Current Affairs of 5 September 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2016)

चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2016)

जपान ई-कचऱ्यातून साकारणार ऑलिंपिक पदके :

  • ऑलिंपिक स्पर्धेच्या आयोजनाचा खर्च आता वाढत आहे. त्यातूनही आयोजक देश कसा मार्ग शोधून काढतात, यावर त्या देशाची आर्थिक परिस्थिती अवलंबून असते.
  • पुढील ऑलिंपिक 2020 मध्ये जपानमध्ये होणार आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी निर्माण केली जाणारी पदके खाणीतील धातूपासून नव्हे; तर थेट ई-कचऱ्यातून निर्माण करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे.
  • ऑलिंपिक स्पर्धेत दिली जाणारी पदके ही साधरणतः खाणीतून सापडणाऱ्या धातूंचा उपयोग करून बनवली जातात.
  • तंत्रज्ञानाचा शोध आणि वापर याच्यात एक पाऊल पुढे असणाऱ्या जपानने यासाठी नामी शक्कल लढविली असून, त्यांनी पदकाच्या निर्मितीसाठी ई-कचऱ्याचा उपयोग करून घेण्याचे ठरवले आहे.
  • पदकांच्या निर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे काही निकष आहेत. त्या निकषांचा भंग होणार नाही, याची काळजी आता जपानला घ्यायची आहे.

राष्ट्रपती कडून सुशीलकुमार शिंदे यांचा सपत्निक सत्कार :

  • सोलापूरसारख्या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुशीलकुमार शिंदे यांनी आपला संघर्षमय प्रवास सुरू केला.
  • देशाचे ऊर्जा मंत्री, गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशपचे राज्यपाल अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
  • आपल्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक विकासाचा दृष्टिकोन ठेवून आणि सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्यांनी या पदांना योग्य न्याय दिला.
  • प्रतिकूल परिस्थितीतून त्यांची संघर्षमय आणि खडतर वाटचाल ही तरुणांना प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्‌गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले.
  • कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त (दि.4) राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा सपत्निक सत्कार झाला.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस :

  • भारताचे दुसरे राष्ट्रपती (1962–67) आणि पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस (5 सप्टेंबर 1888–16 एप्रिल 1975).

  • तसेच त्यांच्या इंडियन फिलॉसॉफीया द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे.
  • सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी या गावी झाला व उच्च शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले.
  • नंतर मद्रासचे प्रेसिडेन्सी कॉलेज (1909-16), म्हैसूर विद्यापीठ (1916-21), ‘राजे पंचम जॉर्ज अध्यासन’, कलकत्ता विद्यापीठ (1929-31) या ठिकाणी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
  • तसेच त्या वेळी ते ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक (1929) व नंतर वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू (1931-35), लंडन येथे ‘पौरस्त्य धर्म आणि नीतिशास्त्र’ यांचे प्राध्यापक (स्फाल्डिंग प्रोफेसर).
  • बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू (1939–48) होते. 1931 ते 39 पर्यंत ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते.
  • 1949 ते 1952 पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या वेळी आपली नेहमीची प्रथा मोडून स्टालिनने त्यांना मुद्दाम बोलावून त्यांची भेट घेतली.
  • अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे (1927) आणि अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे (1930) अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
  • ऑक्सफर्ड येथील ऑप्टन व्याख्यानमाला तसेच हिबर्ट व्याख्यानमाला गुंफण्याचा बहुमानही त्यांना लाभला.
  • 1954 मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन गौरविण्यात आले.
  • 1952 ते 1967 पर्यंत प्रथम भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती होऊन ते निवृत्त झाले.

मदर तेरेसा यांना संतपद बहाल :

  • निर्धन आणि पीडित लोकांना चांगले आयुष्य मिळवून देण्यासाठी चार दशके झटलेल्या आणि या कामामुळे जगभर प्रसिद्ध पावलेल्या ख्रिस्ती नन दिवंगत मदर तेरेसा यांना (दि.4) संतपद बहाल करण्यात आले.
  • पोप फ्रान्सिस यांनी सेंट पीटर्स स्केअरमध्ये झालेल्या कार्यक्रमात मदर तेरेसा यांना संतपद बहाल केले.
  • तसेच त्यांची 19 वी पुण्यतिथी जवळ येत असतानाच हा झाल्याने कोलकत्यामध्ये आनंद व्यक्त होत आहे.
  • संतपदाला पोचलेल्या मदर तेरेसा थोडक्यात त्यांचा कार्यकाल –
  • 1910 : मेसिडोनिया येथे जन्म.
  • 1926 : नन म्हणून कार्यास सुरवात.
  • 1929 : कोलकत्याला येत शिक्षकी पेशा स्वीकारला.
  • 1946 : मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेची स्थापना.
  • 1951 : भारताचे नागरिकत्व मिळाले. मरणोन्मुख लोकांसाठी निवारा सुरू केला.
  • 1965 : पोप पॉल सहावे यांच्याकडून कामाची अधिकृत दखल.
  • 1979 : नोबेल शांतता पुरस्कार.
  • 1997 : सिस्टर निर्मला यांच्याकडे कार्यभार सोपविला.
  • सप्टेंबर 1997 : कोलकत्यात ह्रदयविकाराने निधन.
  • ऑक्‍टोबर 2003 : मदर तेरेसा यांच्यावर दैवीकृपा असल्याचे पोप यांच्याकडून जाहीर.
  • 2015 : संतपद बहाल करण्याची प्रक्रिया पोप फ्रान्सिस यांच्याकडून खुली.
  • 4 सप्टेंबर 2016 : संतपद बहाल.

दिनविशेष :

  • 1886 : श्रीपाद महादेव माटे, मराठी साहित्यिक यांचा जन्मदिन.
  • 1976 : वि.स. खांडेकर, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक यांचा स्मृतीदिन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.