Current Affairs of 6 September 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2016)

चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2016)

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल :

  • रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ते रिझर्व्ह बँकेचे 24 वे गव्हर्नर आहेत.
  • रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांचा कार्यकाळ 4 सप्टेंबरपासून गृहीत धरला जाईल.
  • जानेवारी 2013 पासून ते रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर आहेत. तसेच त्यांचा पहिला कार्यकाळ संपल्यानंतर 11 जानेवारी 2016 रोजी त्यांची डेप्युटी गव्हर्नरपदी 3 वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली होती.
  • 20 ते 25 अब्ज डॉलरच्या निधीची मुक्तता करणे, पतधोरण समितीची संकल्पना राबविणे आणि बँकांचा व्यवहार स्वच्छ करणे ही त्यांच्या समोरील काही प्रमुख आव्हाने आहेत.
  • डेप्युटी गव्हर्नर असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे विभाग हाताळले आहेत.
  • पतधोरण ठरविण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे ते प्रमुख होते.
  • ब्रिक्स देशांच्या केंद्रीय बँकांत समन्वय निर्माण करण्यासाठी करण्यात आलेल्या आंतर-शासकीय करार आणि आंतर-केंद्रीय बँक कराराच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
  • ऊर्जित पटेल यांनी अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सेवेत होते.
  • 1996 ते 1997 या काळात ते नाणेनिधीतून रिझर्व्ह बँकेत प्रतिनियुक्तीवर आले. या काळात त्यांनी कर्ज बाजार, बँकिंग सुधारणा, पेन्शन सुधारणा आणि विदेशी चलन वाढविण्याबाबत त्यांनी रिझर्व्ह बँकेला बहुमोल सल्ला दिला.

पुण्यामध्ये देशातील पहिले ‘इनोव्हेशन हब’ :

  • स्मार्ट सिटी योजनेतील सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या गरजेप्रमाणे तंत्रज्ञानाधारित उत्पादने व सेवा देणाऱ्या स्टार्ट अप्सचा देशातील पहिलाच ‘इनोव्हेशन हब’ पुणे शहरात स्थापन होणार आहे.
  • ब्रिटनमधील तज्ज्ञांचे उच्चस्तरीय पथक या कामासाठी नोव्हेंबर महिन्यात दौऱ्यावर येणार असून, जुलैपर्यंत हब कार्यान्वित केले जाईल, अशी घोषणा महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी (दि.3) केली.
  • वर्षभरामध्येच स्टार्ट अप्ससाठी पोषक व पूरक वातावरण (इकोसिस्टिम) तयार करण्याचे प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहेत.
  • तसेच यानुसार 2020 पर्यंत शहरामध्ये स्टार्ट अप्सच्या माध्यमातून 50 हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
  • आयआयटी कानपूरच्या अलुमनाय असोसिएशनतर्फे आयोजित ‘स्टार्ट अप मास्टर क्‍लास’ परिषदेमध्ये ‘स्मार्ट सिटी आणि स्टार्ट अप्स’ या विषयांवरील चर्चासत्रात सुरू होते.
  • तसेच या प्रसंगी नॅसकॉम फाउंडेशनचे अध्यक्ष5 एफ वर्ल्डचे संस्थापक गणेश नटराजन उपस्थित होते.

‘सुपरसॉनिक’ विमानाद्वारे उपग्रहाचे प्रक्षेपण :

