Current Affairs of 2 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (2 जानेवारी 2018)

चालू घडामोडी (2 जानेवारी 2018)

स्टेट बँकेची मूळ व्याजदरात 0.30 टक्के कपात :

  • सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेने तिच्या विद्यमान मूळ व्याजदरात (बेस रेट) आणि संदर्भीय मूळ कर्जदरात (बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट) 0.30 टक्के कपातीची घोषणा 1 जानेवारी रोजी केली.
  • मूळ व्याजदराशी अजूनही कर्जे निगडित असलेल्या स्टेट बँकेच्या जुन्या कर्जदारांना याचा मोठा फायदा होईल. यात गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्ज घेतलेल्यांची संख्या लक्षणीय आहे.
  • बँकेने मूळ व्याजदर वार्षिक 8.95 टक्क्य़ांवरून आता 8.65 टक्के केला आहे. अशा प्रकारे स्टेट बँकेचा मूळ व्याजदर हा देशात सर्वात कमी ठरला आहे.
  • स्टेट बँकेचे हे पाऊल इतर बँकांसाठी आता मार्गदर्शक ठरू शकते. मध्यंतरी रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपात होऊनही सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी त्याला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नव्हता.
     
  • तसेच बँकेने गृहकर्जाच्या प्रक्रिया शुल्कातील सूट 31 मार्च 2018 पर्यंत विस्तारित केली आहे. यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढेल, असा विश्वास बँकेने व्यक्त केला आहे.

‘एनआरसी’ची पहिली यादी जाहीर :

  • आसामने 31 डिसेंबर 2017 रोजी ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स’चा मसुदा जाहीर केला. आसाममधील 3.29 कोटींपैकी 1.9 कोटी लोकांना अधिकृत भारतीयाचा दर्जा देण्यात आला आहे. उर्वरित नावांची तपासणी सुरु असल्याची माहिती ‘रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया’ शैलेश यांनी दिली.
  • 31 डिसेंबर रोजी रात्री आसाममध्ये ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स’चा पहिला मसुदा जाहीर करण्यात आला.
  • आसाममधील विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपची सत्ता आल्यास बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांना पुन्हा बांगलादेशमध्ये पाठवू, असे आश्वासन दिले होते.
  • स्थानिक हिंदूंचे रोजगार हिरावून घेणाऱ्या आणि बेकायदा घुसलेल्या मुस्लिमांवर कारवाई करु, अशी गर्जनाच भाजपने केली होती. या दृष्टीने आसाममध्ये ‘नॅशनल रजिस्टर सिटीझन’ला (एनआरसी) महत्त्व प्राप्त झाले आहे.
  • तसेच 1951 च्या जनगणनेनुसार हा मसुदा तयार करण्यात आला आहे. यामुळे बांगलादेशी घुसखोरांना शोधणे शक्य होणार आहे.

विजय गोखले हे देशाचे नवे पराराष्ट्र सचिव :

  • चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेले आणि महाराष्ट्राचे सुपुत्र विजय केशव गोखले हे आता देशाचे नवे परराष्ट्र सचिव असणार आहेत. विजय केशव गोखले यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.
  • सध्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा कार्यकाळ 28 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे या पदावर विजय केशव गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ते भारताचे परराष्ट्र सचिव असतील.
  • चीन आणि भारत यांच्यात निर्माण झालेला डोकलाम वाद सोडवण्यात विजय केशव गोखलेंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. 1981 च्या बॅचचे ते आयएफएस अधिकारी आहेत. सध्या ते परराष्ट्र मंत्रालायाच्या आर्थिक संबंधांचे सचिव म्हणून काम करत आहेत. मात्र त्यांनी जर्मनीतही भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. तसेच हाँगकाँग, चीन आणि अमेरिका या देशांमध्येही त्यांनी काम केले आहे.

फिल सिमन्स अफगाणिस्तानचे नवीन प्रशिक्षक :

  • आयसीसीकडून Test Playing Nations चा दर्जा मिळाल्यानंतर नवोदीत अफगाणिस्तानच्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टीने गंभीरपणे पावले टाकायला सुरुवात केली आहे.
  • वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू फिल सिमन्स यांची 2019 च्या विश्वचषकापर्यंत अफगाणिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदावर नेमणूक करण्यात आलेली आहे. याआधी फिल सिमन्स यांनी वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि आयर्लंडच्या संघाला प्रशिक्षण दिले आहे.
  • माजी भारतीय खेळाडू लालचंद राजपूत यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांना मुदतवाढ नाकारली. यानंतर बोर्डाने फिल सिमन्स यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. सिमन्स 8 जानेवारीपासून आपल्या पदाचा कार्यभार सांभाळतील.

देशातील डॉक्‍टर आज काळा दिवस पाळणार :

  • राष्ट्रीय आरोग्य विधेयकाला विरोध करण्यासाठी देशातील डॉक्‍टर 2 जानेवारी हा काळा दिवस पाळणार आहेत. त्यामुळे शहरातील बाह्यरुग्ण विभाग सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, नियोजित शस्त्रक्रियाही पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे यांनी दिली.
  • भारतीय वैद्यक परिषद (एमसीआय) बरखास्त करून राष्ट्रीय वैद्यक आयोग (एनएमसी) स्थापन करण्याचे विधेयक संसदेत मांडणार आहे. या विधेयकातून देशातील वैद्यकीय सेवेवर दूरगामी परिणाम होणार आहेत. त्यामुळे या विधेयकाला विरोध करण्यासाठी देशातील डॉक्‍टर 2 जानेवारी हा काळा दिवस म्हणून पाळणार आहेत.

नववर्षात महापालिकेचे मेगा प्रोजेक्‍ट :

  • नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतील मेगा प्रोजेक्‍टची घोषणा केली आहे.
  • एप्रिलपासून नरिमन पॉइंट ते वरळीपर्यंतच्या प्रकल्पाचे काम सुरू होईल. या वर्षात 10 ते 15 हजार कोटींच्या महाकाय प्रकल्पांची कामे सुरू होण्याची शक्‍यता आहे.
  • आशिया खंडात जलबोगदे बांधण्याचा विक्रम मुंबई महापालिकेच्या नावावर आहे. आता नरिमन पाइंट ते मलबार हिलपर्यंत देशातील पहिला समुद्राखालील वाहतूक बोगदा तयार करण्यात येणार आहे.
  • बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानाच्या भूगर्भातूनही महत्त्वाचा रस्ता जाणार आहे. या दोन रस्त्यांच्या कामांबरोबरच वांद्रे पश्‍चिम आणि भायखळा येथे दोन भूमिगत वाहनतळ बांधण्यात येतील.
  • तसेच रस्त्यांवर वाहने उभी करण्यास पुरेशी जागा नसल्याने पालिकेने भूमिगत वाहनतळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनविशेष :

  • लोकमान्य टिळकांनी 2 जानेवारी 1881 मध्ये पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.
  • 2 जानेवारी 1885 मध्ये पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.
  • मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना सन 1936 मध्ये 2 जानेवारी रोजी झाली.
  • 2 जानेवारी 1954 मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ

{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/gjSsWzErNAQ?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.