Current Affairs of 5 April 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (5 एप्रिल 2016)
जगातील पहिले ‘व्हाईट टायगर सफारी’ पार्क :
- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी (दि.3) ‘व्हाईट टायगर सफारी’ पार्कचे उदघाटन केले.
- सत्ना जिल्ह्यातील मुकूंदपूरमध्ये हे व्हाईट टायगर सफारी पार्क उभारण्यात आले आहे.
- फक्त पांढर्या वाघांसाठी सुरु करण्यात आलेले जगातील हे असे पहिले पार्क आहे.
- येथील विंध्य भागामध्ये 100 वर्षापूर्वी पहिला वाघ आढळला होता.
- तसेच या पार्कच्या उभारणीसाठी 50 कोटी रुपये खर्च आला असून, 25 हेक्टर परिसरामध्ये हे पार्क पसरले आहे.
- व्हाईट टायगर सफारी पार्कमध्ये तीन पांढरे वाघ आहेत, हे पार्क आता अधिकृतरित्या पर्यटकांसाठी खुले झाले आहे.
Must Read (नक्की वाचा):
आयकर विभागाने केले 1.17 लाख कोटी रिफंड :
- आयकर विभागाने 31 मार्च रोजी संपलेल्या मागील आर्थिक वर्षात 1.17 लाख कोटी रुपयांचा कर परत (रिफंड) केला असून यापैकी स्वयंगतिक पद्धतीने 37,870 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.
- 31 मार्च रोजी संपलेल्या 2015-16 या आर्थिक वर्षात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना सेवा प्रदान करण्याकामी उल्लेखनीय यश मिळविले असून करदाता सेवेच्या दृष्टीने हे वर्ष विक्रमीच ठरले आहे.
- बेंगळुरूस्थित केंद्रीय प्रक्रिया केंद्राने (सीपीसी) 4.14 कोटी आयकर रिटर्नची प्रक्रिया पूर्ण केली असून मागच्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 35 टक्के अधिक आहे.
- केंद्रीय प्रक्रिया केंद्रामार्फत स्वयंगती (ऑटोमॅटिक) पद्धतीने 37,870 कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे.
- विशेष म्हणजे 30 दिवसांच्या आता या पद्धतीने रिफंड करण्याचे प्रमाण 67 टक्के आहे.
विराट कोहली आयसीसी टी-20 संघाच्या कर्णधारपदी :
- टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची आयसीसी टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
- नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर आयसीसीने आपला जागतिक संघ निवडला आणि कोहलीकडे या स्टार संघाचे नेतृत्व सोपविले.
- अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.
- विशेष म्हणजे भारतीय टी-20 संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह इतर कोणताही भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही.
- माजी क्रिकेटपटू आणि समालोचक यांचा समावेश असलेल्या एका समितीने यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या कामगिरीनुसार आयसीसीचा संघ निवडला.
- आयसीसी टी-20 संघ –
- जेसन रॉय (इंग्लंड), क्विंटन डीकॉक (दक्षिण आफ्रिका, यष्टिरक्षक), विराट कोहली (भारत, कर्णधार), जो रुट (इंग्लंड), जोस बटलर (इंग्लंड), शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया), आंद्रे रसेल (वेस्ट इंडीज), मिशेल सँटनर (न्यूझीलंड), डेव्हिड विले (इंग्लंड), सॅम्युअल बद्री (न्यूझीलंड), आशिष नेहरा (भारत) आणि मुस्तफिजुर रहमान (बांगलादेश, 12 वा खेळाडू)
कॉफी निर्यातीत 13.39 टक्के वाढ :
- मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2015-16 या आर्थिक वर्षात भारतातातून कॉफीची निर्यात 13.39 टक्क्यांनी वाढली असून या वर्षात 3,19,733 टन कॉफी भारतातून निर्यात झाली.
- इन्स्टंट कॉफी आणि अन्य प्रकारच्या कॉफीची निर्यात वाढल्याने एकूण निर्यात वाढ झाली.
- कॉफी बोर्डाच्या ताज्या अहवालानुसार 2014-15 या आर्थिक वर्षात भारतातून 2,81,987 टन कॉफी निर्यात झाली होती.
- जागतिक पातळीवर भाव कमी असला तरी प्रति युनिट मिळणारे मूल्य कमी होते.
‘आधार’धारकांची संख्या 100 कोटींवर :
- ‘आधार क्रमांका’शी जोडलेल्यांची संख्या 100 कोटींवर पोहोचली आहे.
- केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी (दि.4) दिल्लीत ही घोषणा केली.
- अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात आधार विधेयक सरकारने वित्तीय विधेयक म्हणून लोकसभेत मंजूर करून घेतले होते.
- दररोज 60 लाख जण ‘आधार’शी जोडले जात आहे.
- ‘आधार’मध्ये बोटांचे ठसे आणि नेत्रपटल या ‘कोअर बायोमेट्रिक’चा तपशील कोणालाही जाहीर करता येणार नाही.
- तसेच त्यात राष्ट्रीय सुरक्षेचा अपवाद असला तरी मंत्रिमंडळ सचिव, विधी सचिव आणि माहिती तंत्रज्ञान सचिवांच्या समितीलाच त्याबाबतचा आढावा घेण्याचा अधिकार असल्याची कायदेशीर तरतूद आहे.
आता बीएसएनएलपण देणार 4 जी सेवा :
- बीएसएनएलनेही आता 4 जी सेवा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती (दि.4) देण्यात आली.
- प्रतिस्पर्धी दूरसंचार कंपन्यांनी यापूर्वीच 4 जी सेवा देण्यास सुरवात केली असल्याने आता बीएसएनएलची खरी कसोटी लागणार असल्याचे मानले जात आहे.
- सध्या चंडीगडमध्ये कंपनीने 4 जी सेवेला प्रारंभ केला असून आणखी 14 मंडळांत कंपनी लवकरच या सेवेचा शुभारंभ करणार आहे.
- बीएसएनएलकडे 2,500 मेगाहर्टझ बॅण्डमध्ये 20 मेगाहर्टझ स्पेक्ट्रम आहेत, त्यामुळे कोणत्याही परवान्याशिवाय कंपनीला 4 जी सेवा देता येणार आहे.
- बीएसएनएलने सुमारे 8313.80 कोटी रुपये भरून 2,500 मेगाव्हॅटचे स्पेक्ट्रम घेतले होते.
दिनविशेष :
- 1908 : जगजीवनराम, भारतीय राजकारणी यांचा जन्म.
- 1920 : रफिक झकेरिया, भारतीय लेखक यांचा जन्म.
- 1949 : भारत स्काऊट गाईडची स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा