Current Affairs of 5 August 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (5 ऑगस्ट 2016)
रिओ ऑलिंपिक स्पर्धेला सुरुवात :
- जगभरातील क्रीडाशौकिनांचे लक्ष लागून राहिलेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेला आज (दि.5) पासून सुरवात होत आहे.
- दक्षिण अमेरिकेतील एखाद्या देशात होणारी ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा आहे.
- निळाशार समुद्र आणि लुसलुशीत वाळूने अथांग पसरलेले बीच ही खऱ्या अर्थाने रिओची ओळख असली, तरी या स्पर्धेच्या निमित्ताने जागतिक क्रीडा नकाशावर रिओचे नाव ठळकपणे उमटणार आहे.
- जगभरातील खेळाडू आपले कौशल्य दाखवण्यासाठी येथे एकत्र आले असले, तरी त्यांच्या सहभागाने खऱ्या अर्थाने मैत्री आणि विश्वबंधुत्त्वाचा संदेशच दिला जाणार आहे.
- मात्र, ‘झिका’ विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने अनेक दिग्गज खेळाडूंनी घेतलेली माघार आणि स्पर्धेच्या ऐन तोंडावर उघडकीस आलेले रशियातील सर्वात मोठे ‘डोपिंग’ प्रकरण या सगळ्याचा परिणाम स्पर्धेवर निश्चित होईल.
- तसेच प्रसिद्ध मराकाना मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.
- ऑलिंपिक नगरीत –
- 206 सहभागी देश
- 1 संघ निर्वासितांचा
- 11,239 सहभागी खेळाडू
- 28 खेळ
- 308 क्रीडा प्रकार
Must Read (नक्की वाचा):
आयओसीच्या सदस्यपदी नीता अंबानी :
- रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांची रिओ ऑलिम्पिकच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) आठ नव्या सदस्यांमध्ये निवड झाली.
- आयओसीशी जुळलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
- नीता अंबानी भारतातून आयओसीच्या एकमेव सदस्य आहेत. त्या 70 वर्षांच्या होईस्तोवर आयओसीत कायम राहतील.
- तसेच येथे पार पडलेल्या आयओसीच्या 129 व्या सत्रात आयओसीच्या सदस्यपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
- आठ नव्या सदस्यांसह आयओसीची सदस्य संख्या 98 इतकी झाली.
भारतीय उपखंड अंटार्क्टिकाचा भाग होता :
- मानवी उत्क्रांतीच्याही आधी भारतीय उपखंड हा अंटार्क्टिकाचा भाग होता, त्यानंतर भूपृष्ठाच्या हालचालींमुळे तो अनेकदा या खंडापासून कधी दूर गेला, तर कधी जवळही आला, असा दावा भूगर्भसंशोधकांनी पुराव्यानिशी केला आहे.
- भारतीय आणि स्विस भूगर्भ संशोधकांचे एक पथक पृथ्वीच्या भूपृष्ठांची नेमकी कशा पद्धतीने उत्क्रांती होत गेली, यावर संशोधन करत असून, यासाठी काही दुर्मिळ खडकांच्या नमुन्यांचाही अभ्यास करण्यात आला होता.
- तसेच यातून खंडांच्या निर्मितीबाबत माहिती देणारे महत्त्वपूर्ण पुरावे संशोधकांच्या हाती लागले आहेत.
- या संशोधनाबाबत माहिती देताना आयआयटी खड्गपूरमधील भूगर्भ संशोधक देवाशिष उपाध्याय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, ‘प्रथमच अंटार्क्टिका खंड आणि भारतीय उपखंड एकच असल्याचे पुरावे आम्हाला प्राप्त झाले.’
- दीड अब्ज वर्षांपूर्वी ते परस्परांपासून दूर झाले, या दोन्ही खंडांदरम्यान आता विस्तीर्ण महासागर आहे.
- एकदा परस्परांपासून दूर झाल्यानंतर या दोन्ही खंडांची पुन्हा आपापसांत धडक झाली. या धडकेतूनच एक अब्ज वर्षांपूर्वी पूर्व पर्वत रांगांची साखळी निर्माण झाली, असेही त्यांनी नमूद केले.
जगातील सर्वांत मोठे हॉटेल मक्का शहरात उभारणार :
- मुस्लिमांचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या मक्का शहरात जगातील सर्वात मोठे निवासी हॉटेल उभे राहात असून सर्वकाही ठरल्याप्रमाणे पार पडल्यास ते पुढील वर्षी पाहुण्यांचे स्वागत करण्यास सज्ज होईल.
- मक्का शहराच्या मध्यवस्तीत मनाफिया भागात पवित्र काबापासून दोन किमी अंतरावर हे हॉटेल उभे असून राहत 10000 निवासी खोल्या असलेले सर्वात मोठे हॉटेल ठरेल.
- सौदी अरबस्तानच्या वित्त मंत्रालयाने तेथील राजघराण्याचा अत्यंत लाडका आणि महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प हाती घेतला असून त्यासाठी 3.5 अब्ज डॉलर एवढा प्रचंड खर्च केला जात आहे.
- इस्लामच्या मक्का व मदिना या दोन सर्वात पवित्र तीर्थस्थळांचे रखवालदार असे स्वत:ला म्हणवून घेणाऱ्या सौदी सरकारने या हॉटेलचे नावही इस्लामने प्रेरित होऊन ‘अबराज खुदाई’ (परमेश्वरी निवासस्थान) असे निवडले आहे.
- 7351 निवासी खोल्या असलेले मलेशियातील ‘फर्स्ट वर्ल्ड हॉटेल’ हे जगातील सध्या सर्वात मोठे हॉटेल मानले जाते.
रियोसाठी रशियाच्या 78 खेळाडूंना ‘ग्रीन सिग्नल’ :
- सरकार पुरस्कृत डोपिंगचा आरोप असलेल्या रशियन खेळाडूंसाठी (दि.4) संध्याकाळ अत्यानंदाची ठरली.
- स्पर्धा सुरू होण्यास 24 तासांपेक्षाही कमी अवधी शिल्लक असताना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने रशियाच्या 78 खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संमती दिल्याचे जाहीर केले.
- तसेच यात 29 जलतरणपटू, 18 नेमबाज प्रत्येकी 11 मुष्टियोद्धे व ज्युदो खेळाडू, 8 टेनिसपटू व एका गोल्फ खेळाडूचा समावेश आहे.
दिनविशेष :
- 1815 : एडवर्ड जॉन आयर, इंग्लिश शोधक यांचा जन्म.
- 1890 : दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक यांचा जन्म.
- 1901 : पीटर ओ’कॉनोरने 24 फूट 11.75 ईंच लांब उडी मारून विश्वविक्रम रचला.
- 1914 : जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात सुरू झाला.
- 1960 : बर्किना फासोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा