Current Affairs of 2 January 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (2 जानेवारी 2017)

चालू घडामोडी (2 जानेवारी 2017)

ऑलिंपिक पदकासाठी ‘मिशन-2020’ :

  • ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्यानंतरही महाराष्ट्राला ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळावे, यासाठी राज्याच्या क्रीडा संचालनालयाने “मिशन-2020” असा प्रयोग प्रथमच हाती घेतला आहे.
  • किमान वीस ते बावीस खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये पदक मिळवावे, यासाठी दर्जेदार खेळाडूंचा शोध घेतला जात आहे.
  • दोन महिन्यांत खेळाडूंची अंतिम यादी तयार होऊन खेळाडूंना अद्ययावत प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
  • श्री. जाधव यांनी 1952 ला हेलसिंकीमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये कास्यपदक मिळविले. त्यानंतर महाराष्ट्रातील एकाही खेळाडूला पदक मिळविता आलेले नाही.
  • गोल्डनबॉय वीरधवल खाडे व आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत यांनी ऑलिंपिकमध्ये धडक मारली होती. पदकाचा नेम साधण्यात दोघेही अपयशी ठरले.
  • श्री. जाधव यांनी त्या काळात अद्ययावत सुविधा, प्रशिक्षण नसताना पदकावर आपले नाव कोरले होते.
  • आज खेळाडूंना सोयी-सुविधा पुरवूनही ऑलिंपिकसाठी राज्यातील खेळाडू पात्र ठरत नसल्याचे चित्र आहे. तसेच ते बदलण्यासाठी टोकिओ (जपान) येथे 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्याच्या उद्देशाने क्रीडा संचालनालयाने प्रयोग हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने वीस ते बावीस संघटनांच्या बैठका नुकत्याच पुण्यात विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या.

विद्युल्लता पंडित यांना सदानंद वर्दे पुरस्कार जाहीर :

  • श्रमजीवी संघटना-महाराष्ट्र आणि विधायक संसद या संस्था संघटनेच्या संस्थापिका व श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष असलेल्या विद्युल्लता पंडित यांना ‘साने गुरूजी आरोग्य मंदिर’ या संस्थेकडून ‘सुधाताई व सदानंद वर्दे पुरस्कार’ नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
  • महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आणि महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्यायाच्या चळवळीत जीवनाच्या अखेरपर्यंत समर्पित भावनेने कार्यरत राहिलेले स्व. सदानंद आणि सुधा वर्दे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मानाचा आहे.
  • विद्युल्लता पंडित यांनी पती व श्रमजीवींचे नेते आणि वसई चे माजी आमदार विवेक पंडित यांच्या साथीने 37 वर्षांपूर्वी या दोन्ही संस्था-संघटनेची मुहूर्तमेढ रोवली.
  • तसेच त्यांनी या माध्यमातून ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, मुंबई उपनगर या जिल्ह्यांतील हजारो उपेक्षित श्रमजीवी, आदिवासी, शेतमजूर स्थलांतरित वीटभट्टी मजूर, बालमजूर, विकासापासून वंचित असलेल्या श्रमजीवी मजूर महिलांच्या न्याय्य हक्क आणि सन्मानासाठी कार्य केले आहे.

भारतीय टेनिसपटू सोमदेवने निवृत्ती स्वीकारली :

  • नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी एकेरीतील स्टार खेळाडू सोमदेव देव वर्मनने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली.
  • सोमदेव गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे त्रस्त होता. त्याचा प्रभाव त्याच्या कारकिर्दीवर झाला आणि अखेर त्याने टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
  • सोमदेवने 2008 मध्ये टेनिसमध्ये पदार्पण केले त्यावेळी तो भारताचा एकेरीतील स्टार खेळाडू होता.
  • भारताच्या डेव्हिस कप संघाचा नियमित सदस्य असलेला सोमदेव 14 सामने खेळला आणि 2010 मध्ये भारताला विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
  • सोमदेवने एटीपी टूर-2009 चेन्नई ओपनमध्ये वाईल्ड कार्ड प्रवेश मिळवताना अंतिम फेरी गाठली होती. त्याचप्रमाणे 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका ओपनमध्ये अंतिम फेरी गाठली होती.
  • सोमदेवने ग्वांग्झूमध्ये 2010 च्या आशियाई स्पर्धेत एकेरी व दुहेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. 2011 मध्ये तो अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाध्यक्षपदी वसंत डहाके :

  • अकोला येथे 2829 जानेवारी रोजी होणाऱ्या चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची निवड करण्यात आली होती.
  • मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ही जबाबदारी पार पडू शकत नाहीत. त्यामुळे आता ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने चार वर्षांपासून अकोला येथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.
  • तसेच या वर्षी अकोला येथील स्वराज्य भवनच्या प्रांगणात 2829 जानेवारी रोजी होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे, तर डॉ. अभय पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.

दिनविशेष :

  • 2 जानेवारी हा धुम्रपान विरोधी दिन आहे.
  • ब्रिटीश ईस्ट ईंडीया कंपनीने 2 जानेवारी 1757 रोजी कोलकाता काबीज केले.
  • 2 जानेवारी 1885 रोजी पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज सुरु करण्यात आले.
  • मराठी समाजसुधारक व धर्मसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे 2 जानेवारी 1944 हा स्मृतीदिन आहे.
  • 2 जानेवारी 1960 हा भारतीय क्रिकेट खेळाडू रमण लांबा यांचा जन्मदिन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.