Current Affairs of 6 May 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (6 मे 2016)
जगातील सर्वोत्तम प्रतिष्ठेच्या विद्यापीठांची यादी जाहीर :
- ‘टाइम्स’ या संस्थेने जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या शैक्षणिक संस्थांची या वर्षासाठीची यादी प्रसिद्ध केली आहे.
- प्रतिष्ठीत विद्यापीठांच्या यादीत अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे, या विद्यापीठाने सलग तिसऱ्या वर्षी हा मान मिळविला आहे.
- तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरही अमेरिकेमधील विद्यापीठे असून, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि स्टॅनफोर्ड यांना तो मान मिळाला आहे.
- मागील वर्षी या क्रमांकांवर असलेली ब्रिटनमधील जगप्रसिद्ध केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांना अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक मिळाला आहे.
- भारतातील एकाही विद्यापीठाला या यादीत नाव आणता आलेले नाही.
- जगातील 133 देशांमधील दहा हजार तज्ज्ञांच्या साह्याने ही यादी तयार केली जाते.
- पहिल्या शंभरमध्ये पोचण्यासाठी वास्तवाशी आणि आधुनिक जगाशी संबंधित संशोधन जागतिक स्तरावर प्रसिद्ध करणे, संशोधनाच्या वैश्विकतेवर भर, व्यावसायिकता आणि विद्यापीठाच्या यशाचा प्रभावी प्रचार या गोष्टींची आवश्यकता असते.
- प्राचीन विद्यापीठांचा वारसा असणाऱ्या भारताची कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा निराशाजनक झाली आहे.
- भारतातील एकाही विद्यापीठाचे नाव जरी यादीत नसले, तरी आशियातील 18 विद्यापीठे या यादीत आहेत.
- जपान विद्यापीठ यादीत बाराव्या क्रमांकावर असून, चीनमधील दोन विद्यापीठांनीही 18 आणि 21 वे स्थान पटकाविले आहे.
- चीनमधील एकूण पाच विद्यापीठांचा, तर रशियाच्या तीन विद्यापीठांचा यादीत समावेश आहे.
- तसेच यादीमध्ये अमेरिका आणि ब्रिटनमधील विद्यापीठांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):
केंद्र सरकार जहाज क्षेत्राला पायाभूत उद्योगाचा दर्जा देणार :
- जहाज क्षेत्राला पायाभूत उद्योगाचा दर्जा देण्याविषयीची राजपत्रीय अधिसूचना केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाने जारी केली आहे.
- तसेच यानुसार मालवाहतूक या गटात शिपयार्ड हा नवा गट समाविष्ट करण्यात आला आहे.
- यामुळे आता या क्षेत्रातील कंपन्यांना स्वस्त दरात व दीर्घ मुदतीने निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- सध्या या कंपन्यांना 14 ते 15 टक्के दराने निधीचा पुरवठा होत आहे.
- एल अँड टी, रिलायन्स डिफेन्स अँड इंजिनियरिंग शिपयार्ड तसेच एबीजी शिपयार्ड यासारख्या खासगी कंपन्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
- जहाज क्षेत्राचा समावेश झाल्यामुळे मालवाहतूक गटामध्ये एकूण सात उद्योगक्षेत्रे तयार झाली आहेत.
- तसेच यामध्ये रस्ते व पूल, बंदरे, शिपयार्ड, देशांतर्गत जलमार्ग, विमानतळ, रेल्वे ट्रॅक व नागरी सार्वजनिक परिवहन सेवा यांचा समावेश झाला आहे.
- जहाज क्षेत्राला पायाभूत उद्योगाचा दर्जा मिळाल्यामुळे मेक इन इंडिया मोहिमेलाही याचा लाभ मिळणार आहे.
नौदलप्रमुखपदी सुनील लान्बा यांची नियुक्ती :
- व्हाइस ऍडमिरल सुनील लान्बा यांची (दि.5) नौदलप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.
- लान्बा हे सध्या नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे प्रमुख होते.
- सध्याचे नौदलप्रमुख आर. के. धोवन हे 31 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्या दिवशी लान्बा पदभार स्वीकारतील.
- लान्बा हे नौकानयनशास्त्रातील तज्ज्ञ समजले जातात.
- सिकंदराबाद येथील ‘डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज’चे ते माजी विद्यार्थी आहेत.
- ‘आएनएस सिंधुदुर्ग’ व ‘आयएनएस दुनागिरी’वर त्यांनी काम केले आहे.
- तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी बजावलेल्या विशेष कामगिरीमुळे त्यांना परम विशिष्ट सेवा पदक व अति विशिष्ट पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
- हिंदी महासागरात भारताच्या वाढत्या प्रभावाला चीनकडून आव्हान दिले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर लान्बा यांची नौदलप्रमुखपदी झालेली निवड महत्त्वाची मानली जात आहे.
व्यवसायाच्या परवण्यासाठी व्यापार सुलभीकरण करार :
- उद्योग, व्यवसाय सुरु करण्यापूर्वी घ्यावे लागणारे परवाने ना हरकतीची प्रमाणपत्रे यासाठी होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ‘व्यापार सुलभीकरण करार’ करण्यात आला आहे.
- तसेच यामुळे संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता येणार आहे, त्याचबरोबर लालफितीच्या कारभारापासून मुक्तता होणार आहे.
- कोणताही व्यापार, उद्योग सुरु करण्यापूर्वी अनेक परवाने घ्यावे लागतात.
- ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत झाली आणि उद्योजकांना सुलभतेने परवाने मिळू लागले तर व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण तयार होईल.
- या करारामुळे देशातील लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग आता अगदी सहजपणे प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील साखळी उत्पादकांशी जोडले जाऊ शकणार आहेत.
- तसेच उद्योग सुरु करण्यासंबंधी कायदेशीर परवाने त्वरित देण्याची प्रक्रियाही ‘व्यापार सुलभीकरण करारामुळे’ होणार आहे.
पुण्याचा दिल्लीवर दणदणीत विजय :
- रायझिंग पुणे सुपरजायंट्सनं दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 19.1 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 166 धावा काढून दणदणीत विजय मिळवला आहे.
- दिल्ली डेअरडेव्हिल्सन दिलेलं 163 धावांचं लक्ष्य रायझिंग पुणे सुपरजायंट्सनं भेदक फलंदाजीच्या जोरावर भेदलं.
- कॅप्टन धोनीने 20 चेंडूंमध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांसह 27 धावांची आघाडी उभारली.
- तर रहाणेनं नाबाद खेळत 48 चेंडूंत 7 चौकार मारून 63 धावा काढत हाफ सेंच्युरी केली.
- तिवारीनं प्रत्येकी 1 चौकार आणि 1 षटकार लगावत 21 धावा केल्या.
- तर पेरेरानंही अटीतटीच्या लढतीत शेवटपर्यंत नाबाद खेळत 5 चेंडूंत 2 शानदार षटकार मारत 14 धावा काढल्या.
- रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर दिल्लीची अनुभवी तगडी फलंदजी ढासळली, दिल्लीने निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 162 धावांचा आवाहन पुणेला दिला होता.
दिनविशेष :
- 1861 : मोतीलाल नेहरु यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा