Current Affairs of 7 January 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (7 जानेवारी 2017)
विराट कोहली टिम इंडियाचे नवे कर्णधार :
- कॅप्टन कूल धोनीच्या यशस्वी पर्वानंतर आता टीम इंडियाची धुरा ‘कॅप्टन अॅग्रेसिव्ह’ विराट कोहलीकडे सोपवण्यात आली आहे.
- निवड समितीने 6 जानेवारी रोजी विराटची क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत कर्णधारपदी निवड केली.
- तसेच धोनीने कायम तंदुरुस्त खेळाडूंना प्राधान्य दिले. विराटचे तंदुरुस्तीसह अनुभवाकडेही लक्ष असल्याचे युवी, नेहराची निवड दर्शविते.
- आक्रमकता कायमच ऑस्ट्रेलियाकडे दिसते. ती टीम इंडियात येईल. स्टार अष्टपैलू युवराज सिंग आणि अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांचे संघात पुनरागमन झाले.
- मुंबईकर अजिंक्य रहाणेला एकदिवसीय संघात स्थान मिळाले असले तरी टी-20 संघातून मात्र त्याला वगळण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी कालवश :
- आपला वास्तववादी अभिनय आणि भारदस्त आवाज यामुळे चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते.
- ओम पुरी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 रोजी हरियानमधील अंबाल शहरात झाला होता. पंजाबमधील पटियाला येथून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले होते. नंतर 1976 मध्य त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमधून पुढील शिक्षण घेतले.
- तसेच त्यानंतर त्यांनी एका स्टुडिओमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी ‘मजमा’ या खासगी नाट्यमंडळाची स्थापना केली.
- घाशीराम कोतवाल या मराठी नाटकावर आधारित एका चित्रपटातून ओम पुरी यांनी कारकिर्दीची सुरवात केली.
- 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या आक्रोश चित्रपटातून पुरी यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला.
देशभरातील कलाकारांचा ‘कल्पना’ महोत्सव :
- भारतातील बहुआयामी आणि विवधांगी कलाप्रकार आणि हस्तकलांची ओळख मुंबईकरांना करून देण्याच्या हेतूने टाटा ट्रस्टतर्फे प्रथमच ‘कल्पना’ या दोन दिवसांच्या कला हस्तव्यवसाय महोत्सवाचे आयोजन मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात करण्यात आले आहे.
- एरवी मुंबईसारख्या शहरी भागांना भारतातल्या अनेक कलाकार आणि कारागिरांच्या कामगिरीबाबत फारशी माहिती नसते.
- भारतासारख्या हजारो प्रकारच्या कला, हस्तव्यवसाय आणि परंपरांचा अंतर्भाव असलेल्या देशाची महती मुंबईकरांना व्हावी, हाच ‘कल्पना’ महोत्सवामागील उद्देश आहे.
- काळा घोडा येथील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयाच्या प्रांगणात 7 व 8 जानेवारी रोजी आयोजित महोत्सवात देशातील तीन ठिकाणचे कलाप्रकार आणि दहा ठिकाणच्या हस्तव्यवसाय कारागिरांची कामगिरी पाहायला मिळेल.
- तसेच याअंतर्गत बंगलोर येथील अट्टाक्कालरी सेंटर फॉर मूव्हमेंट आर्ट, भोपाळ येथील भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे देणारी धृपद संस्थान आणि कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील निनासम रंगभूमी समूहाचा समावेश असेल.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अभय आपटे :
- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी अभय आपटे, सचिवपदी रियाझ बागवान, उपाध्यक्षपदी विजयकुमार ताम्हाणे आणि चंद्रकांत मते यांची निवड झाली आहे.
- एमसीएने बोलाविलेल्या तातडीच्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली. न्या. लोढा समितीच्या शिफारशींनुसार, संघटनेत 9 वर्षे पूर्ण झालेल्या पदाधिकाऱ्यांना यापुढे पद भूषविता येणार नसल्याचा आदेश अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या आदेशाची अंमलबजावणी करीत अजय शिर्के यांनी एमसीएचे अध्यक्षपद सोडले.
- सुधाकर शानभाग यांनी सचिवपदाचा तसेच धनपाल शाह आणि कमलेश ठक्कर यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याजागी अनुक्रमे बागवान, ताम्हाणे आणि मते यांची निवड झाली आहे.
- ताम्हाणे हे पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे सचिव असून यांच्या रूपात पीवायसीतील पदाधिकार्याची प्रथमच एमसीएच्या मोठ्या पदावर निवड झाली आहे.
दिनविशेष :
- गॅलिलिओकडून गुरु ग्रहाचा शोध 7 जानेवारी 1610 मध्ये लागला.
- 7 जानेवारी 1920 हा लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्मदिन आहे.
- भारतीय लेखिका शोभा डे यांचा जन्म 7 जानेवारी 1948 रोजी झाला.
- 7 जानेवारी 1992 रोजी विश्वनाथ आनंदला ग्रॅन्डमास्टर हा दर्जा प्राप्त झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा