Current Affairs of 30 March 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (30 मार्च 2018)
अण्णा हजारे यांचे उपोषण अखेर मागे :
- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सात दिवसांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे.
- अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्यांना तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी सरकारला 6 महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे.
- शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल-लोकायुक्तांची नियुक्ती या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावरील ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजारे यांच्या सत्याग्रहाचा सातवा दिवस होता. हे आंदोलन सुरु केल्यापासून तीन दिवसांनी अण्णा हजारे यांचे वजन तीन किलोंनी कमी झाले होते. तसेच इतर आंदोलनकर्त्यांचीही प्रकृती खालावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आपले उपोषण अण्णा हजारे यांनी मागे घेतले. आपल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे यांनी सहा महिन्यांचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे.
Must Read (नक्की वाचा):
कार निर्यातीत मारूती सुझुकी प्रथमस्थानी :
- मारूती सुझुकी ही चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक कार निर्यात करणारी कंपनी ठरली आहे.
- चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मारूतीने ह्युंदाई, फोक्सवॅगन आणि जनरल मोटर्स या कंपन्यांना स्पर्धेत मागे टाकत बाजी मारली आहे.
- एप्रिल ते सप्टेंबर 2017 या काळात मारूती सुझुकीने 57,300 कार्सची निर्यात केली आहे. मागील वर्षी याच काळात मारूतीने 54,008 कार्सची निर्यात केली होती. मारूतीच्या निर्यातीत मागच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 6 टक्के वाढ झालेली आहे.
- आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत मारूतीने चांगलीच आघाडी घेतली आहे. कार निर्यातीत ह्यूंदाई मोटर्स गेली काही वर्षे सातत्याने आघाडीवर होती. परंतु, चालू आर्थिक वर्षात ह्यूंदाईने 44,585 कार्सची निर्यात
- केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तूलनेत ही जवळपास 29.25 टक्क्यांची घसरण आहे. त्यामुळेच ह्यूंदाई मोटर्सची पिछेहाट होत ती फोक्सवॅगन आणि जनरल मोटर्स नंतर चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.
रोहिंग्यांना परत पाठविण्यासाठी भारताने सहकार्य करावे :
- बांगलादेशात 10 लाख रोहिंगे निर्वासित लोक राहत असून त्यांना म्यानमारला परत पाठविण्यासाठी भारताने सहकार्य करावे, अशी मागणी बांगलादेश उचायुक्त सय्यद मुअझ्झम अली यांनी केली आहे.
- बांगलादेशच्या मुक्ती संग्रामात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका निभावल्याचे नमूद करून सय्यद मुअझ्झम अली यांनी महाराष्ट्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अली यांनी राज्यपाल के. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली त्या वेळी ते बोलत होते.
- बांगलादेश व भारत यांच्यातील संबंध आज सर्वोच्च पातळीवर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या शेजारी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याच्या धोरणाचा हा परिपाक असल्याचे त्यांनी नमूद केले. चित्तगाव बंदर भारतातील उत्तर पूर्व राज्यांसाठी खुले करणार असल्याचे नमूद करून भारताने बांगलादेशात जहाज बांधणी आणि औषधी निर्माण या क्षेत्रांत मोठी गुंतवणूक करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
- भारताची बांगलादेशातील गुंतवणूक सातत्याने वाढत असून रिलायन्स, अदाणी यांसह अनेक उद्योगांनी ऊर्जा, पायाभूत सुविधा व इतर क्षेत्रांमध्ये एकूण 9 ते 10 अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक केली असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.
इस्त्रोकडून आणखी एक यशस्वी भरारी :
- भारताच्या आजवरच्या सर्वात मोठया स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या दळणवळण उपग्रहाचे इस्त्रोने 29 मार्च रोजी यशस्वी प्रक्षेपण केले.
- आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन संध्याकाळी 4.56 च्या सुमारास GSLV रॉकेटमधून GSAT-6A उपग्रह अवकाशात झेपावला.
