Current Affairs of 7 May 2015 For MPSC Exams

Current Affairs Of (7 May 2015) In English

John Nash And Louis Nierenberg  Abel Prize Declared:

  • US mathematician John Nash and Canadian classic Louis Abel Nierenberg just award this year.
  • The great mathematician Niels Henrik Abel’s memory to the award comes.
  • The great mathematician Niels Henrik Abel (1802-1829) of the memory they have begun to provide Abel Prize from 2003.
  • Abel quality award ‘Nobel’ equals high.
  • Abel Prize mathematician John Nash and classic US and Canada Louis Nierenberg every moment useful science like “Partial dipharansiyala equation” just released by the depth of the research.
  • King Harald of Norway prize distribution will be inaugurated on May 19 in Oslo.
  • John Nash’s Nobel Memorial vorda in economics had received in 1994.

Rajya Sabha Majority 118 Against Zero Historical Recognition Bill:

  • “India-Bangladesh land boundary agreement -2013” This amendment bill approved by a majority of 181 against the whole of zero.
  • Parliament approved the amendment of the bill states will niyojananusara. 50 per cent coming from the state governments of both countries have approved the existence of this law is going to be given to each of the 161 around the Police in their way.
  • According to India’s nearly 266 acres, 472 acres of the total 738 acres of land, if Bangladesh is to be handed out to each other.
  • Two years ago (2013) was the first bill was introduced in this.

Happiness Index’s 117 Number :

  • The United Nations has declared the global happiness index ranking countries, India had the number 117 or 157 in the country.
  • Global happiness index of the country’s total national income, age limits, freedom, social support and life choice in the same options are considered resources. Swissjharland has topped the world happy-happy country.
  • Sustainable Development Solutions Network is the “SDSN” the United Nations on behalf of the organization’s report is released annually.
  • Happy-happy in the list of countries Iceland, Denmark, Norway and Canada, including the first Pacha. India and Pakistan, or 81 or 117. Palestine (`108), Bangladesh (109), Ukraine (111), Iraq (112), or other like Sort countries.
  • India has slipped from number six places compared to 2013, when India was the number 111.

Odisha ‘Healthy’ Scheme Started :

  • Odisha Chief Minister Naveen Patnaik ‘Healthy’ scheme started, the scheme will be given free medicines in government hospitals of 570.
  • The scheme will provide medicines three government hospitals. Including government medical colleges and The hospital with hospitals.
  • District 30, which includes hospitals and government at Bhubaneswar and rurakela hospitals.
  • The state government decided to grant Rs 200 crore for this scheme . Free to the drugs , including cancer and heart Due on medicines Preferred.

Day Special :

  • 1861 – Birth of Rabindranath Tagore, the Nobel laureate and reformist society paritosika
  • 1880 – Bharat Ratna Pandurang Vamana otherwise Born
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 6 May 2015

चालू घडामोडी (7 एप्रिल 2015) मराठी :

जॉन नॅश आणि लुईस निरेनबर्ग यांना आबेल पुरस्कार जाहीर :

  • अमेरिकेचे श्रेष्ठ गणितज्ज्ञ जॉन नॅश आणि कॅनडाचे लुईस निरेनबर्ग यांना यंदाचा आबेल पुरस्कार जाहीर झालाय.
  • महान गणिती नील्स हेन्रिक आबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो.
  • महान गणिती नील्स हेन्रिक आबेल (1802-1829) यांच्या स्मरणार्थ त्यांनी 2003 पासून आबेल पारितोषिक प्रदान करायला सुरवात केली आहे.
  • आबेल पुरस्काराचा दर्जाही ‘नोबेल’ इतकाच उच्च आहे.
  • आबेल पुरस्कार अमेरिकेचे श्रेष्ठ गणितज्ज्ञ जॉन नॅश आणि कॅनडाचे लुईस निरेनबर्ग यांना विज्ञानात हरघडीला उपयोगी पडणाऱ्या “पार्शल डिफरन्शियल इक्वेशन”च्या सखोल संशोधनाबद्दल जाहीर झालाय.
  • पुरस्काराचे वितरण नॉर्वेचे राजे हेराल्ड यांच्या हस्ते ऑस्लोमध्ये 19 मे रोजी केले जाईल.
  • जॉन नॅश यांना अर्थशास्त्रामधील नोबेल मेमोरियल ॲवॉर्ड 1994 मध्ये मिळाले होते.

राज्यसभेची 118 विरुद्ध शून्य बहुमताने विधेयकास ऐतिहासिक मान्यता :

  • “भारत-बांगलादेश जमीन सीमा करार-2013” हे घटनादुरुस्ती विधेयक 181 विरुद्ध शून्य अशा संपूर्ण बहुमताने मंजूर केले.
  • लोकसभेत नियोजनानुसार हे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यावर राज्यांकडे जाईल. 50 टक्के राज्य सरकारांच्या मंजुरीनंतर अस्तित्वात येणाऱ्या या कायद्यानुसार दोन्ही देशांनी आपापल्या ताब्यातील सुमारे 161 भाग परस्परांना सोपविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
  • यानुसार भारताच्या सुमारे 266 एकर, तर बांगलादेशाच्या 472 एकर अशा एकूण 738 एकर जमिनीचे परस्परांना हस्तांतर होणार आहे.
  • दोन वर्षांपूर्वी (2013) मध्ये हे विधेयक सर्वप्रथम मांडण्यात आले होते.

सुख-समाधान निर्देशांकानुसार भारताचा 117 क्रमांक :

  • संयुक्त राष्ट्रांनी जागतिक सुख-समाधान निर्देशांकानुसार देशांची क्रमवारी जाहीर केली असून त्यात 157 देशात भारताचा क्रमांक 117 वा लागला आहे.
  • जागतिक सुख-समाधान निर्देशांकात देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न, आयु:मर्यादा, सामाजिक आधार व जीवनातील पर्यायांच्या निवडीतील स्वातंत्र्य या निकषांचा विचार केला जातो. स्वित्झलंडने सुखी-समाधानी देशात जगात पहिला क्रमांक पटकावला आहे.
  • सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्क म्हणजे ‘एसडीएसएन’ या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेच्या वतीने हा अहवाल दरवर्षी जाहीर केला जातो.
  • सुखी-समाधानी देशांच्या यादीत आइसलँड, डेन्मार्क, नॉर्वे व कॅनडा यांचा पहिल्या पाचात समावेश आहे. भारत 117 वा असून पाकिस्तान 81 वा आहे. पॅलेस्टाइन (108), बांगलादेश (109), युक्रेन (111) इराक (112) या प्रमाणे इतर देशांची क्रमवारी आहे.
  • भारताचा क्रमांक 2013 च्या तुलनेत सहा स्थानांनी घसरला आहे, त्यावेळी भारताचा क्रमांक 111 वा होता.

ओडिशात ‘निरामय’ योजना सुरू :

  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ‘निरामय’ योजना सुरू केली, या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयात 570 प्रकारची औषधे मोफत देण्यात येणार आहेत.
  • या योजनेतून तीन सरकारी रुग्णालयांना औषधे पुरविली जाणार आहे. यामध्ये सरकारी रुग्णालयांबरोबरच वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांचाही समावेश आहे.
  • 30 जिल्हा रुग्णालये आणि भुवनेश्वर आणि रूरकेला येथील सरकारी रुग्णालयांचाही समावेश आहे.
  • राज्य सरकारने या योजनेसाठी सुमारे 200 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मोफत देण्यात येणाऱ्या औषधांमध्ये कर्करोग आणि हृदय विकारावरील औषधांचाही समावेश आहे.

दिनविशेष :

  • 1861 – समाज सुधारणावादी व नोबेल परितोषिक विजेते रविंद्रनाथ टागोर यांचा जन्म
  • 1880 – भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.