Current Affairs of 31 March 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (31 मार्च 2018)

चालू घडामोडी (31 मार्च 2018)

राज्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ :

  • राज्यातील शेतकऱ्यांना अखंडितपणे दहा ते बारा तास वीज मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू होणार आहे.
  • शेतकऱ्यांकडे 2400 कोटींची विजेची थकबाकी आहे. ती शेतकऱ्यांनी त्वरित भरल्यास शेतकऱ्यांच्या बिलावरील दंड, व्याज माफ केले जाईल, अशी घोषणा ऊर्जानवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीपनगर (ता. भुसावळ) येथे केली.
  • भुसावळ 6600 मेगावॉट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पाचे भूमिपूजन, विविध ठिकाणच्या वीज उपकेंद्रांच्या ई भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला.
  • मंत्री बावनकुळे म्हणाले, की राज्यात जे 25 वर्षे जुने वीज प्रकल्प आहेत ते बंद करून नवीन प्रदूषणविरहित प्रकल्प सुरू करण्याचे केंद्र व राज्य शासनाने ठरविले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 मार्च 2018)

राज्यात आणखी 21 पासपोर्ट सेवा केंद्रे चालू होणार :

  • राज्यात लवकरच आणखी 21 शहरांमध्ये पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू होणार आहेत. टपाल कार्यालयांत ही सुविधा उपलब्ध होईल.
  • राज्यात सध्या कोल्हापूर, औरंगाबाद, पिंपरी, वर्धा, विक्रोळी, सांगली येथील टपाल कार्यालयांत पासपोर्ट सेवा केंद्रे आहेत.
  • पोस्टाच्या महाराष्ट्र सर्कलने प्रस्तावित केल्याप्रमाणे बीड, जळगाव, नगर, पंढरपूर, जालना, लातूर, नांदेड, अलिबाग, नरिमन पॉईंट व गोवा (दक्षिण) आदी ठिकाणी ही केंद्रे सुरू होतील. या केंद्रांवर नवीन पासपोर्ट नोंदणीची आणि नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध होईल; पण तत्काळ पासपोर्टची सुविधा नसेल.

दोन ट्यूबमधून धावणार भूमिगत मेट्रो रेल्वे :

  • मेट्रोच्या शिवाजीनगर-स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत मार्गाची नेमकी अलाइनमेंट निश्‍चित झाली आहे. या मार्गावर पाच स्थानके असतील.
  • मेट्रो मार्गात दोन वर्तुळाकार ट्यूब असून त्यातून मेट्रोची वाहतूक होणार आहे. या मार्गाच्या निविदा तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली आहे. त्यामुळे भूमिगत मेट्रोसाठी येत्या दोन महिन्यांत कामाला सुरवात होणार आहे.
  • पिंपरी-स्वारगेट मार्ग-शिवाजीनगरमधील कृषी महाविद्यालय-स्वारगेट दरम्यान मेट्रो भूमिगत असेल – 5.5 किलोमीटर भूमिगत मेट्रोचा मार्ग – कृषी महाविद्यालय, संचेती चौक, सीओईपीचे मैदान, धान्य गोदाम, नदीपात्राखालून, कुंभारवाडा, फडके हौद चौक, गवळी आळी, नेहरू चौक, शिवाजी रस्ता, स्वारगेट पाच ठिकाणी होणार स्थानके – शिवाजीनगर एसटी स्थानकाजवळ, शिवाजीनगर धान्य गोदाम, कसबा पेठ, महात्मा फुले मंडई, स्वारगेट पाचही स्थानके भूमिगत असून, किमान दुमजली होणार; धान्य गोदामाचे स्थानक बहुमजली सिमला ऑफिस चौकातून म्हणजेच आकाशवाणी केंद्रापासून शिवाजीनगर एसटी स्थानकापर्यंत सुमारे 20 मीटर लांबीचा भूमिगत पादचारी मार्ग असणार भूमिगत मेट्रोसाठी स्वारगेट आणि कृषी महाविद्यालय चौकातून एकाच वेळी कामाला सुरवात होणार भूमिगत मेट्रोचा मार्ग आणि स्थानके जमिनीखाली किमान 20-28 मीटर असतील. त्यामुळे कोणत्याही इमारतींना धक्का पोचणार नाही. भूमिगत मार्ग तयार करताना भूंकपरोधक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.

अमेरिकेची व्हिसा प्रक्रिया फक्त मुंबईतच होणार :

  • व्हिसाशी संबंधित सर्व प्रक्रिया मुंबई येथील केंद्रावर होणार असल्याने दिल्लीतील अमेरिकी दूतावासाकडून येत्या एक एप्रिलपासून आयआर 5, आयआर 1, आयआर 2, सीआर 1 किंवा सीआर 2 या व्हिसांवर प्रक्रिया होणार नाही.
  • तसेच त्यामुळे अमेरिकी नागरिकाचे पालक, पत्नी अथवा अल्पवयीन अपत्य यांना अमेरिकेत स्थलांतर करण्याच्या दृष्टीने व्हिसा मिळविण्यासाठी आता मुंबई गाठावी लागणार आहे.
  • ज्या व्यक्तींना दिल्लीतील कार्यालयाने मुलाखतीसाठी एक एप्रिलनंतरची तारीख पूर्वीच दिली असेल, त्यांना पत्र पाठवून नवे ठिकाण कळविले जाईल, असे अमेरिकी दूतावासातर्फे सांगण्यात आले आहे.

