Current Affairs of 30 December 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (30 डिसेंबर 2016)
अण्णा द्रमुकचे नेतृत्व व्ही.के. शशिकला यांच्याकडे :
- तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांच्याकडे ऑल इंडिया अण्णा द्रमुकचे (AIADMK) सर्वेसर्वा म्हणून नेतृत्व सोपविण्याचा ठराव पक्षाने 29 डिसेंबर रोजी मंजूर केला.
- शशिकला यांची पक्षाचे महासचिव (जनरल सेक्रेटरी) म्हणून निवड करण्यात येईल किंवा हे पद रिक्त ठेवून त्यांच्यासाठी वेगळे पद निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर निवड करण्यासाठी पक्षाच्या वतीने चेन्नई येथे सर्वसाधारण बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
- तसेच यानुसार व्ही.के. शशिकला यांच्याकडे पक्षाची सर्व सूत्रे सोपविण्यात आली. जयललिता यांनी पक्षाच्या महासचिवपदाची जबाबदारी तीस वर्षे सांभाळली.
- AIADMK पक्षामध्ये शशिकला यांच्या नेतृत्वाला कोणाचेही अंतर्गत आव्हान नाही. पक्षाचे जिल्हा सचिव आणि विविध विभागांच्या अध्यक्षांनी यापूर्वीच शशिकला यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे.
Must Read (नक्की वाचा):
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पक्षातून निलंबित :
- अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह सहा जणांना पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) मधून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.
- मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह उपमुख्यमंत्री चौना मे, जॅम्बे ताशी, सी. टी. मे, पी.डी. सोना, झिंनू नामचूम आणि कामलुंग मोसांग या पार्टी विरोधी आमदारांना पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) मधून निलंबित करण्यात आले आहे.
- अरुणाचल प्रदेशच्या राजकरणात गेल्या वर्षभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडत पेमा खांडू यांनी 42 आमदारांसह पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये प्रवेश केला आणि सत्तास्थापन केली. यावेळी सत्तास्थापन करण्यासाठी पेमा खांडू यांना भाजपाची साथ घेतली.
- मात्र, गेल्या काही दिवसांपासून पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये पेमा खांडू यांच्याविरोधात धूसफूस वाढल्याचे दिसून येत होते. दरम्यान, पेमा खांडू यांच्यासह सहा जणांचे प्राथमिक सदस्यत्व पार्टीने रद्द केले आहे.
नवीन वर्षात नवा विश्वविक्रम गाठण्यास ‘इस्रो’ सज्ज :
- एका वेळी 83 उपग्रह अवकाशात सोडून एक नवा विश्वविक्रम गाठण्यास भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्रो) सज्ज झाली आहे.
- पुढील वर्षात जानेवारी महिन्यात इस्रो तीन भारतीय व 80 परकी उपग्रह “पीएसएलव्ही-सी37′ या प्रक्षेपकातून एकाच वेळी सोडणार आहे.
- तसेच या महत्त्वाकांक्षी मोहिमेवर काम सुरू असून, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही राबविली जाईल. याची तारीख अद्याप निश्चित केली नाही, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी दिली.
- पुढील वर्ष इस्रोसाठी अत्यंत धावपळीचे ठरणार आहे. 48 ट्रान्सपॉंडरसह “जीसॅट-17′, त्यानंतर 12 ट्रान्सपॉंडरच्या “सार्क’ उपग्रह यांचे उड्डाण इस्रो करणार आहे.
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेले “जीसॅट-11′ व “जीसॅट-19′ ची मोहीम आहे. 14 गिगाबाइट व 90 गिगाबाइट क्षमतेचे “मल्टिबिम’ उपग्रहावर काम करण्यात येणार आहे,” असे किरण कुमार यांनी सांगितले.
अवकाशवेधाच्या कामगिरीत महत्त्वाचे वर्ष :
- सौरमालेतील बुधापासून बर्फाळ बटू ग्रह असलेल्या प्लुटोपर्यंत प्रवास करून काही अवकाशयानांनी या वर्षी महत्त्वाची कामगिरी पार पाडली. अवकाशाचा वेध घेण्यात हे महत्त्वाचे वर्ष ठरले, असे नासाचे प्रशासक चार्लस बोल्डन यांनी म्हटले आहे.
- बुध ग्रहावर या वर्षी दक्षिण गोलार्धात मोठी दरी सापडली असून त्यात हा ग्रह आकुंचन पावत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. नासाच्या मेसेंजर यानाने बुधाची अगदी स्पष्ट छायाचित्रे घेतली असून त्यात रेम्ब्रांट खोऱ्यात एक हजार किलोमीटरची दरी दिसत आहे.
- नासाच्या ज्युनो या सौर अवकाशयानाने 5 जुलैला गुरूच्या कक्षेत प्रवेश केला, यानाने गुरूला 36 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत.
- नासाच्या हबल अवकाश दुर्बिणीने गुरूच्या युरोपा या चंद्रावरील पाण्याच्या वाफा टिपल्या आहेत. तेथील महासागराच्या बर्फाला हातही न लावता त्याचे निरीक्षण करण्याची संधी त्यामुळे प्राप्त झाल्याचे वैज्ञानिकांना वाटते.
- बारा वर्षे शनीच्या कडय़ांचे निरीक्षण केल्यानंतर नासाचे कॅसिनी अवकाशयान आता प्रवासाच्या अंतिम टप्प्यात आहे.
- कॅसिनी यान एफ कडय़ाच्या जवळ जाणार आहे. अंतिम टप्प्यात ते शनीच्या कडय़ांच्या मधल्या जागेतून प्रवास करणार आहे.
बुध्दिबळ स्पर्धेत संजीव नायरचा विजय :
- मुंबईकर युवा बुध्दिबळपटू संजीव नायरने (इलो 1899) याने मुंबई आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी इजिप्तचा ग्रँडमास्टर हेशाम अब्दलरहमान (इलो 2408) याला पराभूत केले.
- तसेच अन्य एका लढतीत बिहारचा ग्रँडमास्टर सौरभ आनंदने अर्मेनियाचा सहावा मानांकीत ग्रँडमास्टर कारेन मोवस्झस्झीयनला पराभूत केले.
- बीकेसी येथील माऊंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 19 वर्षीय संजीवने सफेद मोहऱ्यांनी खेळताना लक्षवेधी कामगिरी केली.
- हेशामने सिसिलियन नाजडोर्फ पध्दतीने खेळताना चांगली सुरुवात केली. परंतु, संजीवने देखील त्याला तोडिस तोड उत्तर देताना चांगले नियंत्रण राखले. हेशामने काही ठिकाणी केलेल्या माफक चुकांचा अचूक फायदा उचलताना संजीवने बोर्डवर वर्चस्व मिळवले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा