Current Affairs of 3 January 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (3 जानेवारी 2018)
प्रदूषणातून बचावसाठी आयआयटीने बनवले नोझ फिल्टर :
- गेल्या काही दिवसांमध्ये प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दिल्लीत तर प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- या पार्श्वभूमीवर आयआयटीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून नोझल फिल्टर विकसित केले आहे. या फिल्टरची किंमत अवघी 10 रूपये असल्याने सामान्यांनाही ते परवडू शकेल.
- आयआयटी आणि नॅनोक्लीन ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या या फिल्टरमुळे हवेतील प्रदूषित घटक शरीरात जाणार नाहीत.
- सध्या दिल्लीच्या हवेत पीएम 2.5 धुलिकण मोठ्याप्रमाणावर आहेत. त्यादृष्टीने हे नोझल फिल्टर खूपच फायदेशीर ठरणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
प्लास्टिकमुक्तीसाठी सावर्डे-भुवडवाडी शाळेचा उपक्रम :
- चार भिंतीच्या आत ज्ञानाजर्नाचे धडे गिरवता गिरवता सामाजिकतेचे भान ठेवून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सावर्डे-भुवडवाडी शाळेच्या मुलांनी 3100 कागदी पिशव्या बनवून प्लास्टिकमुक्तीचा संदेश दिला.
- सावर्डे-भुवडवाडी या पहिली ते चौथीमध्ये शिकणाऱ्या 28 विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक अमरदीप कदम आणि सहाय्यक शिक्षिका पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यांत फावेल त्यावेळी टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना राबवून रद्दीतून कागदी पिशव्या तयार करण्याची संकल्पना सुचली. शिक्षिका पाटील यांनी विद्यार्थ्यांना पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले.
- विद्यार्थी सरावाने कागदी पिशव्या सहज बनवू लागले. तयार पिशव्या त्यांनी बाजरपेठेतील औषधांची दुकाने, किराणमाल दुकाने, वडापाव दुकाने, हॉटेल येथे जाऊन मोफत दिल्या आहेत.
डॉक्टरांना नोंदणीसाठी आधार क्रमांक सक्तीचा :
- डॉक्टरांच्या नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आल्याची सूचना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने काढली आहे. बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी ही क्लृप्ती योजण्यात आल्याचे सांगण्यात येते.
- 1965च्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्यांतर्गत नावनोंदणी करायची असल्यास डॉक्टरांना आधार क्रमांक सक्तीचे करण्यात आले आहे.
- मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियानेच हा निर्णय जाहीर केला आहे. जुलै 2017मध्ये देशभरातील डॉक्टरांना आधार नोंदणीबाबत पत्रे पाठविण्यात आली होती.
- डिजिटल मिशन मोड प्रोजेक्टअतंर्गत इंडियन मेडिकल रजिस्ट्रेशन आणि युनिक पर्मनंट रजिस्ट्रेशनअंतर्गत नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.
- महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या वेबसाइटवरही आधार कार्डाची सेल्फ अटेस्टेड कॉपी द्यावी लागणार आहे.
ग्लोब सॉकरचा सर्वोत्तम खेळाडू ‘ख्रिस्तियानो रोनाल्डो’ :
- पोर्तुगाल व रिअल माद्रिद क्लबचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या खात्यात आणखी एक पुरस्कार जमा झाला आहे. रोनाल्डोला ‘ग्लोब सॉकर सर्वोत्तम खेळाडू’च्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
- रोनाल्डोने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला. रोनाल्डोने 2011, 2014 आणि 2016 साली युरोपियन असोसिएशन फुटबॉल एजंट्स आणि युरोपियन क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा हा पुरस्कार जिंकला होता.
- रोनाल्डोने या पुरस्कार सोहळ्यात दूर चित्र संवादामार्फत (व्हिडीओ कॉन्फरन्स) उपस्थिती लावली. त्याला इटलीचे अॅलेझांड्रो डेल पिएरो यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
- तसेच यंदाच्या सर्वोत्तम क्लबचा पुरस्कार रिअल माद्रिदने, तर सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार झिनेदिन झिदान यांनी पटकावला आहे.
अमेरिकेने रोखली पाकची लष्करी मदत :
- अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारी 255 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची लष्करी मदत अमेरिकेने तूर्तास स्थगित केली आहे.
- आपल्या भूमीतून पाठबळ मिळत असलेल्या दहशतवादी कारवायांवर पाकिस्तान काय कारवाई करते, यावर भविष्यातील मदतीचा निर्णय घेतला जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संगितले.
- गेल्या 15 वर्षांत अमेरिकेने दिलेल्या 33 अब्ज डॉलर्सच्या मदतीच्या बदल्यात पाकिस्तानने फक्त असत्य आणि फसवणूकच दिली आहे, अशा कडक शब्दांत अध्यक्ष ट्रम्प यांनी पाकचा समाचार घेतला.
एव्हरेस्टवर एकट्या गिर्यारोहकाला बंदी :
- जगातील सर्वोच्च शिखरांच्या पंगतीत बसलेल्या माऊंट एव्हरेस्टवर पोहोचणे गर्यिारोहकांसाठी स्वप्नच आहे. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हे गर्यिारोहक अवरित सराव करतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये गर्यिारोहकांचे झालेले मृत्यू पाहता नेपाळमधून एकट्या गर्यिारोहकाला एव्हरेस्टवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबरच अंध आणि दव्यिांग गर्यिारोहकांच्या एव्हरेस्ट चढाईला मनाई केली आहे.
- या बंदीबाबत अनेक गर्यिारोहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नयिमांवर गेल्या महन्यिाभरापासून चर्चा सुरू असून या आठवड्यात हे नयिम लागू केले जाणार असल्याचे नेपाळने स्पष्ट केले आहे.
- 2017 या वर्षात बहुतांश गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला. सुप्रसिद्ध गिर्यारोहक उली स्टेक हे देखील एव्हरेस्ट सर करण्याच्या तयारीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या घटना टाळण्यासाठीच सुरक्षेचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
दिनविशेष :
- पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झाला.
- पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते 3 जानेवारी 1950 रोजी पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.
- 3 जानेवारी 1952 मध्ये स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Must Read (नक्की वाचा):
आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/nL7DLa-EcGU?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}