Current Affairs of 6 August 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2016)

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2016)

अभिनव बिंद्राकडे भारतीय पथकाचे नेतृत्व :

 • रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने तिरंगा हाती घेऊन अभिमानाने 119 भारतीय खेळाडूंच्या पथकाचे नेतृत्व केले.
 • ब्राझीलमधील रिओ दी जानिरो शहरात होत असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार (दि॰5) पार पडला.
 • तसेच या ऑलिंपिकमध्ये भारताचे 119 खेळाडूंचे पथक दाखल झाले असून, आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे पथक आहे.
 • अभिनव बिंद्रा यंदा पाचव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहे. त्याला यंदा भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला होता.
 • उद्घाटन सोहळ्यात भारतीय पुरूष खेळाडू ब्लेझर आणि ट्राऊझरमध्ये दिसून आले, तर महिला खेळाडूंनी साडीला पसंती दिली होती.
 • प्रसिद्ध मराकाना मैदानावर स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा रंगला. ब्राझीलच्या संस्कृतीचे दर्शन या सोहळ्यातून घडले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 ऑगस्ट 2016)

माणिकराव ठाकरे विधान परिषदचे उपसभापति :

 • विधान परिषदेच्या उपसभापतिपदावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांची निवड झाली.
 • सभागृहात मतदान प्रक्रिया सुरू होताच भाजपचे सुजितसिंह ठाकूर यांनी भाजप उमेदवार भाई गिरकर यांची उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले.
 • तसेच या वेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माणिकराव यांची एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले.
 • उपसभापतिपदासाठी कॉंग्रेसकडून माणिकराव ठाकरे, तर भाजपकडून विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.
 • विधान परिषदेतील संख्याबळानुसार कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांची निवड बिनविरोध होण्याची शक्‍यता असतानाच भाजपने उमेदवार उभा केल्याने सभागृहात मतदानाची प्रक्रिया पार पडली.

कादंबरीला अमेरिकेकडून प्रतिष्ठित शिष्यवृत्ती :

 • नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कादंबरी भुजबळ हिची अमेरिका सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘केएल- येस प्रोग्रॅम’साठी (केनेडी ल्युगर युथ एक्‍स्चेंज अँड स्टडी) निवड झाली आहे.
 • त्याअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसह तिला एक वर्षाच्या कालावधीसाठी अमेरिकेत शिक्षण घेता येणार आहे.
 • एक वर्षाच्या कठीण निवड प्रक्रियेतून तिची निवड झाली आहे. त्यात विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान, संभाषण कौशल्य, भारतीय संस्कृतीचे ज्ञान, आत्मविश्वास या गुणांच्या आधारे निवड केली जाते.
 • ‘के एल येस प्रोग्रॅम’ हा भारत आणि अमेरिका या देशांमध्ये राबविण्यात येणारा आणि परस्पर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
 • दरवर्षी भारतातून या उपक्रमासाठी 40 विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

मुंबईमध्ये पहिली अधिकृत ‘योगशाळा’ :

 • भारतीय परंपरेत योग अभ्यासाचे महत्त्व विशद केले आहे.
 • योग ही देशाची प्राचीन कला आहे. याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
 • तसेच त्याचा एक भाग म्हणजे प्रशासकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात जगातील सर्वांत जुन्या सांताक्रूझच्या योग इन्स्टिट्यूटला पहिले अधिकृत योग स्कूल म्हणून मान्यता मिळाली आहे.
 • जगभरात दर्जेदार प्रमाणपत्रीय योग शिकवण्यासाठी, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियातर्फे (क्यूसीआय) योग प्रमाणपत्रीय योजना आणली आहे.
 • प्रशासकीय प्रमाणपत्रीय अभ्यासक्रम घेणारी अधिकृत संस्था म्हणून योग स्कूलला पहिल्यांदा प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
 • 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.

‘जीएसटी’साठी महाराष्ट्राचे विशेष अधिवेशन :

 • ऐतिहासिक वस्तू व सेवाकर (जीएसटी) घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन पुढील आठ-दहा दिवसांत बोलावले जाणार आहे.
 • ता. दहानंतर लवकरात लवकर हे अधिवेशन बोलावण्याची सूचना केंद्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
 • भाजपशासित राज्यांच्या मागे लवकरात लवकर अधिवेशन बोलवा, असा दट्ट्याच केंद्राने लावल्याचे चित्र आहे.
 • राज्यसभेतील ऐतिहासिक मंजुरीवेळी तिकडे न फिकरकेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (दि.8) लोकसभेतील चर्चेत मात्र स्वतः यावर बोलणार आहेत.
 • ‘जीएसटी’ घटनादुरुस्ती व नंतरची तीन प्रत्यक्ष ‘जीएसटी’ विधेयके मंजूर करण्याचे संसदीय सोपस्कार पार पाडून एक एप्रिल 2017 पासून कोणत्याही स्थितीत ‘जीएसटी’ लागू करायचेच, असा ध्येय मोदींनी बांधला आहे.

शुभा मुदगल यांची राजीव गांधी सद्भावना पुरस्कारासाठी निवड :

 • हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका शुभा मुदगल यांची राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
 • सामाजिक ऐक्य, शांतता व सदिच्छा यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना मिळणार असलेल्या या पुरस्काराचे स्वरूप रोख 10 लाख रुपये व मानपत्र असे आहे.
 • राजीव गांधी सद्भावना पुरस्कार सल्लागार समितीच्या गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत मुदगल यांना या पुरस्कारने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.