Current Affairs of 6 August 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2015)
बांधकाममंत्री चर्चिल अल्माओ यांना अटक :
- लुईस बर्गर लाचखोरी प्रकरणी गोव्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल अल्माओ यांना अटक करण्यात आली आहे.
- गोव्यात चर्चेत असलेल्या लुईस बर्गर लाचखोरी प्रकरणात गोवा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चर्चिल अल्माओ यांना रात्री साडेदहाच्या सुमारास दक्षिण गोव्यातील अगासीम येथून अटक करण्यात आली आहे.
- गोव्यातील पाईपलाईन प्रकल्पासाठी अमेरिकन कंपनी लुईस बर्गरने एका मंत्र्याला लाच दिल्याचा आरोप होता.
- या प्रकरणात चर्चिल अल्माओ आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच नावही पुढे आले होते.
न्यायाधीशांच्या निवृत्तिवेतन लाभातील त्रुटी सरकारने केल्या दूर :
- उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तिवेतन लाभातील त्रुटी सरकारने दूर केल्या आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला.
- त्याचप्रमाणे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी दूरसंचार कंपनीच्या टॉवर्सची देशभरातील व्याप्ती पाहता या टॉवर्सची स्वतंत्र कंपनी तयार करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिली.
- तसेच निवृत्तिवेतनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी आदेश दिला होता.
- त्यानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना निवृत्तिवेतनाचे लाभ देताना त्यांच्या दहा वर्षे वकिलीच्या अनुभवाचाही यापुढे विचार केला जाईल.
- तसेच मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आहे त्या स्वरूपात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.
Must Read (नक्की वाचा):
सरकारची टॉवर्सची स्वतंत्र कंपनी स्थापण्याची तयारी :
- “बीएसएनएल”च्या टॉवर्सची संख्या आणि त्यातून संभाव्य महसूलप्राप्तीचा अंदाज या आधारे सरकारने टॉवर्सची स्वतंत्र कंपनी स्थापण्याची तयारी चालविली आहे.
- देशभरात “बीएसएनएल”चे 65 हजार टॉवर्स असून, या माध्यमातून सरकारी कंपनीला वार्षिक दोनशे कोटी रुपयांचा महसूल मिळतो.
- मात्र टॉवर्सची स्वतंत्र कंपनी तयार केल्यानंतर हा महसूल दोन हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा दूरसंचार खात्याचा अंदाज आहे.
- त्या पार्श्वभूमीवर या भावी कंपनीची रचना, मनुष्यबळ आणि आर्थिक गुंतवणूक याबाबत सुस्पष्टता यावी यासाठी दूरसंचार मंत्रालयाला आंतरमंत्रालयीन गट तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
- ही टॉवर कंपनीतील गुंतवणूक आठ ते दहा हजार कोटी रुपयांची असू शकते.
इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नलला 101 वर्षे पूर्ण :
- जगभरातील वाहतुकीस शिस्तीचे वळण लावणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नलला आज 101 वर्षे पूर्ण झाली.
- नेटविश्वातील आघाडीचे सर्च इंजिन असणाऱ्या गुगलनेही आपल्या होमपेजवर अनोख्या पद्धतीने या ऐतिहासिक घटनेचे स्मरण केले आहे.
- लिस्टर वायर या उटाह प्रांतातील सॉल्टलेक सिटी शहरातील पोलिसाने सर्वप्रथम 1912 मध्ये इलेक्ट्रिक ट्रॅफिक लाइटचा शोध लावला होता.
- याच सिग्नलमध्ये सर्वप्रथम लाल-हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला होता.
- तसेच पुढे 5 ऑगस्ट 1914 मध्ये अमेरिकी ट्रॅफिक सिग्नल कंपनीने ओहियो प्रांतातील क्लेव्हलॅंडमध्ये “ईस्ट-105 स्ट्रीट अँड युक्लिड अव्हेन्यू” येथील चौकामध्ये सर्वप्रथम सिग्नल यंत्रणा
- बसविली होती.
- यामध्ये लाल आणि हिरव्या रंगाच्या लाइट्सच्या चार जोड्या होत्या तसेच त्याला विद्युत पुरवठा करण्याचे काम नियंत्रण कक्षात नेमण्यात आलेले कर्मचारी करत असत.
आरबीआयचे पतधोरण जाहीर :
- रोख निधी गुणोत्तर (सीआरआर) – 4 टक्के
- वैधानिक तरलता गुणोत्तर (एसएलआर) – 21.50 टक्के
- रेपो दर – 7.25 टक्के
- रिव्हर्स रेपो दर – 6.25 टक्के
- बँक रेट – 8.25 टक्के
- मार्जिनल स्टँडींग फॅसिलीटी – 8.25 टक्के
राष्ट्रीय हातमाग दिवस :
- हातमागावर तयार होणाऱ्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी तसेच, या वस्तूंची मागणी वाढावी यासाठी केंद्र सरकारतर्फे 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.
- या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया हँडलूम या ब्रँडचे अनावरण करणार आहेत.
- या दिवशी 1905 मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली होती.
- त्याचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा होणार असून याचा पहिला मोठा कार्यक्रम चेन्नईमध्ये होईल.
ओबामाज क्लीन पॉवर प्लॅन :
- औष्णिक विद्युत केंद्रांमधून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी महत्त्वाकांक्षी धोरण जाहीर केले आहे.
- ‘ओबामाज क्लीन पॉवर प्लॅन’ या नावाने हे धोरण ओळखण्यात येत आहे.
- हवामानातील बदलावर पॅरिस येथे चर्चा होणार असून, त्या दृष्टीने वातावरणनिर्मिती करण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे मानण्यात येते.
- ‘अमेरिकेच्या वीज प्रकल्पांमधून 2030 पर्यंत कार्बनी वायूंचे प्रदूषण 32 टक्क्यांनी कमी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.
- या धोरणामध्ये कार्बनी वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी पावले उचलण्याबरोबरच दरडोई उर्जेच्या वापराविषयीही विचार करण्यात आला आहे.
- यामध्ये अपारंपरिक उर्जा आणि किमान खर्चात जास्त उर्जा देणाऱ्या यंत्रणांचा वापर करणाऱ्या राज्यांना जास्तीत जास्त सवलती देण्याचा उल्लेखही या धोरणामध्ये करण्यात आला आहे.
दिनविशेष :
- 1945 : हिरोशिमा, नागासाकी या जपानच्या शहरावर अमेरिकेने पहिला परमाणुबॉब टाकला.