  • आवाजाच्या वेगाच्या दुप्पट वेगाने उड्डाण करण्याचा पहिला मान प्राप्त झालेले ‘लॉकहीड एफ-104’ हे लढाऊ विमान 50 वर्षांच्या सेवेनंतर निवृत झाली असली तरी लवकरच त्यांची दुसरी ‘इनिंग’ सुरू होत आहे.
  • तसेच या ‘सुपरसॉनिक‘ विमानाचा वैमानिकांना प्रशिक्षणासाठी उपयोग होत असला, तरी ही विमाने लवकरच अवकाशात लहान आकाराचे उपग्रह पाठविण्यासाठी सज्ज होत आहेत.
  • 2018 मध्ये अशा प्रकारचे पहिले उड्डाण अपेक्षित आहे.
  • तब्बल पन्नास वर्षांच्या सेवेनंतर 2004 मध्ये ही विमाने निवृत्त झाली असली, तरी या विमानातून लहान आकाराचे उपग्रह अवकाशात पाठविण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे.
  • भारत-पाक युद्धातही सहभाग –
  • अमेरिकी हवाई दलात सहभागी झाल्यानंतर ‘एफ-104’ विमानांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
  • व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने या विमानांचा वापर केला होता; तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1971च्या युद्धात ‘मिग-21’ या रशियन बनावटीच्या विमानांनी ‘एफ-104’पेक्षा सरस कामगिरी केली.
  • भारताच्या ‘मिग-21’ लढाऊ विमानांनी कुठलेही नुकसान न होऊ देता पाकिस्तानी हवाई दलाची तब्बल चार ‘एफ-104’ विमाने पाडली होती.
  • तसेच युद्धानंतर दुरुस्तीचा खर्च वाढत गेल्यामुळे पाकिस्तानी हवाई दलातून ‘एफ-104’ विमानांना निवृत्ती जाहीर करण्यात आली होती.
  • पहिलेच ‘सुपरसॉनिक’ विमान –  
  • लॉकहीड कंपनीने अमेरिकेच्या हवाई दलासाठी ‘एफ-104’ ‘सुपरसॉनिक’ विमानांची निर्मिती केली.
  • 1958 ते 2004 या काळात सुमारे डझनभर देशांच्या हवाई दलांमध्ये या विमानांचा समावेश करण्यात आला होता.
  • तसेच या विमानाचे डिझाईन केली जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील ‘टीम’ने केले होते. या पुढे जॉन्सनने ‘एसआर-71 ब्लॅकबर्ड’ या जगातील सर्वांत वेगवान विमानाचे डिझाईन केले होते.
  • ‘एफ-104’ प्रकारच्या एकूण 2 हजार 578 लढाऊ विमानांची निर्मिती करण्यात आली आहे.

लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान :

  • ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या सिंहगर्जनेची शताब्दी आणि ही सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचे 160वे जयंती वर्ष, त्याबरोबरच पुढील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाला होणारे सव्वाशे वर्ष या निमित्ताने लोकमान्य टिळक यांची जीवनगाथा, कार्य नव्या पिढीसमोर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ आणि लोकमान्य उत्सवाचे आयोजन केले आहे.
  • लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ ही सिंहगर्जना करून ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला आणि देशाला स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित केले, त्या सिंहगर्जनेचेदेखील हे शताब्दी वर्ष आहे.
  • तसेच या सगळ्या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून राज्य शासनाने लोकमान्य टिळकांची जीवनगाथा आणि कार्य जनतेपर्यंत विशेषत: युवा पिढीसमोर आणण्यासाठी ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ आणि ‘लोकमान्य’ उत्सवाचे आयोजन केले आहे.
  • लोकमान्य महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांतून सामाजिक एकोपा टिकवून, तो वृद्धिंगत करण्याचा उद्देश आहे.
  • लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान हे यंदाच्या गणेशोत्सवात राबविण्यात येणार आहे.
  • सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचे विचार, त्यांची चतु:सूत्री, तसेच समाजामध्ये जनजागृती घडविणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे.
  • तसेच या स्पर्धेत भाग घेण्याकरिता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव, व्यसनमुक्ती आणि जलसंवर्धन यापैकी एका विषयावर देखावा तयार करावा लागणार आहे.

जागतिक गिधाड संवर्धन दिन :

  • फणसाड अभयारण्यामध्ये (दि.3) जागतिक गिधाड संवर्धन दिन कार्यक्रमाचे आयोजन फणसाड वनपरिक्षेत्र विभागातर्फे करण्यात आले होते.
  • फणसाड अभयारण्य जंजिराच्या नवाबाचे संरक्षित वनक्षेत्र होते त्यामुळे येथे शेकडो वर्षे वनसंपदेचे जपवणूक झाली आहे.
  • आता तेच वनक्षेत्र फणसाड अभयारण्य म्हणून विकसित झालेले आहे. याठिकाणी हजारो पर्यटक वर्षभर येत असतात, जीवशास्त्राचे अभ्यासक याठिकाणी त्यांच्या परीक्षणासाठी येतात.
  • तसेच याठिकाणी गेली दहा-बारा वर्षे गिधाडांचे यशस्वी संवर्धन झालेले आहे.
  • फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.आय. तडवी यांनी या जागतिक गिधाड संवर्धन दिनाचे आयोजन केले होते.

दिनविशेष :

  • 1620 : प्लिमथ, इंग्लंड येथून मेफ्लॉवर जहाजाचा प्रवास सुरू झाला.
  • 1888 : चार्ल्स टर्नरने एकाच मोसमात 250 क्रिकेट बळी घेण्याचा विक्रम रचला.
  • 1980 : मुंबईचे पूरक बंदर म्हणून न्हावाशेवा बंदरास सरकारने मंजुरी दिली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.