Current Affairs of 4 January 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (4 जानेवारी 2018)
कोल्हापूरात अंधांसाठी अब्रार सॉफ्टवेअर उपलब्ध :
- कोल्हापूर मधील करवीर नगर वाचन मंदिरातर्फे वाचकांसाठी नित्य नवे उपक्रम केले जातात. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून 2010 मध्ये अंधांसाठी ब्रेल ग्रंथालय विभाग सुरू केला. याबरोबर अंधांसाठी अब्रार नामक सॉफ्टवेअरही उपलब्ध करून दिले.
- ग्रंथालय विभाग आणि सॉफ्टवेअरचा लाभ अनेक अंध विद्यार्थी, व्यक्ती घेत आहेत. ब्रेल ग्रंथालयात विविध नामवंत लेखकांची पुस्तके, चरित्रे आहेत.
- तसेच या पुस्तकांनी अंध व्यक्तींच्या जीवनात जगण्याची असीम जिद्द निर्माण केली. आठवड्यातून किमान चार ते पाच अंध व्यक्ती या ग्रंथालयात येऊन वाचनाचा आनंद मिळवितात.
Must Read (नक्की वाचा):
राज्यात वन्यप्राणी गणना 20 जानेवारीपासून :
- राज्यातील व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित जंगलातील प्राणी गणना 20 ते 25 जानेवारीदरम्यान होणार आहे.
- ‘ट्रान्झेक्ट’ पद्धतीने होणारी ही गणना चार टप्प्यांत होईल. त्यामुळे संपूर्ण देशातील वाघांसह इतरही प्राण्यांची नेमकी संख्या कळू शकणार आहे. ही प्रक्रिया 15 मार्चपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देशही प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहे.
- मांसभक्षी आणि तृणभक्षक प्राण्यांची गणना राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रकल्प, अभयारण्य तसेच संचार प्रकल्पात होणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पात प्रशिक्षण देण्यात आले. हे अधिकारी आपापल्या विभागात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत.
- देशभरात प्राणी गणना सुरू झाली असून, महाराष्ट्रात लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे. दर चार वर्षांनंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून (एनटीसीए) ही गणना केली जाते. मागील गणना 2014 मध्ये झाली होती.
- महाराष्ट्रासह देशभरात दोन टप्प्यांत गणना केली जाणार आहे. प्राण्यांचा अधिवास असलेल्या मर्यादित जांगावर ‘कॅमेरे ट्रॅपिंग’ लावून गणनेचे काम केले जाणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर :
- सावंतवाडी येथील तालुका पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार छायाचित्रकार अनिल भिसे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर पांडुरंग स्वार यांच्या नावाने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार चंदू सावंत यांना जाहीर झाला आहे.
- माजी आमदार जयानंद मठकर स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणार आदर्श पुरस्कार सिंदूधुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अशोक करंबळेकर यांना, तर जेष्ठ पत्रकार बाप्पा धारकर आदर्श पुरस्कार अनिल चव्हाण यांना जाहीर झाला.
- तसेच सामाजिक कार्यकर्ते कै.चंदू वाडीकर यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार दत्तप्रसाद पोकळे यांना जाहीर करण्यात आला.
नासाकडून वेगाने वाढणारी गव्हाची प्रजाती विकसित :
- नासा या अमेरिकी अवकाश संस्थेच्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी गव्हाची प्रजाती विकसित केली आहे. त्यामुळे गव्हाचे उत्पादन तीनपटींनी वाढणार आहे. नासाच्या प्रयोगात सतत सूर्यप्रकाशात रोपे राहतात. यात रोपांची वाढ खूप झपाटय़ाने होते.
- ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील ली हिकी या संशोधकाने सांगितले, की जलद वाढ तंत्र वापरताना त्यात गहू, चवळी व बार्ली यांची सहा पिढय़ांतील रोपे तर कॅनोलाची चार पिढय़ांतील रोपे एका वर्षांत वाढवण्यात आली. यात विशिष्ट प्रकारचे काचगृह वापरण्यात आले होते.
- नियंत्रित वातावरणात वाढवण्यात आलेल्या प्रयोगात सूर्यप्रकाश भरपूर ठेवला होता. 2050पर्यंत जगात अन्नधान्य उत्पादनात 60 ते 80 टक्के वाढ केली तरच लोकांना अन्न मिळू शकणार आहे, त्यामुळे उत्पादनवाढीच्या या प्रयोगाला महत्त्व आहे.
- डो अॅग्रोसायन्सेस बरोबर भागीदारीत हे तंत्र वापरून गव्हाची डीएस फॅरेडे ही नवी प्रजाती विकसित करण्यात आली असून, ती या वर्षीच वितरित होणार आहे.
माजी राज्यमंत्री ऍड.मधुकर किंमतकर यांचे निधन :
- विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक, कॉंग्रेसचे नेते तसेच माजी अर्थराज्यमंत्री ऍड. मधुकर ऊर्फ मामा किंमतकर यांचे 3 जानेवारी रोजी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.
- ऍड. मधुकर किंमतकर यांचा जन्म 10 ऑगस्ट 1932 साली रामटेक येथे झाला.
- एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हाताखाली वकिली सुरू केली.
- कॉंग्रेसचे नेते नरेंद्र तिडके यांनी सुरू केलेल्या मॉडेल मिलच्या कामगाराच्या चळवळीत ते उतरले. येथूनच त्यांची राजकीय कारर्कीद सुरू झाली.
- 1980 साली कॉंग्रेसने त्यांना रामटेक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. पहिल्याच निवडणुकीत ते विजयी झाले.
- तसेच बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्रीसुद्धा होते. सहा वर्षे विधान परिषदेचेही सदस्य होते.
दिनविशेष :
- 4 जानेवारी 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले.
- ब्रम्हदेश (म्यानमार) देशाला इंग्लंडपासुन 4 जानेवारी 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
- मेहेरचंद महाजन यांनी भारताचे 3रे सरन्यायाधीश म्हणुन 4 जानेवारी 1954 रोजी कार्यभार सांभाळला.
- सन 1962 मध्ये 4 जानेवारी रोजी न्यूयॉर्क अमेरिका येथे पहिली चालकरहित रेल्वे सुरु झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Must Read (नक्की वाचा):
आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/3p8IMXkj4-M?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}