Current Affairs of 3 July 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 जुलै 2017)

चालू घडामोडी (3 जुलै 2017)

आयसीसी महिला विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय :

  • आयसीसी विश्वचषकात भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर 95 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे.
  • भारताने दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ 38 षटकांत सर्वबाद 74 धावांतच गारद झाला.
  • भारताकडून एकता बिष्ट हिने सर्वाधिक 5 बळी मिळवले आहेत. गोस्वामी, शर्मा, जोशी आणि कौर यांनीही प्रत्येकी एक बळी टिपला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 जुलै 2017)

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे निधन :

  • ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘चांदणे शिंपित जाशी’, ‘बेईमान’, ‘अखेरचा सवाल’, ‘चाफा बोलेना’, ‘संगीत मत्स्यगंधा’ अशा असंख्य नाटकांच्या माध्यमातून मराठी रंगभूमी गाजविलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे 2 जुलै रोजी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.
  • मराठी रंगभूमीवर ‘मामा’ म्हणून लोकप्रिय असलेले प्रा. तोरडमल यांचा ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकातील ‘प्राध्यापक बारटक्के’ नाट्यरसिकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिला. या नाटकाने रेकॉर्डब्रेक अशा पाच हजार प्रयोगांचा टप्पा गाठल्याने तोरडमलांचा ‘ह‘च्या बाराखडीतला ‘प्रा. बारटक्के’ मराठी रंगभूमीच्या इतिहासात कायमचा अजरामर झाला.
  • तसेच पुण्याच्या ‘बालगंधर्व’ नाट्यगृहात या नाटकाचे एकाच दिवशी तीन सलग प्रयोग झाले आणि या घटनेची रंगभूमीवर त्या काळी विशेष नोंद झाली.

मंदिर समिती अध्यक्षपदी अतुल भोसले :

  • राज्यातील समस्त वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराचा कारभार पाहणाऱ्या श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कराडचे भाजपा नेते अतुल भोसले यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे.
  • तसेच या मंदिर समितीचे प्रशासन चार वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या हाती आहे. जिल्हाधिकारी हे समितीचे सभापती आहेत.
  • समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती 30 जूनच्या आत करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेसंदर्भात दिले होते. त्यामुळे समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार या बाबत प्रचंड उत्सुकता होती.
  • राज्य शासनाने शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी भाजपाचे नेते सुरेश हावरे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर भोसले यांच्या रुपाने दुसऱ्या भाजपा नेत्याच्या हातात पंढरपूरच्या समितीचा कारभार देण्यात आला आहे.

ऑस्करच्या ज्युरी मेंबर्समध्ये भारतीय माणसाची निवड :

  • प्रतिष्ठेच्या ऑस्कर चित्रपट पुरस्काराच्या ज्युरी सदस्यांमध्ये उज्जवल निरगुडकर यांची निवड झाली आहे.
  • ऑस्करच्या लार्ज-क्रिएटीव्ह सायन्स विभागात त्यांची ज्युरी म्हणून निवड झाली असून, या कॅटेगरीमध्ये निवड झालेले ते पहिले भारतीय ठरले आहेत.
  • ग्लोबल मोशन पिक्चर टेक्नोलॉजीमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेऊन ऑस्करने उज्जवल निरगुडकर यांची निवड केली आहे. त्यांना कायमस्वरुपी ऑस्करचे ज्युरी सदस्यत्व मिळाले आहे.
  • उज्जवल निरगुडकर गेल्या 24 वर्षांपासून हॉलिवूडशी संबंधित असून, त्यांनी चित्रपट क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये अमूल्य योगदान दिले आहे.
  • मुंबईच्या युडीसीटीमधून केमिकल इंजिनिअरींगची पदवी घेणा-या उज्जवल निरगुडकर यांच्या नावावर अनेक पेटंटस असून, त्यांनी फिल्म प्रोसेसिंगमध्ये स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

दिनविशेष :

  • सन 1350 मध्ये संत नामदेव यांनी पंढरपूर येथे समाधी घेतली. तर यावर्षीच संत जनाबाई यांनीही समाधी घेतली.
  • महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा 3 जुलै 1852 रोजी सुरू केली.
  • 3 जुलै 1886 मध्ये गुरुदेव रामचंद्र रानडे यांचा जन्म झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 जुलै 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.