Current Affairs of 6 May 2015 For MPSC Exams

Current Affairs Of (6 May 2015) In English

State Seal Cabinet Decision On Compensation To 33% :

  • Centre backgrounds are relaxed condition loss by 50 percent to 33 percent loss, but seal the cabinet decision to compensate.
  • Rs 6800 and Rs 4500 for dryland farming, irrigated area, while nine thousand 13 thousand to Rs 500 crore and the orchards (Perennials crops) will be given for at least Rs 12 thousand to Rs 18 thousand For two hectares.
  • Will be given for at least For two hectares.
  • The government will have to take the state, even as the prescribed criteria and rate.
  • Natural disasters in the hurricane, earthquake , fire, flood , tsunami , hailstorm , landslide collapse , ice collapse , locusts , drought, cold, stormy , and others have been included in the Centre disasters.
  • The response from the State Disaster Relief Fund is for calamities.
  • State Government whose rain, heavy (loss of all Agricultural crops with injury), accidental fires, sea spate, electricity or natural in disaster collapse of the central government is to help the State Government and the standard rate.
  • Rain fed agriculture from 6800 to Rs 4500
  • Horticultural sector –  from nine thousand Rs 13,500
  • For orchards (Perennials crops)for at least two hectares will be given Rs 12 to 18 thousand 

“Sky” Missile Launch In The Indian Army :

  • Domestic-made “sky” missile from nearly three decades after the project starts Was filed in the Army today.
  • The supersonic missile hit the ground in the air about 25 km distance Of them have the ability to destroy aircraft and helicopters.
  • “Sky” is protection of creation Research and Development Organisation (DRDO) has.
  • “Sky” is a more powerful air defense division of the army due to enter the army.
  • The ability to attack targets on all kinds of different situations at the same time “sky” system This sophisticated radar system has been well articulated.
  • “Sky” is the total cost of Rs 19,500 missiles.

Inaugurated The First Solar Energy Project In Pakistan :

  • Pakistan Prime Minister Nawaz Sharif inaugurated the first solar energy project today.
  • China’s “stock-eparetasa tebiyana Electric Limited” ( tibiie ) or the company’s collaboration with he project is owned by the Government of Punjab was set up.
  • Up to $ 19 million in the project by spending a hundred megawatts of capacity , the next year they will be carried from MW a thousand.

Prime Minister Of China, Mongolia And South Korea On The Tour:

  • Narendra Modi 14 and 19 May in China, Mongolia and South Korea are on the tour will leave.
  • Foreign Ministry and the three countries to expand the scope of the bilateral relationship was said to be the main purpose is to increase.
  • Modi will visit China during the first phase of 14 to 16 May.
  • Modi will visit on May 17 to Mogul.
  • May 18 and 19 at the end of the prime minister will visit South Korea

‘India-Bangladesh’ Land Boundary Agreement :

  • Both countries 161 pieces scattered around the two countries to each other’s limits of land  interactive payment ‘India-Bangladesh’ land boundary agreement ( lbs) bill is a provision.
  • In Assam, West Bengal, Tripura and Meghalaya states are coming.

Day Special :

  • 1861 – born Indian politician Motilal Nehru Gangadhar
  • 2001 – well known Marathi novelist, author malatibai bedekar died.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 5 May 2015

चालू घडामोडी (6 मे 2015) मराठी

33% नुकसान भरपाई देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाचा शिक्‍कामोर्तब :

