Current Affairs of 31 December 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (31 डिसेंबर 2016)
‘भारत इंटरफेस फॉर मनी’ अॅपचे उद्घाटन :
- स्मार्टफोन किंवा अगदी साधा फोन असणारा मोबाइल आणि अंगठय़ाचा ठसा एवढीच आवश्यकता असणारे ‘भीम’ नावाच्या आधार क्रमांकावर आधारलेल्या पेमेंट अॅपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर रोजी उद्घाटन केले.
- नजीकच्या काळात देशातील सारे व्यवहार या अॅपवरून होण्याचा दावा मोदींनी केल्याने पेटीएम, मोबीक्विक, फ्रीचार्ज, एसबीआयबीडी यासारख्या खासगी ‘ई-वॉलेट’ना चांगलेच आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
- ‘भारत इंटरफेस फॉर मनी’ असे या अॅपचे खरे नाव. पण त्यावरून ‘भीम’ असे राजकीयदृष्टय़ा सूचक असणारे नामाभिधान मोदींनी केले आणि प्रतिष्ठेच्या केलेल्या ‘लेस कॅश’ मोहिमेला थेट राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. या वेळी मोदींनी बाबासाहेबांच्या आर्थिक क्षेत्रातील कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला.
- रिझव्र्ह बँकेच्या स्थापनेमधील आंबेडकरांच्या योगदानाकडेही त्यांनी लक्ष वेधले. सुमारे दोन आठवडय़ांत हे अॅप पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.
- पंतप्रधान म्हणतात की ‘आजपर्यंत अशिक्षितांना, गरिबांना अंगठेबहाद्दर म्हणून हिणविले गेले. पण आता काळ बदललाय, देश बदललाय. तुमचा अंगठा हीच तुमची बँक असेल. तुमची ओळख असेल. कारण बँकिंग व्यवहार करण्यासाठी तुम्हाला फक्त अंगठय़ाचा ठसा लागेल. यापुढे तुम्हाला कदाचित इंटरनेट लागणार नाही, स्मार्टफोन लागणार नाही.. पण तुमच्या अंगठय़ाचा ठसा बँक म्हणून काम करीत राहील.
Must Read (नक्की वाचा):
जगातील सर्वात उंच पूल वाहतुकीसाठी खुला :
- चीन हा देश अत्यंत महत्वाकांक्षी देश म्हणून जगभरात लोकप्रिय आहे.
- चीन देशाच्या नावे अशा वास्तू, शिल्प बांधण्याचे विक्रम आहेत. चीनमधील युनाना-गीझू या दोन प्रांताना जोडणारा पूल 29 डिसेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला केला आहे.
- तसेच या दोन्ही ठिकाणी पूर्वी पोहचण्यास चार तासांहूनही जास्त वेळ लागत असे, मात्र आता हे अंतर केवळ एक तासात करता येणे शक्य आहे.
- बेईपानजियांग नावाचा हा पूल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत उंच पूल आहे.
- अभियांत्रिकीचे आश्चर्यचकित करणारी अनेक उदाहरणे चीनमध्ये पाहायला मिळतात. काचेच्या पुलानंतर आता चीनमधला सगळ्यात उंच असा हा पूल आहे. हा पूल जमिनीपासून एक हजार 854 फूट उंचीवर आहे. या पुलाची लांबी एक हजार 341 मीटर आहे. त्यामुळे जगातील सर्वात उंच पुलाच्या यादीत या पुलाचा सामावेश झाला आहे.
- चीनमध्ये जगातील पहिला उंच काचेचा पूल सप्टेंबरमध्ये पर्यटकांसाठी खुला केला होता.
बाळासाहेब विखे पाटील यांचे निधन :
- माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ विठ्ठलराव ऊर्फ बाळासाहेब विखे पाटील (वय 84 वर्ष) यांचे लोणी (जि. नगर) येथे राहत्या घरी 30 डिसेंबर रोजी निधन झाले.
- तब्बल सात वेळा खासदार राहिलेल्या व केंद्रात मंत्रिपद भूषविलेल्या विखे पाटील यांचा नगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात मोठा दबदबा होता. त्यांचे वडील (कै.) विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे सहकारी तत्त्वावरील आशिया खंडातील पहिला साखर कारखाना सुरू केला. बाळासाहेबांनी पुढे सहकार चळवळ वाढविण्यासाठी काम केले.
- केंद्रीय अवजड उद्योगमंत्री व केंद्रीय अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करताना विखे पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.
- राजीव गांधी पंतप्रधान असताना विखे पाटील यांनी देशभरातील 45 खासदारांना एकत्र करून ‘कॉंग्रेस फोरम फॉर ऍक्शन’ स्थापन करून आपले वेगळेपण सिद्ध करून दाखविले होते.
- सरकारने विखे पाटील यांच्या अनुभवाची, ज्ञानाची व कामाची दखल घेत त्यांची देश व जागतिक पातळीवरील विविध समित्यांवर नियुक्ती केली होती.
- केंद्र सरकारच्या संरक्षणविषयक समितीच्या अध्यक्षपदाचा त्यामध्ये समावेश होता. त्यांना 2009 मध्ये ‘पद्मभूषण’ किताबाने गौरविण्यात आले होते.
हस्तीदंत्तच्या सर्व प्रकारच्या व्यवसायावर बंदी :
- हत्तींच्या सुरक्षतेसाठी हस्तीदंत्तच्या सर्व प्रकारच्या व्यवसायावर बंदी घालण्याची घोषणा चीनतर्फे करण्यात आली.
- सन 2017 अखेरपर्यंत हस्तीदंत्ताचा सर्व प्रकारचा व्यवसाय बंद होणार आहे.
- नामशेष होणार्या प्रजातीबाबत साऊथ आफ्रिकेमध्ये ऑक्टोबर 2016 आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या दबावानंतर चीनतर्फे हा निर्णय घेण्यात आला.
- जगातील हस्तीदंत व्यवसायात चीनचा 70 टक्के सहभाग आहे हे विशेष.
- तसेच यापूर्वी केनिया देशाने एप्रिल 2016 मध्ये 105 टन हस्तीदंत्त नष्ट केलेले आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा