Current Affairs of 7 September 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2015)

नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर वर्षभरात 37 कोटी रुपये खर्च :

  • पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून परदेश दौऱ्यांसाठी चर्चेत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर वर्षभरात 37 कोटी रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे.
  • या दौऱ्यांत ऑस्ट्रेलिया दौरा सर्वांत महागडा होता.
  • माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मोदींच्या परदेश दौऱ्याबाबत माहिती मागविण्यात आली होती.
  • भारतीय दूतावासांनी या अर्जावर दिलेल्या माहितीनुसार मोदींनी जून 2014 ते जून 2015 या वर्षभरात केलेल्या दौऱ्यांवर 37.22 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
  • तसेच या वर्षभरात मोदींनी 20 देशांचा दौरा केला आहे.
  • मात्र, जपान, श्रीलंका, फ्रान्स आणि दक्षिण कोरिया देशांच्या दौऱ्याची माहिती देण्यात आलेली नाही.
  • या दूतावासांतून मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जर्मनी आणि चीन या देशांच्या दौऱ्यादरम्यान सर्वाधिक खर्च झाला आहे.
  • तर, भूतान दौऱ्यावर सर्वांत कमी म्हणजेच 41.33 लाख रुपये खर्च झाला. मोदींनी 365 दिवसांपैकी 53 दिवस परदेशात घालविले आहेत.

मेनसाला बुद्धिमापन कौशल्य चाचणीत सर्वाधिक 162 गुण :

  • बारा वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीने इंग्लंडमध्ये मेनसा बुद्धिमापन कौशल्य चाचणीत सर्वाधिक 162 गुण मिळवून थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन आणि स्टिफन हॉकिंगलाही मागे टाकले.
  • दीडशे मिनिटांत तिने 162 गुण मिळवले.
  • तिला गणित, भौतिक विज्ञान आणि रसायनशास्त्रात रस होता. मेनसा (एमइएनएसए)ने आयोजित कॅटेल थ्री बी पेपरमध्ये सर्वाधिक गुण मिळाले.
  • तसेच या परीक्षेतील प्रश्‍न तिने काही मिनिटांतच सोडविले.
  • हॉकिंग आणि आइन्स्टाइन यांचा बुध्यांक 160 इतका आहे, तर लॅडियाचा 162 आहे.

साताऱ्याच्या पश्चिमेला एक नवीन रेकॉर्ड :

  • साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या यवतेश्वरच्या डोंगरावर हजारो पावले धावली अन् एक नवीन रेकॉर्ड स्थापन केले.
  • रविवारी आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉनची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये निवड झाली आहे.
  • ‘डोंगरावरील धावण्यात सर्वाधिक लोक-एक डोंगर’ यासाठी ही नोंद केली आहे.
  • गिनीजचे प्रतिनिधी ग्लेन पोलार्ड यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
  • स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे.
  • या स्पर्धेत इथिओपिया देशातील खेळाडूंनी विजेतेपद मिळविले.
  • तसेच यामध्ये बिर्क जिटर, टॅमरट गुडेटा आणि गुडिसा डेबेले विजेते ठरले.
  • गुजरातमध्ये गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत 2,122 स्पर्धक सहभागी झाले होते, तर सातारा येथील स्पर्धेत तब्बल 5 हजार स्पर्धक सहभागी झाले होते.

डॉ. विकास आमटे यांना नागभूषण पुरस्कार जाहीर :

  • महारोगी तसेच वंचित-उपेक्षितांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या डॉ. विकास आमटे यांना नागपूर अवॉर्ड फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा नागभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • शहराच्या त्रिशताब्दीनिमित्त विदर्भाच्या विकासासाठी भरघोस कार्य केलेल्या तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विदर्भाचा लौकिक वाढविलेल्या, समाजकार्यासाठी आयुष्य वेचलेल्या व्यक्तीस दरवर्षी नागभूषण परस्कार देऊन गौरविले जाते.
  • एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

बीएसएफ आणि पाकिस्तानचे रेंजर्स यांच्यात बैठक होणार :

  • भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) पातळीवरील बैठक रद्द झाल्यानंतर आता 9 सप्टेंबरपासून सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाकिस्तानचे रेंजर्स यांच्यात बैठक होणार आहे.
  • जम्मू-काश्‍मीरमधील शस्त्रसंधी भंग, छुपे हल्ले, घुसखोरी तसेच तस्करी आदी महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांवर या बैठकीत चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे.
  • सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आणि पाकिस्तान रेंजर्सचे महासंचालक यांच्या दरम्यान 9 ते 13 सप्टेंबर या कालावधीत ही बैठक होणार आहे.
  • पाकिस्तान रेंजर्सचे महासंचालक (पंजाब) मेजर जनरल उमर फारूक बुर्की यांच्या नेतृत्वाखाली 16 सदस्यांचे पथक 8 सप्टेंबरला पंजाबमधील अत्तारी-वाघा सीमेवरून भारतात येतील आणि अमृतसरहून दिल्लीसाठी रवाना होतील.
  • भारतीय पथकातही सोळाच सदस्य असून, बीएसएफचे प्रमुख देवेंद्र कुमार पाठक याचे नेतृत्व करीत आहेत.

शेन वॉटसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती :

  • ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू शेन वॉटसनने रविवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली.
  • या 34 वर्षीय क्रिकेटपटूने कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध कार्डिफमध्ये खेळला.
  • त्या लढतीत ऑस्ट्रेलिया संघाला 169 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

“एच टू ई” पॉवर सिस्टिम तयार केली :

  • भारतातील सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि स्वस्तात अखंडित वीज मिळावी म्हणून उद्योजक सिद्धार्थ मयूर यांनी “एच टू ई” पॉवर सिस्टिम तयार केली आहे.
  • याद्वारे 24 तास वीज उपलब्ध होणार असूनपुणे आणि न्यूयॉर्क येथील क्‍लीन एनर्जी कंपनीतर्फे हा प्रकल्प होत आहे.
  • “सॉलिड ऑक्‍साईड फ्युएल”वर हा प्रकल्प आधारित असून, पॉवर जनरेटर विकसित केले आहे. जर्मनीच्या “फ्रॉऊनहोपर आयकेटीएस इन्स्टिट्यूट”च्या भागीदारीत हा प्रकल्प होत आहे.

एलएचसी बनवण्यात यश :

  • विश्वाच्या निर्मितीच्या वेळी द्रव्याची जी अवस्था होती त्यातील लहान थेंब सर्नच्या लार्ज हैड्रॉन कोलायडरमध्ये (एलएचसी) बनवण्यात यश आले आहे.
  • काही कण वेगाने एकमेकांवर आदळवून हा प्रयोग करण्यात आला.
  • कन्सास विद्यापीठाचे संशोधक एलएचसी प्रयोगात काम करीत असून त्यांनी क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा ही द्रव्याची अवस्था मिळवली असून त्याचे काही थेंब तयार झाले.
  • शिशाचे अणुकेंद्र उच्च ऊर्जेला महाआघातक यंत्राच्या म्युऑन सॉलेनाइड डिटेक्टरमध्ये (सीएमएस) प्रोटॉनवर आदळवण्यात आले, त्यानंतर हे थेंब तयार झाले.
  • भौतिकशास्त्रज्ञांनी या प्लाझ्माला सूक्ष्मतम द्रव असे नाव दिले आहे.

13.2 अब्ज वर्षांच्या आकाशगंगेचा शोध :

  • कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधील (कॅलटेक) संशोधकांनी तब्बल 13.2 अब्ज वर्षांच्या आकाशगंगेचा शोध लावल्याचा दावा केला असून, ती आतापर्यंत दिसलेली सर्वांत दूरची आकाशगंगा असण्याची शक्‍यता आहे.
  • बहुतांश तज्ज्ञांच्या मान्यतेनुसार, विश्‍वाची उत्पत्ती 13.8 अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे.
  • त्यामुळे 13.2 अब्ज वर्षे वय असलेली ही आकाशगंगा सर्वांत मोठी आणि दूरची असल्याचा दावा करण्यात आला आहे.
  • तसेच दिसलेल्या या आकाशगंगेचे नाव ईजीएस8पी7 असे ठेवण्यात आले आहे.
  • ही आकाशगंगा इतर आकाशगंगांच्या तुलनेत अत्यंत प्रकाशित असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तप्त ताऱ्यांचा समावेश असण्याची दाट शक्‍यता आहे,‘ असे सिरीओ बेली या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या संशोधकाने सांगितले आहे.
  • या आकाशगंगेच्या विशेष वैशिष्ट्यामुळे यामध्ये इतरांच्या मानाने फार लवकर हायड्रोजन तयार झाला असल्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे.
  • गृहितकानुसार, महास्फोटानंतर लगेचच विविध भारीत कण आणि फोटॉन्स यापासून विश्‍वाची निर्मिती सुरू झाली.
  • विश्‍वाचे वय 50 कोटी ते एक अब्ज वर्षे या दरम्यान असताना पहिल्या आकाशगंगेची निर्मिती झाली.
  • या सुरवातीच्या आकाशगंगांची वैशिष्ट्ये “ईजीएस8पी7”मध्ये दिसत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

दिनविशेष :

  • 1821 : ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची स्थापना.
  • 1998 : लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.