  • केंद्राच्या धर्तीवर 50 टक्‍के नुकसानीची अट शिथिल करत 33 टक्‍के नुकसान झाले, तरी भरपाई देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्‍कामोर्तब केले.
  • तसेच कोरडवाहू शेतीसाठी 4500 रुपयांवरून 6800 रुपये, तर बागायती क्षेत्रासाठी नऊ हजार रुपयांवरून 13 हजार 500 रुपये आणि फळबागांसाठी (बहुवार्षिक पिके) 12 हजार रुपयांवरून 18 हजार रुपयांची मदत किमान दोनहेक्‍टरसाठी देण्यात येणार आहे.
  • केंद्र सरकारने ठरविलेले निकष व दर जसेच्या तसे राज्यात लागू करण्यात येणार आहेत.
  • नैसर्गिक आपत्तीमध्ये चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, हिमखंड कोसळणे, टोळधाड, दुष्काळ, ढगफुटी व कडाक्‍याची थंडी या आपत्तींचा समावेश केंद्राने केला आहे. या आपत्तींकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत करण्यात येते.
  • तसेच राज्य शासनातर्फे अवेळी पाऊस, अतिवृष्टी (शेतीपिकांच्या नुकसानीसह सर्व नुकसान), आकस्मिक आग, समुद्राचे उधाण, वीज कोसळणे या नैसर्गिक आपत्तींमध्येही राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या मानक व दरानुसार मदत करण्यात येते.
  • कोरडवाहू शेतीसाठी 4500 वरून 6800 रुपये
  • बागायती क्षेत्रासाठीनऊ हजारांवरून 13,500 रुपये
  • फळबागांसाठी (बहुवार्षिक पिके)12 हजारांवरून 18 हजार रुपये मदत किमान दोन हेक्‍टरसाठी देण्यात येणार

“आकाश” क्षेपणास्त्र भारतीय लष्करामध्ये दाखल :

  • स्वदेशी बनावटीचे “आकाश” क्षेपणास्त्र प्रकल्प सुरू झाल्यापासून तब्बल तीन दशकांनंतर भारतीय लष्करामध्ये आज दाखल झाले.
  • जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या या स्वनातीत क्षेपणास्त्रात सुमारे 25 किलोमीटर अंतरावरून शत्रूची विमाने आणि हेलिकॉप्टर्स नष्ट करण्याची क्षमता आहे.
  • “आकाश”ची निर्मितीसंरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) केली आहे.
  • “आकाश” लष्करात दाखल झाल्यामुळे लष्कराच्या हवाई सुरक्षा तुकडी अधिक सशक्त झाली आहे.
  • सर्व प्रकारच्या परिस्थितीत विविध लक्ष्यांवर एकाच वेळी हल्ला करण्याची क्षमता “आकाश” यंत्रणेत आहे तसेच या यंत्रणेला अत्याधुनिक रडारची जोड देण्यात आली आहे.
  • “आकाश” क्षेपणास्त्रची एकूण किंमत 19,500 कोटी रुपये आहे.

पाकिस्तानातील पहिल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन :

  • पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानातील पहिल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे आज उद्‌घाटन केले.
  • चीनच्या “टेबियन इलेक्‍ट्रिक ऍपरेटस स्टॉक को-लिमिटेड” (टीबीईए) या कंपनीच्या सहकार्याने तो उभारण्यात आला असून प्रकल्प पंजाब सरकारच्या मालकीचा आहे.
  • 19 कोटी डॉलर खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाची क्षमता शंभर मेगावॉट असून, पुढील वर्षापर्यंत ती एक हजार मेगावॉटपर्यंत नेली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन, मंगोलिया व दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 ते 19 मे या काळात चीन, मंगोलिया व दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत.
  • परराष्ट्र मंत्रालयातर्फे या तिन्ही देशांबरोबर द्विपक्षीय संबंधांची विस्तार व व्याप्ती यात वृद्धी करणे हा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले.
  • 14 ते 16 मे दरम्यान मोदी पहिल्या टप्प्यात चीनला भेट देणार आहेत.
  • 17 मे रोजी मोदी मंगोलियास भेट देणार आहेत.
  • 18 व 19 मे शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान दक्षिण कोरियाला भेट देणार आहेत.

‘भारत-बांगलादेश जमीन सीमा करार’ :

  • दोन्ही देशांतील एकमेकांच्या हद्दीतील दोन्ही देशांच्या सुमारे 161 तुकड्यांत विखुरलेल्या भूभागांच्या परस्पर आदान-प्रदानाची ‘भारत-बांगलादेश जमीन सीमा करार’ (एलबीए) विधेयकात तरतूद आहे.
  • यात आसाम, पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा व मेघालय ही राज्ये येत आहेत.

दिनविशेष :

  • 1861 – भारतीय राजनीतीज्ञ मोतीलाल गंगाधर नेहरू यांचा जन्म
  • 2001 – विख्यात मराठी कादंबरीकार लेखिका मालतीबाई बेडेकर यांचे निधन.

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 7 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.