Current Affairs of 6 September 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2015)
ऑस्ट्रिया व जर्मनीने आपली उघड केली सीमा :
- हंगेरीच्या सीमेवर जमलेल्या हजारो निर्वासितांना आश्रय देण्यासाठी ऑस्ट्रिया व जर्मनीने आपली सीमा उघड केली आहे.
- सीरियातील स्थलांतरितांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
- सीरियातून हंगेरीत आश्रय घेतलेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- तर, ऑस्ट्रियामध्येही समुद्रामार्गे 6 हजार नागरिक आश्रयासाठी पोहचले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी “कॅशलेस मेडिक्लेम” योजना लागू :
- राज्यातील शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी “कॅशलेस मेडिक्लेम” योजना लागू करण्यात येत असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले.
- ठाण्यात राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली.
- शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष शिक्षक आमदार रामनाथ मोते व नागो गाणार यांनी सुचवलेली ही योजना आता लागू होणार आहे.
- राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आजारात या योजनेचा फायदा होईल.
- राज्यातील शेकडो रुग्णालये या योजनेशी जोडली जाणार आहेत.
- सध्या आजारांवर उपचार घेतल्यानंतर मेडिकल बिल मंजूर करून घेण्यासाठी विलंब लागतो.
- या नवीन योजनेत शिक्षकांना मेडिकल कार्ड दिले जाणार असून, रुग्णालयात ते दाखविल्यावर पैसे न भरता उपचार घेता येतील,‘ असे शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
- राज्यातील साडेसात लाख शिक्षकांना शिक्षकदिनी दिलेली ही मोठी भेट आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी दिली.
अपूर्वी चंदेलाने एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकले :
- युवा भारतीय नेमबाज अपूर्वी चंदेलाने पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी करताना आज येथे आयएसएसएफ रायफल आणि पिस्टल वर्ल्डकप फायनल्स महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकले.
- जयपूरच्या 22 वर्षीय अपूर्वीने 206.9 गुणांसह रौप्यपदक मिळविले.
- ती सुवर्णपदक जिंकणाऱ्या इराणच्या अहमादी इलाहेल हिच्यापेक्षा फक्त 0.6 गुणाने मागे राहिली.
- अहमादी इलाहेलने 207.5 गुण मिळविले.
- तर सर्बियाच्या आंद्रिया अर्सोविचने शूट ऑफमध्ये क्रोएशियाच्या वेलेनटिना गस्टिन हिला मागे टाकत कांस्यपदक जिंकले.
एनएसई आणि स्टॉक एक्स्चेंज ऑफ मॉरिशस एसईएम यांच्यात सामंजस्य करार :
- भांडवलविषयक ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि स्टॉक एक्स्चेंज ऑफ मॉरिशस (एसईएम) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
- या करारांतर्गत नव्या निर्देशांकाची निर्मिती करण्याविषयी प्रयत्न केला जाणार आहे.
- तसेच दोन्ही भांडवल बाजार समन्वयाने यापुढे काम करणार आहेत.
- दोन्ही शेअर बाजार मिळून सिक्युरिटीज मार्केट्स, निर्देशांक निर्मिती आणि भांडवलविषयक नव्या योजना यांसाठी प्रशिक्षण, शिक्षण तसेच ज्ञानाचे आदानप्रदान करणार आहेत.
- अशा प्रयत्नामुळे दोन्ही देशांतील व्यापारविषयक संबंध अधिक दृढ होतील.
महिलांची पूर्ण सेवाकाळासाठी नियुक्ती करण्यास परवानगी :
- लष्कर व हवाई दलापाठोपाठ नौदलातही महिलांची पूर्ण सेवाकाळासाठी नियुक्ती करण्यास दिल्ली हायकोर्टाने परवानगी दिली आहे.
- यामुळे देशरक्षणाच्या तिन्ही आघाड्यांवर महिलांचे कर्तृत्व झळाळणार आहे.
- नौदलात आत्तापर्यंत महिला अधिकाऱ्यांची कमाल 14 वर्षांसाठीच नियुक्ती होत असे.
- संरक्षण दलांमध्ये पेन्शनसाठी 20 वर्षांच्या सेवाकाळ पूर्ततेची अट असल्याने, महिलांना त्यापासून वंचित राहावे लागत होते.
- याविरोधात नौदलातील 19 महिला अधिकाऱ्यांनी दिल्ली हायकोर्टाकडे दाद मागितली होती.
- या याचिकेत त्यांनी लष्कर व हवाई दलातील महिला अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पूर्ण सेवाकाळ नियुक्तीकडे लक्ष वेधले होते व हा भेदाभेद संपवण्याची विनंती केली होती.
- त्यानंतर हायकोर्टाने हा निर्णय घेतला.
- संरक्षण दलांत महिलांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीचा मुद्दा 2010 साली दिल्ली हायकोर्टाकडेच एका याचिकेद्वारे आला होता.
- त्यावर हायकोर्टाने या दोन्ही दलांमध्ये महिलांना पूर्ण सेवाकाळाचा अधिकार बहाल केला होता.
- तेव्हापासून लष्कर व हवाई दलात पुरुष-महिला अधिकारी समान स्तरावर आले.
दिनविशेष :
- 1968 : स्वाझीलँडला स्वातंत्र्य.