Current Affairs of 30 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (30 मार्च 2016)

चालू घडामोडी (30 मार्च 2016)

बिग बींना चौथ्यांदा नॅशनल अ‍ॅवॉर्ड :

  • महानायक अमिताभ बच्चनने ‘पीकू’साठी या वर्षीचा बेस्ट अ‍ॅक्टरचा अ‍ॅवॉर्ड जिंकला आहे, त्यांचा हा चौथा नॅशनल अ‍ॅवॉर्ड आहे.
  • ‘पीकू’ मध्ये अमिताभ बच्चनने एक अशा खडूस बंगाली वयोवृद्धाची भूमिका केली जो आपल्या मुलीवर (पीकू) अवलंबून असतो आणि नेहमी तिच्यासोबत वाद घालीत असतो.
  • 70 च्या दशकापासून चित्रपटात काम करणाऱ्या अमिताभ यांना 1991 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार ‘अग्निपथ’ या चित्रपटासाठी मिळाला.
  • अमिताभ बच्चन यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार संजय लीला भन्सालींच्या ‘ब्लॅक’ चित्रपटासाठी 2007 मध्ये मिळाला.  
  • बिग बींना तिसरा अ‍ॅवॉर्ड बाल्कीचा चित्रपट ‘पा’ मध्ये आरोच्या भूमिकेसाठी 2010 मध्ये मिळाला आणि आता ‘पीकू’ साठी त्यांना चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 मार्च 2016)

टीम चिट्टोकचा सायकलयात्रेचा नवा विक्रम नोंदविला :

  • ‘वर्ल्डस् फास्टेस्ट किवी’ म्हणून प्रसिद्ध न्यूझीलंडच्या टीम चिट्टोक याने भारताच्या सुवर्ण चतुर्भुज (इंडियन गोल्डन क्वाड्रिलॅटरल) ही सुमारे 6 हजार किमीपर्यंची सायकलयात्रा पूर्ण करीत नवा विक्रम केला आहे.
  • चिट्टोक याने न्यूझीलंडच्या दूतावासापासून सायकलने प्रवास करीत चेन्नई, कोलकाता, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, भुवनेश्वर, जयपूर, कानपूर, पुणे, गुंटूर आणि विशाखापट्टणम असे जवळजवळ 6000 किमीचे अंतर पूर्ण केले.
  • तसेच त्याने दररोज 250 कि.मी. अंतर पार पाडत 24 दिवसांमध्ये हा पल्ला गाठला.
  • चिट्टोक याने न्यूझीलंडच्या वैकाटो विद्यापीठातून कायदा आणि अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली आहे.
  • दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंड ते ऑस्ट्रेलिया असे अंतर पार करीत तो वेगवान सायकलपटू बनला होता.

देशाच्या निर्यातीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर :

  • देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीत आघाडीच्या पाच राज्यांचा वाटा 69 टक्के असला तरीही त्यात एकट्या महाराष्ट्र आणि गुजरातचा वाटा 46 टक्के आहे.
  • निर्यातीत महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • ‘असोचेम’ या उद्योग संघटनेच्या एका अभ्यास अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र आणि गुजरातशिवाय तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांचा या पाच राज्यांत समावेश होतो.
  • 2007-08 ते 2014-15 या वित्तीय वर्षातील निर्यातीचे विश्लेषण केले असता पहिल्या स्थानासाठी महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात तीव्र स्पर्धा असल्याचे दिसून येते.  
  • मात्र 2014-15 या वर्षात 72.83 अब्ज डॉलरची निर्यात करून महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकले.  
  • गुजरातनंतर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. या काळात तामिळनाडूतून 24.47 अब्ज डॉलरची निर्यात झाली.  
  • देशात सध्या सक्रिय असलेल्या एकूण ‘सेझ’ पैकी तीन चतुर्थांश सेझ महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या सहा राज्यांत आहेत.
  • विशेष म्हणजे हीच राज्ये निर्यातीत आघाडीवर आहेत.

ग्रामीण आवास योजनेअंतर्गत सरकार 2.95 कोटी घरे बांधणार :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात गृहनिर्मिती योजनेच्या अंमलबजावणीला मंजूरी देण्यात आली.
  • तसेच या योजनेअंतर्गत बेघरांना तसंच मोडकळीला आलेल्या घरात राहणाऱ्यांना पक्की घरे बांधण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
  • या योजनेखाली 2022 पर्यंत 2.95 कोटी घरे बांधण्यात येणार असून त्यापैकी 1 कोटी घरे येत्या तीन वर्षात बांधण्यात येतील.
  • या घरांच्या बांधकामासाठी सखल भागातल्या प्रत्येक घरासाठी 1.20 लाख रुपये तर डोंगराळ भागासाठी 1.30 लाख रुपयांची आर्थिक मदत पुरविण्यात येईल.
  • 2016-17 ते 2018-19 या तीन वर्षांच्या काळात प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 81,975 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • दिल्ली आणि चंदीगड वगळता देशभरातल्या सर्व ग्रामीण भागात या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
  • सखल भागात घरबांधणीचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात 60:40 तर ईशान्य आणि डोंगराळ भागात 90:10 या प्रमाणात विभागला जाईल.
  • जातीनिहाय जनगणना आणि सामाजिक-आर्थिक माहितीचा उपयोग करुन गरजूंचा शोध घेतला जाईल यामुळे पारदर्शकताही राखली जाणार आहे.
  • संपूर्ण यादीतून ग्रामसभेच्या सहभागातून वार्षिक लाभार्थींची यादी निश्चित केली जाईल.

भारतात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या 101.79 कोटी :

  • भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार भारतातील मोबाईल वापरकर्त्यांचा आकडा 101.79 कोटींवर पोहोचला आहे.
  • 31 जानेवारी 2016 पर्यंतची ही आकडेवारी आहे.
  • तसेच लँडलाईन वापरणा-यांची संख्या 2.53 कोटी आहे.
  • एकूण दूरसंचार वापरकर्त्यांची आकडेवारी 104 कोटींवर पोहोचली आहे.

दिनविशेष :

  • 1699 : शिख धर्मगुरू श्री.गुरू गोबिंद सिंघ यांनी खालसा पंथ ची स्थापना केली.
  • 1929 : इंग्लड ते भारत अशी विमानमार्गे साप्ताहिक टपालसेवा सुरु करण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 मार्च 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.