Current Affairs of 7 September 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2016)

चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2016)

शांती सेनेच्या परिषदेत सुभाष भामरे भारताचे प्रतिनिधी :

 • संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शांती सेनेची आंतरराष्ट्रीय परिषद यंदा लंडनच्या लँकेस्टर हाऊस येथे होणार असून, 100 पेक्षा अधिक देशांचे संरक्षणमंत्रीपरराष्ट्र व्यवहारमंत्री सहभागी होत आहेत.
 • भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पंतप्रधान मोदींनी निवड केली आहे.
 • तसेच गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या पीस किपींग ऑपरेशनसह विविध विषयांवर चर्चा करण्यास राष्ट्रप्रमुखांची परिषद न्यूयॉर्कला झाली होती.
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामापंतप्रधान मोदींसह 50 राष्ट्रप्रमुख या परिषदेला उपस्थित होते.
 • आता जागतिक शांती सेनेच्या कार्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी, संरक्षण व परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची जागतिक परिषद लंडन्मध्ये होत आहे.
 • परिषदेत भारताच्या अपेक्षा, संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांना सहकार्य, या विषयी भारताची भूमिका डॉ. भामरे मांडतील.
 • शांततेसाठी भारताने कायम तत्परता दाखवली असल्याने, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व व सहभाग असलाच पाहिजे, ही आग्रही मागणीही 6 ते 8 सप्टेंबर होणाऱ्या परिषदेत डॉ. भामरे मांडतील.

16 राज्यांनी स्वीकारली उदय योजना :

 • विविध राज्यांच्या वीज मंडळांना नवी उभारी देण्यासाठी केंद्राच्या उज्वल डिस्कॉम अ‍ॅश्युरन्स (उदय) योजनेत सहभागी होण्यासाठी 16 राज्यांनी करार केले असून, bराज्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी तत्वत:मंजुरी दिली आहे.
 • महाराष्ट्राने अद्याप या करारावर स्वाक्षरी केलेली नाही.
 • पुढील वर्षापर्यंत या योजनेत देशातील सर्व राज्ये सहभागी होतील आणि आगामी आर्थिक वर्षात योजनेचा प्रभावही जाणवू लागेल, अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे.
 • केंद्राने सप्टेंबर 2015 मध्ये उदय योजनेचा प्रारंभ केला. याचा फायदा मिळवण्यास आतापर्यंत आंध्रप्रदेश, बिहार, राजस्थान, छत्तिसगड, गोवा, गुजराथ, जम्मू काश्मीर, झारखंड, हरयाणा, मध्यप्रदेश, पंजाब, कर्नाटक, उत्तराखंड, मणिपूर, पुड्डुच्चेरी, व उत्तरप्रदेश यांनी केंद्राशी करार केले आहेत.
 • विधानसभेची निवडणूक असल्यामुळे उत्तर प्रदेश या योजनेत सहभागी होईल का, याविषयी साशंकता होती. मात्र त्या राज्यानेही करारावर सह्या केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचे टी-20 मध्ये सर्वोच्च धावसंख्या :

 • श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने सर्वोच्च धावसंख्या उभारून विश्वविक्रम केला आहे.
 • श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात ग्लॅन मॅक्सवेलच्या 65 चेंडूंत 145 धावांची आघाडीसह ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 263 धावा केल्या.
 • श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियात पहिला टी-20 सामना पल्लेकलमध्ये खेळण्यात आला असून, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
 • ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅक्सवेल आणि डेव्हिड वॉर्नरने दमदार सुरुवात करत 57 धावांची भागीदारी केली.  
 • मॅक्सवेलने 14 चौकार आणि नऊ षटकारांची बरसात करत नाबाद 145 धावा केल्या. त्याला उस्मान ख्वाजाने 36 धावा करत चांगली साथ दिली.
 • ऑस्ट्रेलियांने 20 षटकांमध्ये 3 बाद 263 धावा केल्या, ऑस्ट्रेलियाने दिलेले हे लक्ष्य गाठताना श्रीलंकेला 20 षटकांमध्ये 9 विकेट बाद 178 धावाच करता आल्या.
 • टी 20 क्रिकेटमध्ये हा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम ठरला आहे.
 • यापूर्वी श्रीलंकेने2007 मध्ये केनियाविरुद्ध खेळताना 20 षटकांमध्ये 6 गडी गमावत 260 धावा केल्या होत्या.
 • तसेच त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 2013 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना 20 षटकांमध्ये 6 गडी गमावत 248 धावा केल्या होत्या.
 • टी 20 सर्वोच्च धावा करणा-या फलंदाजांच्या यादीत मॅक्सवेल दुस-या स्थानी पोहोचला आहे.
 • पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलियाच्या ऍरोन फिंचचा क्रमांक लागतो.
 • विशेष म्हणजे टॉप तीन फलंदाजांच्या यादीतले तिघे फलंदाज हे ऑस्ट्रेलियाचेच आहेत.

जागतिक यादीत ‘आयआयटी’ला स्थान नाही :

 • देशात प्रचंड दबदबा असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजींना (आयआयटी) जागतिक पातळीवर मात्र स्थान पटकावता आलेले नाही.
 • क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटीने 2016-17 या वर्षासाठी (दि.6) रोजी जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीने (वर्ल्ड रँकिंग) ही बाब स्पष्ट केली.
 • तसेच या यादीत सलग पाचव्या वर्षी अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने आपले पहिले स्थान टिकवून ठेवले आहे.
 • भारतात बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे स्थान सर्वोच्च असले तरी जागतिक पातळीवरील यादीत तिला पहिल्या 150 संस्थांमध्येही प्रवेश मिळवता आलेला नाही.
 • मात्र आयआयटीने (मद्रास) पाच जागा वर चढून पहिल्या 250 संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे.
 • आयआयएस संस्थांची घसरण यावर्षी भारतीय संस्थांच्या घसरणीशी जवळपास मिळतीजुळती आहे.
 • दहा भारतीय विद्यापीठांपैकी नऊ विद्यापीठांचा दर्जा 2015 मध्ये 700 किंवा त्यापेक्षा जास्त होता तो दर्जाही घसरला ही वस्तुस्थिती आहे.
 • संशोधन क्षेत्रात जगात जी 100 विद्यापीठे आहेत त्यात भारताच्या केवळ चार संस्थांना स्थान मिळाले आहे.

उत्तर कोरियाकडून तीन क्षेपणास्त्रांची चाचणी :

 • चीनमध्ये आयोजित ‘जी-20’ परिषदेला जगभरातील नेते उपस्थित असताना आपली क्षमता दाखवून देण्याच्या उद्देशाने उत्तर कोरियाने (दि.6) रोजी तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली.
 • उत्तर कोरियाने पूर्व समुद्र किनाऱ्यावर तीन क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिली.
 • जपानी समुद्रात उत्तर कोरियाने तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली.
 • तसेच दोन आठवड्यांपूर्वीही उत्तर कोरियाने क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती.
 • पाणबुडीतून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले होते, असे दक्षिण कोरियाकडून सांगण्यात आले.
 • चीनमध्ये होत असलेल्या ‘जी-20’ परिषदेसाठी जगभरातील सर्व मोठे नेते हजर असताना क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्यामुळे उत्तर कोरियाच्या या कृतीकडे संशयाने पाहिले जाते आहे.
 • अमेरिकेसह संपूर्ण जगालाच आव्हान देण्याचा प्रयत्न उत्तर कोरियाकडून सुरू आहे.

दिनविशेष :

 • 1821 : ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची स्थापना.
 • 1849 : बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, हिंदुस्थानी संगीत परंपरेतील एक थोर प्रतिभावंत गायक यांचा जन्मदिन.
 • 1953 : निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी.
 • 1998 : लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.