Current Affairs of 5 May 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (5 मे 2016)

चालू घडामोडी (5 मे 2016)

रोजगारनिर्मितीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक :

 • रोजगारनिर्मितीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिला असून, कर्नाटक यात प्रथम क्रमांकावर आहे.
 • 2015-16 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कर्नाटकने 24 टक्‍क्‍यांहून अधिक रोजगारनिर्मिती करत पहिला क्रमांक पटकाविला, तर महाराष्ट्राने 23 टक्के रोजगारनिर्मिती केल्याची माहिती असोचॅमने केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे.
 • महाराष्ट्रानंतर तमिळनाडूने 10.5 टक्के रोजगारनिर्मिती करत तिसरा क्रमांक पटकाविला असून, आंध्र प्रदेश आणि तेलंगणने नऊ टक्के, हरियाणाने आठ टक्के, तर उत्तर प्रदेशने 7.5 टक्के रोजगारनिर्मिती केली आहे.
 • तसेच या क्रमवारीत गुजरात मात्र मागे पडला असून, रोजगारनिर्मितीत राज्याचा सातवा क्रमांक आला आहे.
 • जानेवारी ते मार्च 2016 दरम्यान देशात एकूण 8.88 लाख रोजगार निर्माण झाल्याचेही असोचॅमने म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 मे 2016)

प्रधानमंत्री आवास योजनेत 2,508 शहरांची निवड :

 • शहरी भागातील गरिबांना स्वस्त घरे देण्यासाठी “प्रधानमंत्री आवास योजना” अंतर्गत 26 राज्यातील 2,508 शहरांची निवड करण्यात आल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली.
 • नागरी विकासमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी प्रश्‍न तासादरम्यान सांगितले की, गेल्या 25 एप्रिल रोजी देशातील 2,508 शहरांची नोंद या योजनेंतर्गत झाली आहे.
 • शहरी भागातील गरिबांना स्वस्त घरे मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
 • तसेच या योजनेंतर्गत जी घरे बांधण्यात येणार आहेत, ती अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार आहेत.
 • वादळ, महापूर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तींचा विचार करूनच ही घरे बांधण्यात येणार आहेत.

भारतीय संघाची आयसीसी क्रमवारीत घसरण :

 • आयसीसीच्या एकदिवसीय, कसोटी आणि टी 20 क्रमवारीत भारतीय संघाची घसरण झाली आहे.
 • आयसीसीने आपली वार्षिक क्रमवारी (दि.4) जाहीर केली आहे.
 • भारताची टी-20 च्या प्रथम क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे तर एकदिवसीय क्रमवारीत 4 थ्या स्थानी आणि कसोटीत प्रथम क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.  
 • न्युझीलंड सध्या प्रथम क्रमांकावर विराजमान झाले आहे.
 • टी 20 मध्ये भारत आणि न्युझीलंडचे गुण 132 आहेत. पण दशअंश अंकाच्या फरकाने भारताची दुसऱ्या स्थानी घसरण झाली.
 • गेल्या वर्षी एकदिसिय विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा संघ 124 गुणासह एकदिवसिय क्रमवारीत प्रथम क्रमांकावर विराजमान आहे.
 • न्युझीलंड 113 गुणासह दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका तिसऱ्या आणि भारत चौथ्या स्थानावर आहे.

नागपूरच्या ‘फर्स्ट सिटी’ प्रकल्पाचे पुनरुज्जीवन :

 • नागपूरच्या मिहान प्रकल्पातील गेली काही वर्षे रखडलेल्या ‘फर्स्ट सिटी’ या खासगी गृहनिर्माण प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) (दि.4) मान्यता देण्यात आली.
 • आता या प्रकल्पासाठी आयजेएम या मलेशियन कंपनीचे सहाय्य लाभणार आहे.
 • चौरंगी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या अतुल शिरोडकर यांच्या कंपनीने हा गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतला होता.
 • तसेच प्रकल्पाबाबत तक्रारी आल्यानंतर आधीच्या आघाडी सरकारने मिहान आणि या कंपनी दरम्यान झालेला करार रद्द केला होता.
 • प्रकल्प रखडल्यानंतर फ्लॅटधारकांनी मिहान आणि चौरंगी कंपनीविरुद्ध पोलिसांत तक्रारी केल्या होत्या.
 • शिरोडकर यांनी गेल्या 30 मार्च रोजी सरकारला नवीन प्रस्ताव दिला.
 • एमएडीसीच्या बैठकीत त्याला तत्त्वत: मान्यता देण्यात आली.

वीज उत्पादनात पारस केंद्राचा नवे उच्चांक :

 • महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मितीच्या पारस औष्णिक केंद्राने एप्रिल 2016 या महिन्यात वीज उत्पादनाचा सर्वोच्च उच्चांक गाठला.
 • तसेच या केंद्रातील 250 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक 3 ने 174.897 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती आणि 97.155 टक्के भारांक, तर 250 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक 4 ने 175.769 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती आणि 87.769 टक्के भारांक गाठला आहे.
 • तसेच यामुळे मे 2013 मधील पारस वीज केंद्राचा यापूर्वीचा महत्तम वीज उत्पादनाचा व भारांकाचा विक्रम मोडीत निघाला आहे.
 • देशातील विविध केंद्रांमधील गत वर्षभरातील भारांकामध्ये पारस वीज केंद्र अठराव्या स्थानावर असून, महानिर्मितीच्या विविध वीज केंद्रांतील महत्तम भारांकामध्ये प्रथम स्थानावर आहे.
 • वीज क्षेत्रातील वाढती स्पर्धा, वीज नियामक आयोगाचे निकष, स्वच्छ आणि स्वस्त वीज उत्पादनाचे ध्येय गाठण्याकरिता महानिर्मिती मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली गत वर्षभरापासून पारसचे मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी नियोजनबद्ध पाऊले उचलली.

विजय माल्ल्यांनी दिला खासदारीकीचा राजीनामा :

 • बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात जाऊन बसलेले उद्योगपती विजय माल्ल्या यांचा राजीनामा (दि.4) राज्यसभेत स्विकारण्यात आला.
 • राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांच्याकडून माल्ल्यांचा राजीनामा स्विकारण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष पी.जे. कुरियन यांनी सभागृहात दिली.
 • तसेच या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही राज्यसभा अध्यक्षांकडून देण्यात आले.
 • राज्यसभेच्या शिस्तपालन समितीकडून विजय माल्ल्या यांना आपली बाजू मांडण्यासाठीची नोटीस पाठविण्यात आली होती.
 • बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात जाऊन बसल्याने माल्ल्या यांच्या खासदारकीवर गदा येणार हे जवळपास स्पष्ट झाले होते.
 • मात्र, तसा निर्णय येण्याआधीच माल्ल्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा सभापतींकडे पाठवून दिला होता.
 • दरम्यान, गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाकडून माल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला.
 • सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विनंतीवरून माल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला, तर संप्पत्तीची संपूर्ण माहिती बँकांना देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने माल्ल्या यांना दिले आहेत.

दिनविशेष :

 • 1818 : कार्ल मार्क्स, जर्मन तत्त्वज्ञानी यांचा जन्म.
 • 1838 : गुयाना पासून भारतीय आगमन दिन.
 • 1901 : विष्णू दिगंबर पलुस्करबुवा यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
 • 1916 : ज्ञानी झैलसिंग, भारतीय राष्ट्रपती यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 मे 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.