Current Affairs of 8 August 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2016)

चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2016)

पंतप्रधानच्या हस्ते ‘मिशन भगीरथ’चे उदघाटन :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (दि.7) मिशन भगीरथच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
  • राज्यात प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी पाईपलाईनद्वारे पुरविण्याचा हा तेलंगण सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
  • गजवेल विधानसभा मतदार संघातील कोमतीबांदा (जिल्हा मेदक) खेड्यात मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण झाले.
  • मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
  • तसेच यावेळी मोदी यांच्या हस्ते हैदराबाद ते करीमनगर या 152 किलोमीटर लांबीच्या मनोहराबाद-कोथापल्ली नव्या रेल्वमार्गाचा पायाभरणी समारंभ, राष्ट्रीय औष्णीक वीज महामंडळाच्या तेलंगणा सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाचा (टप्पा-1), वरंगल येथील रामगुंडम, कलोजी नारायण राव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस व रामगुंडम खत कारखान्याच्या कोनशिलेचे अनावरणही झाले.
  • 2014 मध्ये तेलंगण राज्याची स्थापना झाल्यानंतर मोदी यांची ही पहिलीच भेट होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2016)

ऑलिम्पिकमध्ये दीपा कर्माकरला अंतिम फेरीत स्थान :

  • रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिला दिवस भारतासाठी निराशजनक गेला होता, तसेच दुसऱ्या दिवशी भारताच्या पदरी निराशाच आली.
  • पण दीपा कर्माकरने जिम्नॅस्टिक्‍स वॉल्टमध्ये चोख कामगीरी करत अंतिम फेरीच्या पात्रता फेरीत 8 व्या क्रमांकावर राहत स्पर्धेतील आपले आव्हान जिंवत ठेवले आहे.
  • जिम्नॅस्टिक्‍सच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय महिला ठरली आहे.
  • 14.850 गुणासह दीपाने 8 वे स्थान कायम ठेवले.
  • रिओच्या 52 वर्षात भारतातर्फे जिम्नॅस्टिक्‍स सपर्धेत खेळणारी दीपा पहिली महिला खेळाडू आहे.
  • जिम्नॅस्टिक्‍स महिला पात्रता फेरीतील सबडिव्हिजन 3 मध्ये उत्कृष्ठ प्रदर्षन करताना दीपाने 14.85 गुण मिळवले.

‘ग्रॅंटस इन एड’ योजना सरकारकडून बंद :

  • वाजपेयी सरकारने सुरू केलेली आदिवासी प्राथमिक शाळांसाठी निधी देण्याची आधीच्या भाजप सरकारचीच योजना सरकारने बंद केली आहे.
  • वर्षाला 16 लाख रुपये अनुदान देणारी ही ‘ग्रॅंटस इन एड’ योजना आदिवासी विकास मंत्रालयाने एकदम बंद केली.
  • परिणामी, देशभरातील अशा शेकडो शाळा, तेथील शिक्षक-कर्मचारी व त्या वाटेवरून शिक्षणाच्या प्रवाहात येणारी आदिवासी बालके यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
  • तसेच महाराष्ट्रात अशा सुमारे 14 शाळा आहेत.
  • प्राथमिक शाळा चालविण्यासाठी वनवासीबहुल भागांत निवासासाठी स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी केंद्राकडून जाणारा हा निधी आहे.

राज्यातील पहिला पतंजली मॉल बीडमध्ये :

  • रामदेव बाबांच्या पतंजलीचा राज्यातील पहिला मॉल सुरू करण्याचा मान बीडला मिळाला असून, (दि.7) रोजी येथील सुभाष रोडवरील छत्रपती संकुलात सुरू झाले.
  • पतंजलीचे राज्याचे प्रभारी अ‍ॅड. श्रीराम लाखे यांच्या संकल्पनेतून हा मॉल सुरू करण्यात आला आहे.
  • नारायणगडाचे ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या हस्ते मॉलचे उद्घाटन करण्यात आले.
  • ग्राहकांना एकाच छताखाली आता पतंजलीचे 480 प्रॉडक्टस याठिकाणी मिळणार असून, याच ठिकाणी पतंजली चिकित्सालयही कार्यरत राहणार आहे.
  • बीड शहरात पतंजली योग समितीच्या वतीने सतत वेगवेगळे उपक्रम सुरू असतात.
  • सध्या शहरात 365 दिवसांचे योग शिबीरही सुरू असून, यालाही लोकांचा चांगला प्रतिसाद आहे.

चीनला हवी भारताची मदत :

  • आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनने भारतावर नेहमीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
  • मात्र आता दक्षिण चीनवरील मालकी हक्क मिळविण्यासाठी चीनने खुद्द भारताकडे मदत मागितली आहे.
  • तसेच यासाठी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी 12 ऑगस्टपासून भारताच्या दौऱ्यावर येत आहेत.
  • यी यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
  • तसेच जी-20 देशांच्या बैठकीमध्ये भारताने दक्षिण चीनचा मुद्दा उचलून धरण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
  • भारताने या मुद्द्यावर आपल्या बाजूने राहावे, अशी अपेक्षा चीनकडून व्यक्त केली जात आहे.
  • काही दिवसांपूर्वी हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाने दक्षिण चीन समुद्रावर चीनने केलेला दावा अयोग्य असून, त्याला कायदेशीर व ऐतिहासिक आधार नसल्याचा निकाल दिला होता.
  • चीनविरोधात फिलिपिन्सने खटला दाखल केला होता. खटल्याचा निकाल फिलिपिन्सच्या बाजूने लागताच चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग व परराष्ट्रमंत्रालयाने तो निकाल आपल्यावर बंधनकारक नसल्याचे सांगत निकाल मान्य करण्यास साफ नकार दिला होता.

आता राज्यात सुरू होणार 15 सायबर लॅब :

  • ऑनलाइन गुन्ह्यांचा तातडीने शोध लावण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सायबर लॅब निर्मितीची प्रक्रिया राज्यात वेगात सुरू आहे.
  • नागपूरसह ठिकठिकाणच्या 15 सायबर लॅबचे काम अंतिम टप्प्यात असून, या स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्टला त्या कार्यान्वित होणार आहेत.
  • तसेच त्यामुळे आता पोलिसांना ‘फॉरेन्सिक लॅब’च्या अहवालांवर महिनोंमहिने अवलंबून राहावे लागणार नाही.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पोलीस दल स्मार्ट बनविण्याची योजना जाहीर केली होती.
  • योजनेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या ‘सायबर लॅब’ची निर्मिती प्रत्येक जिल्हा पोलीस मुख्यालयी करण्यात येणार आहे.

दिनविशेष :

  • 1921 : वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1932 : दादा कोंडके, मराठी लोकप्रिय अभिनेते यांचा जन्म.
  • 1940 : दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1949 : भुतानच्या राष्ट्राची स्थापना.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 ऑगस्ट 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.