- 2066 किलो वजनाच्या या उपग्रहाच्या बांधणीसाठी 270 कोटी रुपये खर्च आला आहे. या उपग्रहाचे आयुर्मान 10 वर्षआहे. GSAT-6A उपग्रह GSAT-6 या उपग्रहासारखाच असल्याचे इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे.
- GSAT-6A या दळणवळण उपग्रहाकडे सर्वात मोठी अँटिना असून इस्त्रोने या अँटिनाची निर्मिती केली आहे. इस्त्रोचे माजी अध्यक्ष किरण कुमार यांनी ही माहिती दिली.
- उपग्रह अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर ६ मीटर व्यासाचा हा अँटिना छत्रीसारखा उघडेल.
- GSAT-6A हा उपग्रह तीन वर्षांपूर्वी अवकाशात पाठवण्यात आलेल्या GSAT-6 या उपग्रहाला मदत करणार आहे.
- GSAT-6A मुळे सॅटलाइट आधारित मोबाइल कॉलिंग आणि कम्युनिकेशन सेवा अधिक प्रभावी होईल.
- GSAT-6A मुळे दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होईल.
- GSAT-6A च्या प्रक्षेपणासाठी जीएसएलव्हीमध्ये क्रायोजेनिक इंजिनासह विकास इंजिनचाही वापर करण्यात आला. भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेत विकास इंजिनचा वापर होऊ शकतो.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात आता ‘रामजी’चा समावेश होणार :
- घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात एक महत्त्वाचा बदल होणार आहे. उत्तर प्रदेशात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव आंबेडकर असे लिहिले जात होते. आता त्यांच्या या नावात त्यांच्या वडिलांचे नावही समाविष्ट केले जाणार आहे.
- रामजी मालोजी सकपाळ हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिल होते. बाबासाहेब आंबेडकर सही करतानाही भीमराव रामजी आंबेडकर अशीच सही करत. त्याचमुळे उत्तरप्रदेशात आता बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर असे लिहिले जाणार आहे. राज्यपाल राम नाईक यांच्या सल्ल्यानंतर हा बदल केला जणार आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थात भीमराव आंबेडकर यांच्या नावात त्यांच्या वडिलांच्या नावाचा समावेश करण्यासाठी 2017 मध्ये एक कँपेन चालवण्यात आले होते. त्यावेळी राम नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिले होते.
- महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लिहिताना भीमराव रामजी आंबेडकर असेच लिहिले जाते. त्यामुळे उत्तर प्रदेशातही ते तसेच घेतले जावे असे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वैष्णवी सुतार हिची निवड :
- ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अपंग टेबल टेनिसपटू वैष्णवी विनायक सुतार हिची निवड झाली आहे. चार ते पंधरा एप्रिल दरम्यान स्पर्धा होत आहे.
- पँरा टेबल टेनिसमधून देशातील फक्त दोन खेळाडूंची निवड झाली आहे. त्यांपैकी सुतार या कोल्हापूरच्या कन्येने आंतरराष्ट्रीय रँकिंगच्या जोरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला आहे.
- इंडियन ऑलिम्पिक असोशिएशन (IOA), स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडीया (SAI) व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियातर्फे (TTFI) निवड करण्यात आली.
- वैष्णवी सुतार हिने आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन कास्यपदक, 6 राष्ट्रीय स्पर्धेत 3 सुवर्ण, 2 रजत पदक मिळवले आहे.
- महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय कास्यपदक विजेती अपंग (पॅरा) टेबल टेनिसपटू बनण्याचा मान मिळवला आहे. तिचे आंतरराष्ट्रीय मानांकन 21 व एशियन मानांकन 11 आहे. त्यामुळे त्यांची निवड झाली आहे.
दिनविशेष :
- सन 1929 मध्ये 30 मार्च रोजी भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
- भारतीय भूदलाचे 6वे सरसेनापती जनरल ‘कोडेन्डेरा सुबय्या’ तथा ‘के.एस. थिमय्या’ यांचा जन्म 30 मार्च 1906 मध्ये झाला.
- ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे स्थापक ‘क्लाउस स्च्वाब’ यांचा जन्म सन 1938 मध्ये 30 मार्च रोजी झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा