Current Affairs of 6 January 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (6 जानेवारी 2017)

चालू घडामोडी (6 जानेवारी 2017)

भारतीय लघु उद्योगांना गुगलची सेवा :

 • गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी लघु व मध्यम उद्योगांसाठी डिजिटल अनलॉक्ड् नावाची नवी सेवा सुरू केली आहे.
 • फिक्कीच्या सहकार्याने सुरू केलेल्या सेवेत 90 दिवसांचे ट्रेनिंग व्हिडीओ व आठ तासांचा ट्रेनिंग कार्यक्रम आहे.
 • पिचाई यांनी सांगितले की, मी चेन्नईत शिक्षण घेत होतो, तेव्हा माहिती ही दुर्मीळ बाब होती. तथापि, इंटरनेटमुळे आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही माहितीचा स्रोत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करीत आहोत. इंटरनेटच्या मदतीने छोटे उद्योगही मोठे होऊ शकतात. नोटाबंदीच्या काळात वॉलनटच्या अ‍ॅपने 2 दशलक्षावरून 5 लक्ष वापरकर्त्यांवर घेतलेली झेप हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
 • तसेच या सेवेचा लाभ घेण्यासाठी छोट्या व मध्यम उद्योगांना डिजिटल अनलॉक्ड्च्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल.
 • भारतभरातील 40 शहरांत 5 हजार वर्कशॉप घेण्याची गुगलची योजना आहे. प्रीमिअर नावाचे अ‍ॅपही उपलब्ध होईल.
 • हिंदी, इंग्रजी, तामिळी, तेलगू आणि मराठी या भाषांत ते विकसित केले जात आहे. हे मोफत अ‍ॅप ऑफलाइनही काम करू शकतील.

जपान करणार ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी सहकार्य :

 • केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात समाविष्ट असलेल्या चेन्नई, अहमदाबाद आणि वाराणसी या तीन शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी जपानने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांच्यासोबत 5 डिसेंबर रोजी जपानचे भारतातील राजदूत केनजी हिरामत्सु यांची बैठक झाली.
 • तसेच त्यामध्ये केनजी यांनी भारतातील शहरांच्या विकासासाठी भारत सरकारच्या प्रकल्पांमध्ये भागीदार होण्यास जपान उत्सुक असल्याचे सांगितले. युकेचे उच्चायुक्त डॉमिनीक अस्क्विथ यांनीही नायडू यांची भेट घेतली.
 • स्मार्ट सिटी प्रकल्पातील एकूण शहरांपैकी 15 शहरांच्या विकास करण्यासाठी आतापर्यंत जगातील प्रमुख देश समोर आले आहेत.
 • युकेने पुणे, अमरावती आणि इंदोर; फ्रान्सने चंदीगढ, पुद्दुचेरी आणि नागपूर; जर्मनीने भुवनेश्‍वर, कोईम्बतूर आणि कोची तर युनायटेड स्टेटस्‌ डेव्हलपमेंट एजन्सीने विशाखापट्टनम, अजमेर आणि अलाहाबाद ही शहरे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीस अधीक्षकपदी अनिल पारसकर :

 • रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मोहमंद सुवेझ हक यांची पुणे जिल्हा ग्रामीण येथे बदली झाली. सुवेझ हक यांच्या जागी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची बदली झाली आहे.
 • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याच्या गृह विभागाने राज्य पोलीस सेवेतील आणि भारतीय पोलीस सेवेतील सुमारे 20 पोलीस उपायुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत.
 • सुवेझ हक यांनी नक्षली विभागात चांगले काम केले होते. ते नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर होते. त्यामुळे त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा तैनात करण्यात आली होती. रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी एक वर्ष आठ महिने काम पाहिले.

नोबेल विजेतांसाठी 100 कोटींचे पारितोषिक :

 • आंध्रप्रदेशमधील कोणत्याही व्यक्तीला जर नोबेल पुरस्कार प्राप्त झाला तर त्या व्यक्तीला 100 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे.
 • श्रीपद्मावती महिला विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेसच्या कार्यक्रमात नायडू बोलत होते.
 • ‘राज्यातील कोणत्याही वैज्ञानिकाला किंवा इतर क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला जर नोबेल पुरस्कार प्राप्त झाला, तर त्याला सरकारकडून 100 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल’, अशी घोषणा नायडू यांनी केली.
 • विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी आयुष्यात मेहनत करण्याचा सल्ला दिला. छोट्या छोट्या कल्पनांमधून मोठमोठे संशोधने होत असतात, असेही ते पुढे म्हणाले.
 • भारतीय रुपयांमध्ये नोबेल पुरस्काराची रक्कम ही जवळपास 5.96 कोटी रुपये आहे. त्यामुळे नायडू यांनी घोषित केलेली पारितोषिकाची रक्कम ही जवळपास 17 पट अधिक आहे.
 • एका वृत्तानुसार यापूर्वीही नायडू यांनी राज्यातील संशोधक, वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या व्यक्तीला 10 कोटी रुपये पारितोषिक देण्याचे घोषित केले होते. यावेळी घोषणा करताना त्यांनी पारितोषिकाच्या रकमेत वाढ केली आहे.

दिनविशेष :

 • 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरु केले.
 • विनायक दामोदर सावरकर यांची अंदमानच्या तुरुंगातून 6 जानेवारी 1924 रोजी सुटका झाली.
 • 6 जानेवारी 1956 हा भारतीय क्रिकेट खेळाडू कपिल देव निखंज यांचा जन्मदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.