Current Affairs of 4 July 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (4 जुलै 2017)

चालू घडामोडी (4 जुलै 2017)

दिल्ली विमानतळाची सुरक्षा जगात सर्वोत्तम :

 • केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) पुरवण्यात येणारी सुरक्षा जगातील सर्वोत्तम सुरक्षा आहे.
 • वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने सीआयएसएफला प्रमाणपत्र दिले असून लवकरच त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
 • सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दल सीआयएसएफने राखलेला दर्जा सर्वोत्तम असून वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसकडून त्यांची दखल घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 • स्वतंत्रपणे कार्यरत असणा-या वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने आतापर्यंत खासगी क्षेत्रात काम करणा-या कंपन्यांना कामांचा दर्जा पाहता सन्मानित केले आहे.
 • 6 जुलै रोजी वार्षिक कार्यक्रमात सीआयएसएफला अवॉर्ड देत सन्मानित करण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 जुलै 2017)

प्रवीण दवणे अत्रे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी :

 • आचार्य अत्रे यांच्या सासवड या जन्मगावी आयोजित केलेल्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रवीण दवणे यांचीस्वागताध्यक्षपदी दशरथ ऊर्फ बंडूकाका विठ्ठल जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
 • माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 • अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखाअध्यक्ष रावसाहेब पवार यांनी ही माहिती दिली.
 • दर वर्षी अत्रे यांच्या जयंतीनिमित्त सासवड येथे विभागीय साहित्य संमेलन अत्रे प्रतिष्ठान व साहित्य परिषद सासवड शाखेच्या वतीने आयोजित केले जाते.
 • तसेच या वर्षी अत्रे यांच्या 119व्या जयंतीनिमित्त 20वे संमेलन 1314 ऑगस्ट रोजी सासवड येथे आयोजित करण्यात आले आहे.

औरंगाबादमधील शासकीय दंत महाविद्यालय देशात 12 व्या क्रमांकावर :

 • देशातील एका अग्रणी नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने 12 वे स्थान पटकाविले आहे.
 • विशेष म्हणजे पहिल्या 15 महाविद्यालयांमध्ये राज्यातील केवळ तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.
 • तसेच या नियतकालिकेतर्फे दरवर्षी देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांची यादी जाहीर होते. यंदा म्हणजे 2016-17 मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.
 • यंदाच्या सर्वेक्षणानुसार मणिपालच्या ‘मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस’ या खासगी महाविद्यालयाने 563 गुणांच्या आधारे देशातून पहिले स्थान पटकाविले.
 • यापूर्वीच्या सर्वेक्षणामध्ये शहरातील शासकीय दंत महाविद्यालयाने 13 स्थान पटकाविले होते. यंदा 12 वे स्थान मिळविले.
 • सर्वेक्षणातील 15 महाविद्यालयांच्या यादीमध्ये मुंबईतील दोन महाविद्यालयानंतर केवळ औरंगाबादतील महाविद्यालयाचा समावेश असल्याचेही समोर आले आहे.

ए.के. ज्योती हे देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त :

 • देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी हे 6 जुलै रोजी निवृत्त होत असल्याने निवडणूक आयुक्त ए.के. ज्योती हे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतील.
 • पण डॉ. झैदी यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त होणाऱ्या आयुक्तपदावर कोणाची निवड होणार, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
 • कारण येणाऱ्या नव्या आयुक्ताकडेच 2019च्या लोकसभेची धुरा असेल! या शर्यतीमध्ये मावळते केंद्रीय गृहसचिव राजीव मेहर्षि यांचे नाव ‘अग्रेसर’ आहे.

दिनविशेष :

 • 4 जुलै 1902 हा भारतीय तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद यांचा स्मृतीदिन आहे.
 • मराठा प्रकाशक परिषदेची स्थापना 4 जुलै 1977 मध्ये झाली.
 • 4 जुलै 1991 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची चौथी चाचणी यशस्वी झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 जुलै 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.