2015 For MPSC Exams

Current Affairs 7 August 2015

चालू घडामोडी (7 ऑगस्ट 2015)

पद्‌मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कारांची घोषणा :

 • औद्योगिक, सांस्कृतिक समूहातर्फे देण्यात येणाऱ्या पद्‌मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य, जीवनगौरव, नाट्यकला, कलागौरव, समाजप्रबोधन पुरस्कारांची घोषणा गुरुवारी Vikhe Patilकरण्यात आली.
 • त्यात ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना जीवनगौरव आणि डॉ. रवींद्र शोभणे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर झाला.
 • तसेच उत्कृष्ट साहित्य पुरस्कारासाठी डॉ. शोभणे यांच्या “अश्‍वमेध” या कादंबरीची निवड करण्यात आली.
 • “कलागौरव पुरस्कार” शाहीर संभाजी भगत यांना, तर “समाजप्रबोधन पुरस्कार” बद्रिनाथ महाराज तनपुरे यांना जाहीर झाला आहे.
 • याचबरोबर “नाट्यसेवा पुरस्कार” श्रीनिवास भणगे यांना तर श्रीरामपूर येथील एकनाथ ढोणे यांच्या “लोकहितवादींची शतपत्रे” या समीक्षाग्रंथाला नगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर झाला.
 • प्रवरा परिसरातील एका साहित्यिकाला उत्कृष्ट साहित्य पुरस्कार दिला जातो. त्यासाठी संजीव तनपुरे (राहुरी) यांच्या “लपवलेली वही” या पुस्तकाची निवड करण्यात आली.
 • पद्‌मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्ट रोजी प्रवरानगर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
 • पुरस्कारांचे मानकरी :
 • विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार : डॉ. सुधीर रसाळ (एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह)
 • विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार : डॉ. रवींद्र शोभणे (51 हजार रुपये व स्मृतिचिन्ह)
 • विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार : शाहीर संभाजी भगत (25 हजार रुपये व स्मृतिचिन्ह)
 • विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय समाजप्रबोधन पुरस्कार : बद्रिनाथ महाराज तनपुरे (25 हजार रुपये व स्मृतिचिन्ह)
 • विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार : श्रीनिवास भणगे (25 हजार रुपये व स्मृतिचिन्ह)
 • विठ्ठलराव विखे पाटील नगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार : एकनाथ ढोणे (10 हजार रुपये व स्मृतिचिन्ह)
 • विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा परिसर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार : संजीव तनपुरे (सात हजार रुपये व स्मृतिचिन्ह)
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2015)

मंगळावरील खडकावर खेकडा आढळल्याचा दावा :

 • मंगळावरील खडकावर खेकडा आढळल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे.
 • एलियन्सचा शोध घेणाऱ्या वेबसाईटवर मंगळावरील खेकड्याची आकृती दिसत असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 • वेबसाईटवरील छायाचित्रात मंगळावरील एका विशाल खडकाच्या मध्यभागी खेकड्यासारखी आकृती दिसत आहे.
 • वेबसाईटवर टाकलेले हे छायाचित्र नासाच्या मार्स क्युरिऑसिटी रोव्हर या मंगळावर असणाऱ्या यानाने घेतले आहे.

दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने 296 शहरांमध्ये फोर-जी नेटवर्कची सेवा केली उपलब्ध :

 • दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने गुरुवारी देशातील 296 शहरांमध्ये फोर-जी नेटवर्कची सेवा उपलब्ध केली.

  4G

 • ही सेवा उपलब्ध करायच्या आधी काही मोजक्या शहरांत कंपनीने पाहणी केली होती.
 • याआधी एअरटेलने 2012 मध्ये देशात पहिल्यांदा कोलकात्यात फोर-जी सेवा उपलब्ध केली होती.

बिल गेट्‌स जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत :

 • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि विश्‍वविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्‌स जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या व्यक्तींच्या यादीत आले आहेत.

  bill

 • जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्ब्जने जाहीर केली आहे.
 • यामध्ये बिल गेट्‌स प्रथम क्रमांकावर आहेत.
 • तसेच फोर्ब्जने 5 ऑगस्टला जाहीर केलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंतांच्या यादीत शंभर व्यक्तींपैकी जवळजवळ 51 व्यक्ती या अमेरिकेतील आहेत, तर 33 व्यक्ती या आशियातील आणि 8 युरोपमधील आहेत.
 • या शंभर व्यक्तींची एकूण संपत्ती 842.9 अब्ज डॉलर इतकी असल्याचे या यादीत म्हटले आहे.
 • यामध्ये बिल गेट्‌स यांची संपत्ती 79.6 अब्ज डॉलर इतकी आहे, तर त्यांच्यापाठोपाठ ओरॅकलचे संस्थापक लॅरी इल्लीसन यांचा नंबर असून त्यांची संपत्ती 50 अब्ज डॉलर इतकी आहे.

  तिस-या नंबरवर अमॅझोनचे जेफ्फी बेझोस असून त्यांची संपत्ती 47.8 अब्ज डॉलर आहे.

 • सोशल मिडियात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या संकेतस्थळाचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्गसुद्धा चौथ्या क्रमांकार आहेत.
 • मार्क झुकरबर्गची संपत्ती 41.2 अब्ज डॉलर आहे.
 • यानंतर  या यादीत गुगलचे लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन आणि अलीबाबाचे अध्यक्ष जॅक मा यांचाही समावेश आहे.
 • तसेच काही दिवसापूर्वी फोर्ब्जने सर्वाधिक श्रीमंत दाम्पत्य म्हणून बिल गेट्‌स व त्यांच्या पत्नी मेलिंडा यांचे नाव जाहीर केले होते.

दिनविशेष :

 • टर्क्स व कैकोस द्वीप मुक्ती दिन
 • 1947 : मुंबई महापालिकेने बेस्ट कंपनी आपल्या अधिकारात घेतली.

  Ravindrnath Tagore

 • 1960 : कोट दि आयव्होरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • 1965 : सिंगापुरची मलेशियामधून हकालपट्टी.
 • 1973 : व्हायकिंग 2 हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले.
 • 1991 : सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध.
 • 1941 : रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता यांचा मृत्यू.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.