Current Affairs of 6 April 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (6 एप्रिल 2016)

चालू घडामोडी (6 एप्रिल 2016)

देशात सेमी-हायस्पीड रेल्वेचे नवे पर्व :

  • देशात (दि.5) सेमी-हायस्पीड रेल्वेचे नवे पर्व सुरू झाले आहे.
  • दिल्ली ते आग्रा 200 कि.मी.चा प्रवास अवघ्या शंभर मिनिटांत पूर्ण करणाऱ्या पहिल्या ‘गतिमान’ रेल्वेला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखविला.
  • तसेच रेल्वेतील होस्टेसनी (रेल्वे सुंदरी) गुलाब पुष्पांनी त्यांचे स्वागत केले.
  • दिल्लीच्या निजामुद्दीन स्थानकावरून कर्णमधुर संगीताच्या साक्षीने या रेल्वेची चाके धावू लागली.
  • अधिकाधिक 160 कि.मी.चा वेगही प्रवाशांना अनुभवता आला, प्रवाशांना विमान प्रवासाप्रमाणे आदरातिथ्य अनुभवता आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 एप्रिल 2016)

देशातील पहिला हरित मेट्रो प्रकल्प :

  • देशातील पहिला हरित मेट्रो प्रकल्प म्हणून नागपूर मेट्रो प्रकल्पाचा विकास करण्यासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यू बॅंक आणि केंद्र सरकारदरम्यान करार करण्यात आला.
  • तसेच या करारानुसार नागपूर मेट्रोच्या कामांसाठी केएफडब्ल्यू बॅंकेने 20 वर्षे मुदतीसाठी 3,750 कोटी रुपये (500 दशलक्ष युरो) कर्ज स्वरूपात दिले आहे.
  • या प्रकल्पांतर्गत सौर ऊर्जेच्या माध्यमातून दोन तृतीयांश ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे.
  • पहिल्या 5 वर्षांत एकूण रकमेवरील व्याज तर उर्वरीत 15 वर्षांत मुद्दलीसह व्याज स्वरूपात कर्ज परतावा करण्यात येणार आहे.
  • तसेच या रकमेतून नागपूर मेट्रोचे डबे, मेट्रो मार्ग, वीजपुरवठा, ट्रॅक्शन, बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहेत.

ऑलिम्पिक तयारीसाठी भारतीय संघ खेळणार :

  • जपानमध्ये (दि.6) सुरू होत असलेल्या सुलतान अझलान शाह ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघ आगामी रिओ ऑलिम्पिकची पूर्वतयारी म्हणून उतरेल.
  • आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदकावर विजय मिळविलेल्या भारतीय संघाच्या कामगिरीवर या वेळी विशेष लक्ष असेल.
  • तसेच या स्पर्धेद्वारे भारताला जागतिक विजेत्या ऑस्ट्रेलियासारख्या इतर बलाढ्य संघांविरुद्ध स्वत:ला अजमावण्याची संधी मिळेल.
  • चार महिन्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार असल्याने भारतीय संघ अझलन शाह स्पर्धेत चमकदार कामगिरीसह स्वत:ला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असेल.
  • गतवर्षी डिसेंबर महिन्यात रायपूरला झालेल्या हॉकी विश्व लीग स्पर्धेत भारताला कांस्य पटकावण्यात यश आले होते.
  • भारताने कोर ग्रुपमध्ये बहुतांश युवा खेळाडूंचा समावेश केला आहे.

पाक टी-20 संघाचे नवे कर्णधार सर्फराज अहमद :

  • आशिया आणि त्यांतर झालेल्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशाने पाकिस्तानच्या ट्वेंटी-20 संघाचे कर्णधारपद सोडलेल्या शाहिद आफ्रिदीच्या जागी यष्टीरक्षक सर्फराज अहमदची निवड करण्यात आली आहे.
  • पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) (दि.5) याबाबतची घोषणा केली. आता पाकिस्तानच्या नव्या प्रशिक्षकाची निवड होणार आहे.  
  • शाहिद आफ्रिदीने निवृत्तीस नकार देत कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.
  • तसेच या दोन्ही स्पर्धांतील अपयशी कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या स्पर्धेनंतर आफ्रिदी टी-20 सामन्यासाठी कर्णधार राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
  • अखेर आफ्रिदीने कर्णधारपद सोडल्याचे जाहीर केले होते.
  • तसेच त्यानंतर पीसीबीने युवा यष्टीरक्षक सर्फराज अहमदच्या हातात कर्णधारपदाची जबाबादारी सोपविली आहे.

केंद्र सरकारकडून घनकचरा व्यवस्थापन नियमावली जारी :

  • घरोघरी निर्माण होणाऱ्या लाखो टन घनकचऱ्याच्या विल्हेवाटीची संस्थात्मक नियमावली केंद्राने तब्बल 16 वर्षांनंतर सुधारित व पुनरुज्जीवित केली आहे.
  • पहिल्या टप्प्यात सध्यापेक्षा तिप्पट म्हणजे 46 कोटी लोकसंख्येला घनकचरा नियमांच्या रडारवर आणण्यात येणार आहे.
  • सध्याच्या 4041 व अतिरिक्त 3894 नगरपालिकांसह विविध महापालिकांच्या क्षेत्रातील 981 ग्रामपंचायती, औद्योगिक वसाहती, धार्मिक ठिकाणे, छोटी-मोठी बंदरे, सात हजार रेल्वे स्थानके, मंगल कार्यालये अशा सर्व ठिकाणी नवी घनकचरा व्यवस्थापन प्रणाली लागू केली जाईल.
  • आज जारी झालेली घनकचरा व्यवस्थापन नियमावली प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल. 
  • देशात काही ग्रामपंचायती व महानगरांतील सोसायट्या, कॉलन्या स्वतःच कंपोस्ट खत तयार करतात; त्याच्या खरेदीची यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • तसेच यानुसार ओला-सुका कचरा वेगळा करणे व कचरा एकत्र होतो तेथेच त्याचे वर्गीकरण करणे, संबंधितांवर नियमानेच बंधनकारक राहणार असून, कचरा जाळणे हाही दंडनीय गुन्हा ठरेल.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण :

  • दोन आठवड्यांपासून सुरू असलेली मजबुती संपुष्टात येताना (दि.5) रुपया 25 पैशांनी घसरला.
  • तसेच 1 डॉलरची किंमत 66.46 रुपये झाली.
  • बँका आणि आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपयाची घसरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • आंतरबँक विदेशी चलन (फॉरेक्स) बाजारात (दि.4) रुपया 66.21 वर बंद झाला होता.
  • सत्राच्या अखेरीस तो 66.46 वर बंद झाला. 25 पैसे अथवा 0.38 टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली.
  • गेल्या दोन आठवड्यात रुपयाने 50 पैशांची वाढनोंदविली होती.

दिनविशेष :

  • 1930 : दांडीयात्रा.
  • 1956 : दिलीप वेंगसकर, भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 एप्रिल 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.