Current Affairs of 5 September 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2015)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन :
- बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव (वय 51) यांचे शुक्रवारी मध्यरात्री कर्करोगाने निधन झाले.
- ‘बागबान’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चलते-चलते’ आणि ‘राजनीती’सारख्या प्रसिद्ध चित्रपटांना आदेश श्रीवास्तव यांनी संगीत दिले होते.
- 1993 मध्ये कन्यादान या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
Must Read (नक्की वाचा):
सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस विजयी :
- अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने वर्षाच्या अखेरची ग्रँडस्लॅम यूएस ओपनमध्ये अमेरिकेच्या कॅटलिन क्रिस्टन आणि सबरीना संतामारिया या जोडीचा पराभव करताना विजयाने जोरदार सुरुवात केली.
- या वर्षीच्या विम्बल्डन विजेत्या सानिया आणि हिंगीस या इंडो-स्वीस जोडीने 56 मिनिटे रंगलेल्या लढतीत अमेरिकेच्या जोडीचे 6-1, 6-2 असे सरळ सेट्समध्ये आव्हान संपुष्टात आणले.
- विजयी जोडीने एक बिनतोड सर्व्हिस आणि एक विनर्स मारताना एकूण 61 गुण घेतले, तर कॅटलिन आणि सबरिना जोडीने एकूण 33 गुण प्राप्त केले.
- सानिया-हिंगीस यांची पुढील फेरीतील लढत टिमिया बोज्नियाकी आणि चिया जुंग चुआंग यांच्याशी होईल.
चौथ्या विश्व संमेलनाची सुरवात :
- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती सुवर्णमहोत्सवाच्या वर्षात अंदमानच्या भूमीत विश्व साहित्य संमेलनाचा योग जुळून आला आहे.
- प्रा. शेषराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली चौथ्या विश्व संमेलनाची सुरवात आज होत आहे.
- “ऑफबीट डेस्टिनेशन” व महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाच व सहा सप्टेंबरला विश्व साहित्य संमेलन होत आहे.
‘एक पद, एक पेन्शन’ लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार :
- केंद्र सरकारतर्फे ‘एक पद, एक पेन्शन’ (ओआरओपी) लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या संदर्भात पुढील आठवड्यात एकतर्फी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
- दरम्यान, आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा माजी सैनिकांनी दिला आहे.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने 5 रुपयांचे नवे नाणे प्रसिद्ध करण्याचा निर्णय :
- भारत पाकिस्तानदरम्यान 1965 मधील युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने 5 रुपयांचे नवे नाणे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
- “भारतीय नाणे कायदा 2011” नुसार हे नाणे चलनात आणण्यात येईल.
- याशिवाय सध्या असलेले पाच रुपयांचे नाणेही चलनात असेल.
- तसेच नाण्याच्या एका बाजूला तीन सिंह असलेला अशोकस्तंभ आणि इंग्रजी अक्षरात “इंडिया” असे लिहिलेले असेल.
- तर दुसऱ्या बाजूला मध्यभागी “अमर जवान”चे स्मारक दोन्ही बाजूला ऑलिव्ह वृक्षाची पाने असतील.
- शौर्य आणि बलिदानाचा अर्थ प्रतित करणारे इंग्रजी शब्दही दुसऱ्या बाजूला नाण्याच्या आतील परिघावर लिहिलेली असतील.
- तसेच “अमर जवान”च्या स्मारकाच्या चित्राखाली 2015 हे वर्षही लिहिलेले असेल.
- तसेच नाण्यावर “1965 च्या कारवाईचे सुवर्ण वर्ष” असे शब्द इंग्रजी भाषेत लिहिलेले असणार आहे.
झुम्पा लाहिरी यांची राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी निवड :
- भारतीय वंशाच्या अमेरिकन आणि पुलिस्त्झर पारितोषिक विजेत्या झुम्पा लाहिरी यांची अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी निवड करण्यात आली आहे.
- पुढील आठवडय़ात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते लाहिरी यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
- मानवतावादी लेखनावर भर दिल्यामुळे लाहिरी यांची या पदकासाठी निवड करण्यात आल्याची माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली आहे.
- लाहिरी यांनी भारत-अमेरिकेतील वितुष्ट आणि आपलेपणावर आधारित सुरेख लिखाण केल्याचे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले.
- त्याचप्रमाणे इतिहासकार, लेखक, तत्त्वज्ञ, तज्ज्ञ, परीरक्षक आणि शैक्षणिक अभ्यासक्रमातील अव्वल विद्यार्थी यांचाही गौरव करण्यात येणार आहे.
- पहिले राष्ट्रीय मानवतावादी पदक 1996 मध्ये प्रदान करण्यात आले होते.
- तेव्हापासून आतापर्यंत 175 जणांना हे प्रतिष्ठेचे पदक देण्यात आले आहे.
ट्विटरच्या सीईओपदी पद्मश्री वॉरियर यांची निवड होण्याची शक्यता :
- ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डिक कॅस्टोलो यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटर नव्या सीईओच्या शोधात आहे.
- ट्विटरच्या सीईओपदी आंध्र प्रदेशातील पद्मश्री वॉरियर यांची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
- पद्मश्री वॉरियर या मूळच्या आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहेत.
- त्या सध्या सीस्को सिस्टीमच्या सीईओ म्हणून कार्यरत आहेत.
- पद्मश्री वॉरियर यांच्यासह सीबीएस इंटरअॅक्टिव्हचे जीम लॅन्झोन यांचाही ट्विटरच्या सीईओ पदासाठी विचार केला जात आहे.
- तर जॅक डोर्सी हे सध्या ट्विटरच्या सीईओपदाचा अतिरिक्त कारभार सांभाळत आहेत.
श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मर्वान अट्टापटू यांनी राजीनामा :
- श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मर्वान अट्टापटू यांनी आपल्या पदाचा काल राजीनामा दिला.
- हा राजीनामा श्रीलंका क्रिकेट मंडळाने स्वीकारला.
- क्रिकेट मंडळ वा अट्टापटू या दोघांनीही राजीनामा देण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही.
- गेल्या वर्षी सप्टेंबरपासूनच अट्टापट्टू यांची संघाच्या प्रशिक्षकपदी अधिकृतरित्या नियुक्ती झाली होती.
- मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहण्याआधी 2011 पासून अट्टापटू संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक होते.
दिनविशेष :
- 5 सप्टेंबर : शिक्षण दिन
- 1888 : माजी राष्ट्रपती, तत्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म.