Current Affairs of 4 April 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (4 एप्रिल 2016)
वेस्ट इंडीज 2016 चा टी-20 वर्ल्डकप विश्वविजेता :
- अखेरच्या षटकात विजेतेपद निश्चित करण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असताना स्ट्राइकवर असलेल्या अष्टपैलू क्रेग ब्रेथवेटने बेन स्टोक्सला पहिल्या चार चेंडूवर सलग चार षटकार ठोकले.
- इंग्लंडला 4 विकेटने नमवून वेस्ट इंडीजने दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
- विशेष म्हणजे, यासह दोन वेळा टी-20 विश्वविजेतेपद पटकाविणारा पहिला संघ म्हणून विंडीजने इतिहास रचला.
- विंडीज 19 वर्षांखालील मुलांच्या संघाने सुद्धा 2016 चा विश्वचषक जिंकला आहे.
- ईडन गार्डनवर झालेल्या या रोमांचक सामन्याआधी याच मैदानावर विंडीजच्या महिलांनी ऑस्ट्रेलिया पाडाव करून पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकाविले.
- प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला 9 बाद 155 असा लक्ष विंडीज समोर ठेवला.
- तसेच वेस्ट इंडिज ने 19.4 षटकांत 6 बाद 161 धावा पूर्ण करून विश्वविजेतेपद जिंकले.
Must Read (नक्की वाचा):
जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री पदावर मेहबूबा मुफ्ती :
- जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती (दि.4) शपथ घेणार आहेत.
- भारतीय जनता पक्ष आणि ‘पीडीपी’ची राज्यात युती आहे.
- जम्मू आणि काश्मीरच्या इतिहासात मुख्यमंत्रिपदाचा मान मिळविणाऱ्या मुफ्ती या पहिल्या महिला असतील.
- राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी त्यांना पीडीपी-भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते.
- मेहबूबा यांचे वडील आणि मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर राज्यात राज्यपाल राजवट होती.
देहरजी मध्यम प्रकल्पासाठी वनजमीन देण्यास मान्यता :
- प्रस्तावित देहरजी मध्यम प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने 10 वषार्नंतर 445.29 हेक्टर (1113 एकर) वनजमीन देण्यास अखेर मान्यता दिली आहे.
- केंद्र सरकारच्या लिंक प्रोजेक्टचा एक भाग असलेल्या असलेल्या पालघर येथील या जमिनीला पर्यावरणवाद्यांसह स्थानिकांनी केलेला विरोध डावलून सरकारने ही मान्यता दिली आहे.
- देहरजी धरण बांधण्यासाठी मोठ्याप्रमाणावरील वनेतर जमीन उपलब्ध नसल्याने यासाठी 531.186 हेक्टर वनजमीन मिळावी,असा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, रायगड यांनी महाराष्ट्र शासनास पाठवला होता.
- शासनाने तो मान्यतेसाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला होता.
- तसेच केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही वनजमीन वळती करण्यास मान्यता दिली आहे.
राज्यातील 11 जिल्ह्यांत डिजिटल शाळा :
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात 13 जिल्ह्यांत ज्ञानरचनावादी शाळा आणि तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये संपूर्णत: डिजिटल शाळा झालेल्या आहेत.
- राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम जोमाने राबविण्यात येत आहेत.
- ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती म्हणजे मुलांना हसत खेळत आनंददायी शिक्षण देणे होय.
- तसेच या पद्धतीत मुलांना शिकण्यासाठी प्रवृत्त करण्यात शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकांची राहणार आहे.
- परिसर स्वच्छ, शाळा व वर्गाची रंगरंगोटी, वर्ग सजावट आणि सर्वात म्हणजे प्रात्यक्षिकांतून शिक्षण देणे हेच ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती आहे.
- शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 2 वर्षात देशातील शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्र पहिल्या तीनमध्ये येण्याचा संकल्प केला आहे.
- मात्र त्यापूर्वीच राज्यातील प्राथमिक शाळा आता डिजिटल शाळा व ज्ञानरचनावादी शाळा होणार आहेत.
- अहमदनगर, सोलापूर, नंदूरबार, पालघर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, नांदेड, बुलढाणा, परभणी आणि हिंगोली हे 14 जिल्हे 100 टक्के ज्ञानरचनावादी शाळांचे झाले आहेत.
- तसेच नगर, नंदूरबार, पालघर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, बुलढाणा, परभणी या जिल्ह्यांमधील शाळा डिजिटल झाल्या आहेत.
इस्रोचा चांद्रयान 2 मोहीम स्वदेशी करण्याचा निर्णय :
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान 2 मोहीम स्वदेशी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यात रशियाची मदत घेतली जाणार नाही, अमेरिकेची किरकोळ मदत घेतली जाणार आहे.
- इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले की, चांद्रयान 2 मोहीम पूर्णपणे स्वदेशी राहील.
- तसेच त्यातील लँडर व रोव्हर भारतातच तयार केले जातील.
- डिसेंबर 2017 मध्ये किंवा 2018 च्या पूर्वार्धात भारताचे चांद्रयान 2 झेपावेल, त्यात चंद्रावरील खडक व माती गोळा करून त्यांची माहिती पृथ्थकरणानंतर पृथ्वीकडे पाठवणारी उपकरणे असतील.
- चांद्रयान 2 च्या आधी भारताने चांद्रयान 1 मोहीम यशस्वी केली आहे.
- तसेच त्यात चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते.
- 2010 मध्ये रशियाच्या ग्लावकॉसमॉस संस्थेला लँडर तयार करण्यात सहभागी करण्याचे ठरवले होते व इस्रो ऑर्बिटर तसेच रोव्हर तयार करणार होती.
- पण आता सगळे भारतच तयार करणार आहे, इस्रोने आता लँडर व रोव्हर, ऑर्बिटर सगळे स्वत:च तयार करण्याचे ठरवले आहे.
- तसेच कुठलेही यानाचे निरीक्षण एका ठिकाणाहून करून चालत नाही त्यामुळे नासाच्या डीप स्पेस नेटवर्कची मदत घेतली जाणार आहे.
गुरू ग्रहा सारखा नवीन ग्रहाचा शोध :
- वैज्ञानिकांनी तीन तारे व त्याभोवती फिरणारा गुरूसारखा वायू असलेला ग्रह शोधून काढला आहे.
- हार्वर्ड स्मिथसॉनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्स या अमेरिकेतील संस्थेच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे.
- तसेच द्वैती ताऱ्यांचा एक संच यात आढळला असून आधी तो एकच तारा वाटत होता.
- द्वैती हे तारे तिसऱ्या एका ताऱ्याभोवती फिरत आहेत, या सर्व तारका प्रणालीत एक ग्रह तीन ताऱ्यांभोवती फिरत आहे.
- तीन ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह दुर्मीळ असतात.
- तीन ताऱ्यांभोवती फिरणारा ग्रह सापडण्याची ही चौथी वेळ आहे.
- विशेष म्हणजे हा ग्रह असलेली तारका प्रणाली पृथ्वीपासून तुलनेने जवळ आहे.
- नवीन ग्रहाचे नाव केइएलटी 4 एबी असे असून तो वायू असलेला ग्रह आहे.
- गुरूइतक्या आकाराच्या असलेल्या या ग्रहाला परिवलनास तीन दिवस लागतात, तो केइएलटी-ए ताऱ्याभोवती फिरत आहे.
- तीस वर्षांत ते एकमेकांभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात पण केइएलटी ए ताऱ्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यास द्वैती ताऱ्यांना चार हजार वर्षे लागतात.
- केइएलटी 4 एबी हा ग्रह आपल्या सूर्याच्या चाळीस पट मोठय़ा असलेल्या केइएलटी ए ताऱ्याभोवती फिरत आहे.
- तसेच हे संशोधन द अॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
दिनविशेष :
- 1949 : पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा