Current Affairs of 5 July 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (5 जुलै 2017)

चालू घडामोडी (5 जुलै 2017)

भारतीय मुलींचा युवा रग्बी संघ सज्ज :

  • पॅरिस येथे 7 जुलैपासून सुरु होत असलेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या 18 वर्षांखालील मुलींच्या रग्बी संघाची घोषणा करण्यात आली.
  • ओडिशाच्या सुमित्रा नायक हिच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले असून या संघात गार्गी वालेकर ही एकमेव महाराष्ट्रीयन खेळाडू आहे.
  • आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत दुसऱ्यांदा भारताचा हा युवा संघ सहभागी होत आहे. याआधी यूएईमध्ये झालेल्या पहिल्या 18 वर्षांखालील रग्बी सेवेंस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या या युवा संघाने कांस्य पदकाला गवसणी घातली होती.
  • जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज असलेल्या भारताच्या युवा रग्बी संघात ओडिशा व पश्चिम बंगालचे वर्चस्व असून त्यांचे प्रत्येकी 5 खेळाडू संघात आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 जुलै 2017)

ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आर्यानला सुवर्णपदक :

  • महाराष्ट्राचा आर्यन भोसले, कर्नाटकच्या श्रीहरी नटराज व पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडल यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करीत नवीन विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक पटकावित 44व्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धा गाजविली.
  • तसेच दुसरीकडे महाराष्ट्राच्या रेना सलढाणा, त्रिशा कारखानीस, आर्यन भोसले, केनिशा गुप्ता, नील रॉय यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.
  • भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या वतीने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात जलतरण तलाव सुरू असलेल्या या स्पर्धेत 400 मी फ्रीस्टाइल प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्राच्या रेना सलढाणाने 4.45.42 सेकंद वेळ नोंदवीत सुवर्णपदक संपादन केले तर तमिळनाडूच्या अभिशिक्ता पी.एम. व दिल्लीच्या प्राची टोकस यांनी अनुक्रमे रौप्यकांस्यपदक पटकावले.

इंदिरा गांधी विद्यापीठात तृतीयपंथींना मोफत शिक्षण :

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नु) या देशातील सर्वांत मोठ्या मुक्त विद्यापीठाने तृतीयपंथींच्या मोफत शिक्षणासाठी मान्यता दिली आहे.
  • विद्यापीठात शिकविल्या जाणाऱ्या सुमारे 200 अभ्यासक्रमांचे शुल्क तृतीयपंथीसाठी पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
  • तसेच या प्रवेशांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नसले तरी प्रवेशेच्छु विद्यार्थ्यांना तृतीयपंथी अशी ओळख सिद्ध करण्यासाठी तशी नोंद असलेले आधार कार्ड किंवा कोणत्याही सरकारी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र मात्र सादर करावे लागेल. या सवलतीचा तृतीयपंथींखेरीज अन्य कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी ओळखपत्राची ही अट घालण्यात आली आहे.
  • विद्यार्थी नोंदणी विभागाच्या निबंधकांनी यासंबंधीची अधिसूचना 29 जून रोजी जारी केली.

दिनविशेष :

  • वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालणारा पहिला कायदा 5 जुलै 1865 रोजी इंग्लंडमध्ये लागू झाला.
  • 5 जुलै 1954 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाला मान्यता मिळाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 जुलै 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.