Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 4 October 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (4 ऑक्टोबर 2017)

चालू घडामोडी (4 ऑक्टोबर 2017)

महिला पायलट करणार लढाऊ विमानाचे सारथ्य :

 • भावना कांत, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी…हवाई दलातील ‘दुर्गा’…फायटर पायलट हा बहुमान मिळवणाऱ्या या तिघी लवकरच सुखोई-30 या ‘सुपरसॉनिक’ लढाऊ विमानाचे सारथ्य करणार आहेत. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होणार असून याच महिन्यात त्या ‘सुखोई’ भरारी घेताना दिसतील.
 • हवाई दलाच्या पश्चिम बंगालमधील कलाईकुंडा येथील अॅकॅडमीमध्ये या तिघींचे प्रशिक्षण सुरू आहे.
 • जून 2016 मध्ये त्या फायटर पायलट म्हणून हवाई दलात रुजू झाल्या होत्या. त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर या महिन्यात त्या सुखोई-30 या लढाऊ विमानातून ‘गगनभरारी’ घेतील.
 • हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ला ही माहिती दिली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची लढाऊ वैमानिकांच्या तुकडीत नियुक्ती करण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी खूपच चांगले प्रदर्शन केले आहे, अशा शब्दांत त्यांचे कौतुक करण्यात आले.
 • हवाई दलाच्या या अॅकॅडमीमध्ये या तिघींसह 40 जणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांचा 2017मध्ये ‘फायटर पायलट’च्या तुकडीत समावेश करण्यात येणार आहे.

फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी नवी मुंबई सज्ज :

 • फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सुशोभीकरण व प्रसिद्धीसाठीची बहुतांश सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
 • नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी 5 ऑक्टोबरला स्मार्ट सिटी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
 • दरम्यान, पालिकेच्या यशवंतराव चव्हाण मैदानावर न्यूझिलंडच्या संघाने दोन तास सराव केला. महापालिकेने तयार केलेल्या मैदानाचेही कौतुक केले.
 • फिफा 17 वर्षांखालील जागतिक फुटबॉल स्पर्धा 6 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत नवी मुंबईत संपन्न होत आहे. यजमान शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे.
 • महाराष्ट्र शासनाच्या शालेय व शिक्षण क्रीडा विभागाच्या वतीने महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
 • स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी मनपा आयुक्त रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली गठीत पर्यवेक्षण व सहनियंत्रण समितीची बैठक मनपा मुख्यालयात घेण्यात आली होती.
 • तसेच या बैठकीमध्ये स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठीच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था, वाहन व्यवस्थेच्या अनुषंगिक बाबींचा आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला.
 • जागतिक स्तरावरील ही फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात देश-परदेशातून प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय संघांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी औरंगाबादची निवड :

 • राष्ट्रीय फुटबॉल संघांच्या प्रशिक्षण केंद्रांसाठी देशातील औरंगाबाद आणि कोलकाता या दोन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.
 • ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत ही घोषणा केली.
 • औरंगाबादेतील साईच्या जागेत हे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र उभे राहणार आहे. या केंद्रांसाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे युवासेनाप्रमुख आणि मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून जाहीर केले.

महाराष्ट्रात ‘फिल्मी दुनिया’ उभारण्याची घोषणा :

 • नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासन पर्यटन विभागनितीन देसाई यांच्या एन.डी. आर्ट्स वर्ल्ड्सच्या सौजन्याने महाराष्ट्रात भव्य ‘फिल्मी दुनिया’ उभारली जाणार आहे.
 • 27 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त मंत्रालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
 • आधुनिक युगाचा विश्वकर्मा म्हणून नावाजलेले कर्तुत्ववान कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली हि ‘फिल्मी दुनिया’ कर्जत येथील एन. डी. स्टुडियोच्या भव्यदिव्य आवारात उभारली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत, एन. डी. स्टुडियोचे नाव सोनेरी अक्षरांमध्ये कोरले जाणार आहे.
 • आपल्या कलाकृतीतून प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळे देण्याच्या प्रयत्नांत असलेले नितीन चंद्रकांत देसाई यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात येणार असून, या ‘फिल्मी दुनिया’मधून  महाराष्ट्राला नवे प्रेक्षणीय स्थळ निर्माण करून देण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे.
 • चित्रपटातील काल्पनिक दुनियेत जिवंतपणा आणण्याची कसब त्यांच्यात असून, त्यांनी अनेक चित्रपटाद्वारे ते सिद्ध देखील केले आहे.
 • अनेक सुप्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमाचे सेट एन.डी.स्टुडियोत उभारण्यात आले असून, भारतीय चित्रपटसृष्टीचा ऐवजच जणू ‘फिल्मी स्थान’ च्या माध्यमातून प्रेक्षकांना ‘याची देही याची डोळा’ पाहायला मिळणार आहे. 

दिनविशेष :

 • 4 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो.
 • केशवराव भोसले – (9 ऑगस्ट 1890 (जन्मदिन) – 4 ऑक्टोबर 1921 (स्मृतीदिन)) हे मराठी नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध गायक-अभिनेते होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World