दीपेश करमोडाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद :

  • जिल्हा परिषदेच्या गोवणे (ता. डहाणू) येथील शाळेतील दीपेश रामचंद्र करमोडा (सहावी, वय 11; मु. पो. साखरे) या आदिवासी विद्यार्थ्याने ‘फास्टेस्ट टू अरेंज अल्फाबेट्‌स’ या प्रकारात वर्गशिक्षकाचा 28.45 सेकंदांचा विक्रम मोडून 26.30 सेकंदांचा नवा विश्वविक्रम ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस’मध्ये नोंदवला आहे. असा विक्रम करणारा दीपेश हा जिल्हा परिषद शाळेत शिकणारा देशातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.
  • सरावादरम्यान दीपेशने 27 सेकंदांत ही क्रिया (ऍक्‍टिव्हिटी) पूर्ण केली. सरावासाठी त्याचा मोठा भाऊ गुलशन व बहिणींनी त्याला मदत केली. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दीपेशच्या या रेकॉर्डचे शूटिंग करण्यात आले.
  • दीपेशचा सराव एवढा होता, की पहिल्याच प्रयत्नात त्याने वेग व अचूकता यांचा योग्य मेळ साधत अवघ्या 26.30 सेकंदांमध्ये ही क्रिया पूर्ण केली. सर्व आवश्‍यक सोपस्कार पार पडल्यानंतर 28 मार्च रोजी दीपेशची गिनिजमध्ये नोंद झाल्याचे जाहीर करण्यात आले.

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी :

  • भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या 153व्या जन्मदिनानिमित्त गुगलने त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.
  • नाकात नथ आणि पारंपारिक साडी परिधान केलेल्या वेशात आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याचे डिग्री प्रमाणपत्र दाखवतानाचे त्यांचे रेखाचित्र साकारुन डुडलद्वारे गुगलने त्यांना अभिवादन केले आहे. बंगळूरुस्थित रेखाचित्रकार कश्मिरा सरोदे यांनी हे चित्र साकारले आहे.
  • यानिमित्त गुगलने लिहीलेल्या आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, 1886मध्ये एक तरुण महिला डॉक्टर अमेरिकेहून भारतात परतली. त्यानंतर कोल्हापूरच्या अल्बर्ट एडवर्ड रुग्णालयात तिने महिलांच्या वॉर्डसाठी फिजिशिअन म्हणून कार्यभार स्विकारला.
  • भारतातील केवळ पहिली महिला डॉक्टरच नव्हे तर सर्वात कमी वयात अर्थात अवघ्या 19व्या वर्षात वैद्यकीय पदवी घेतलेली ही पहिली महिला डॉक्टर होती. तिचे नाव होते आनंदी गोपाळ जोशी. त्या धाडस आणि चिकाटीचे प्रतिक होत्या. जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी पुण्यातील एका सधन कुटुंबात झाला होता.

रिलायन्स जिओची प्राईम युजर्ससाठी मोठी घोषणा :

  • रिलायन्स जिओच्या प्राईम मेंबर्सची सेवा 31 मार्चला संपणार होती. त्यामुळे आता ही सेवा बंद होणार किंवा यापूर्वी केलेल्या रिचार्जचे काय होणार? असा प्रश्न अनेक युजर्सना पडला होता. मात्र, आता प्राईम युजर्सना काळजी करण्याचे कारण नाही. कारण, आपल्या प्राइम युजर्सना जिओने मोठी भेट दिली आहे. प्राइम युजर्सची वैधता एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या युजर्सना आता पुढील एक वर्षांसाठी प्राईम युजर्सचे सर्व फायदे मिळणार आहेत.
  • जिओच्या प्राइम मेंबर्सची वैधता 31 मार्च रोजी संपणार असल्याने आपली सेवा खंडित केली जाईल तसेच रिचार्ज केलेल्या टॉपअपही बंद होणार का? असे अनेक प्रश्न ग्राहकांच्या मनात होते. मात्र, जिओने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्राईम मेंबरशीपसाठी पुढील एक वर्षांसाठी अर्थात 31 मार्च 2019 पर्यंत याची वैधता वाढणार असून प्राइम मेंबरशीपचे सर्व फायदेही त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे अनेक आकर्षक ऑफर्सचा ग्राहकांना फायदा मिळणार आहे

दिनविशेष :

  • सन 1504 मध्ये 31 मार्च रोजी शिखांचे दुसरे गुरू ‘गुरू अंगद देव’ यांचा जन्म झाला.
  • भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म सन 1865 मध्ये 31 मार्च रोजी झाला.
  • डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
  • 31 मार्च 1889 आरोजी आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले. हा बांधायला 2 वर्षे, 2 महिने व 2 दिवस लागले.
  • भारतीय विद्वान ग्यानी ‘चेत सिंग’ यांचा जन्म सन 1902 मध्ये 31 मार्च रोजी झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 एप्रिल 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.