Current Affairs of 4 May 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (4 मे 2016)
सचिन तेंडुलकर रिओ ऑलिंपिकचा गुडविल ऍम्बेसिडर :
- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचीही भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी सदिच्छा दूत (गुडविल ऍम्बेसिडर) म्हणून निवड केली आहे.
- रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय संघासाठी सदिच्छा दूत करण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेने बॉलीवूड अभिनेता सलमान खान व नेमबाज अभिनव बिंद्रा यांच्यानंतर आता सचिनची निवड केली आहे.
- सचिननेही आयओएची ही विनंती मान्य करत सदिच्छा दूत बनण्याची तयारी दर्शविली आहे.
- सलमान खानची सदिच्छा दूतपदी निवड केल्यानंतर आयओएवर टीका करण्यात आली होती.
- तसेच त्यानंतर अभिनव बिंद्रा आणि आता सचिन तेंडुलकर या क्रीडापटूंची निवड करण्यात आल्याने वाद मिटण्याची शक्यता आहे.
- संगीतकार ए. आर. रेहमान यांनाही सदिच्छा दूत होण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):
जगातील सर्वांत छोटे इंजिन विकसित :
- जगातील सर्वांत लहान आकाराचे इंजिन तयार करण्यात शास्त्रज्ञांच्या एका गटाला यश आले आहे.
- एका मीटरच्या काही अब्जावा भाग इतके लहान हे इंजिन आहे. प्रकाशाच्या ऊर्जेवर हे चालते.
- तसेच या इंजिनचा वापर करून नॅनो यंत्रे बनवता येतील, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.
- अशी यंत्रे पाण्यामध्ये सोडून पर्यावरणाचा अभ्यास करता येईल; तसेच पेशींमध्येही हे यंत्र बसवून रोगांबाबत संशोधन करता येईल.
- हे इंजिन सध्या प्रायोगिक तत्त्वावर तयार केले असले तरी त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यास तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होईल.
- शास्त्रज्ञांनी तयार केलेले हे छोटे इंजिन सोन्याच्या भारीत कणांपासून तयार केले आहे.
- जेलच्या स्वत्त्रूपातील पॉलिमरच्या साह्याने त्यांना एकत्र बांधून ठेवले आहे.
- लेझरच्या साह्याने हे नॅनो इंजिन तापविले जाते, त्या वेळी काही सेकंदांच्या अवधीत हे इंजिन मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवून ठेवते.
- केंब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.
मेडिकल कौन्सिलवर निगराणी समितीची देखरेख :
- मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या सर्व वैधानिक कामांवर देखरेख करण्यासाठी तीन सदस्यांची एक खास निगराणी समिती नेमण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला.
- निवृत्त सरन्यायाधीश न्या. आर. एम. लोढा, ‘इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अॅण्ड बिलियरी सायन्सेस’चे संचालक प्रा. (डॉ.) शिव सरीन आणि देशाचे माजी नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) विनोद राय हे या समितीचे सदस्य असतील.
- तसेच या समितीच्या स्थापनेची औपचारिक अधिसूचना सरकारने दोन आठवड्यांत काढावी, समितीला त्यांचे काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा पुरव्यात आणि समिती सदस्यांना द्यायच्या मेहतान्याची रक्कम त्यांच्याच सल्ल्यानुसार ठरवावी, असे न्यायालयाने सांगितले.
- मध्य प्रदेशातील मॉडर्न डेन्टल कॉलेजसह अन्य काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी केलेली अपिले फेटाळताना न्या. अनिल आर. दवे, न्या. ए. के. सिक्री, न्या. आर. के. अगरवाल, न्या. आदर्श कुमार गोयल व न्या. आर. भानुमती यांच्या घटनापीठाने हा आदेश दिला.
- मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्याने स्थापन झालेली देशपातळीवरील शीर्षस्थ वैधानिक संस्था आहे.
- वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देणे, त्यांचे नियमन करणे, वैद्यकीय अभ्यासक्रम ठरविणे व त्याचा दर्जा राखणे इत्यादी वैधानिक कामे मेडिकल कौन्सिल करीत असते.
केंद्र सरकार जम्मूमध्ये IIT स्थापण होणार :
- जम्मू-काश्मीरच्या सरकारनं 1 मे रोजी जम्मूमध्ये आयआयटी स्थापन करण्यासाठी दिल्लीच्या आयआयटीशी करार केला आहे.
- दिल्लीतल्या आयआयटीच्या उच्च शिक्षण विभागाचे प्राध्यापक व्ही. रामगोपाल राव आणि जम्मूच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव हेमंत कुमार शर्मा यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या आहेत.
- तसेच हा करार जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे.
- आम्ही जम्मूत आयआयटी स्थापन करण्यासाठी सर्व परवानग्या मिळवून देऊन सर्वतोपरी सहकार्य करू, असंही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं सांगितलं आहे.
- आयआयटी स्थापन करण्यासाठी जग्तीतल्या नगरोट्यात जवळपास 625 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- जम्मूमध्ये आयआयटी स्थापन झाल्यास भारतात तिला 23वा क्रमांक मिळणार आहे.
यंदा भारताचे 86 खेळाडू रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र :
- ऑलिम्पिक कांस्यपदकविजेती सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यासह 7 बॅडमिंटनपटू ब्राझीलच्या रिओमध्ये यंदा ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.
- ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंची एकूण संख्या आता 86 झाली आहे.
- लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदकविजेती सायना व सिंधू (विश्व क्रमवारीत अनुक्रमे आठवे व दहावे स्थान) यांचा अव्वल 10 खेळाडूंमध्ये समावेश आहे.
- किदांबी श्रीकांत पुरुष एकेरीच्या क्रमवारीत 11व्या स्थानी, तर महिला दुहेरीची जोडी ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा 15व्या स्थानी आहे.
- मनू अत्री व बी. सुमीत रेड्डी पुरुष दुहेरीच्या मानांकनामध्ये 19व्या स्थानी आहेत.
- तसेच या सात खेळाडूंनी बॅडमिंटन स्पर्धेसाठी रिओ ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे.
- लंडन ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत भारतातर्फे एकमेव कांस्यपदक सायना नेहवालने पटकावले होते.
63 व्या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण :
- अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता तर कंगना रानावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले.
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हे 63 व्या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण (दि.3) झाले.
- मनोज कुमार यांना सुवर्ण कमळ व रोख दहा लाख रुपये असा चित्रपटसृष्टीतील हा सर्वोच्च व मानाचा असा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- अमिताभ बच्चन यांना ‘पिकू’ चित्रपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, रजत कमळ व 50 हजार रुपये रोख असा हा पुरस्कार आहे.
- तसेच यापूर्वी बच्चन यांनी 1990 (अग्निपथ), 2005 (ब्लॅक) आणि 2009 मध्ये (पा) हा पुरस्कार मिळविला होता.
- ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ चित्रपटातील भूमिकेसाठी कंगना रानावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
- तसेच यापूर्वी कंगनाने ‘फॅशन’ आणि ‘क्वीन’ चित्रपटातील भूमिकांसाठी हा पुरस्कार मिळविला होता.
- ‘बाहुबली’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार मिळविला. दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि निर्माते शोभू यारलागद्दा आणि प्रसाद देवीनेनी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
- संजय लीला भन्साळी यांनी ‘बाजीराव मस्तानी’ या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवरील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला.
- सर्वोत्कृष्ट मनोरंजन वर्गात ‘बजरंगी भाईजान’ ने पुरस्कार मिळविला.
दिनविशेष :
- 1941 : राष्ट्र सेवादल दिवस.
- 1970 : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- हुतात्मा दिन.
- विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन.
- फिनलंड सेना दिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा