Current Affairs of 29 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (29 मार्च 2016)

चालू घडामोडी (29 मार्च 2016)

राष्ट्रपतीच्या हस्ते ‘पद्म’ पुरस्कारांचे वितरण :

  • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या ‘पद्म’ पुरस्कारांचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
  • राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा पार पडला.
  • 56 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर इतर मान्यवारांना 12 एप्रिल रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
  • धीरुभाई अंबानी (मरणोत्तर) – रिलायन्स समूहाचे संस्थापक (महाराष्ट्र), श्री. श्री रविशंकर, अभिनेता रजनीकांत यांना पद्मविभूषण पुरस्कार तर प्रियांका चोप्रा, अॅड. उज्वल निकम, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • तसेच भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, अभिनेता अनुपम खेर, मूर्तिकार राम सुतार, गायक उदित नारायण यांचादेखील पद्मभूषण पुरस्कारात समावेश आहे.
  • विशेष म्हणजे लोकमत समूहाचे फोटो एडिटर आणि ज्येष्ठ छायाचित्रकार सुधारक ओलवे यांचाही या पुरस्कारांच्या यादीत समावेश असून त्यांना ‘पद्मश्री’ किताब जाहीर झाला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 मार्च 2016)

सर्व आपत्कालीन सेवांसाठी डायल करा 112 :

  • पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका या आपत्कालीन सेवांसाठी आतापर्यंत देशभर 100, 101 आणि 102 या क्रमांकांवर संपर्क साधावा लागत असे.
  • आता मात्र 112 या एकाच क्रमांकावर या तिन्ही सेवा उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे.
  • टेलिकॉम ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने तिन्ही सेवांसाठी एकच क्रमांक असावा, अशी केलेली शिफारस केंद्रीय मंत्री गटाने मान्य केली.
  • तसेच ही सेवा एका महिन्यात देशभरात अमलात येईल, अशी माहिती दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीत दिली.
  • अमेरिकेत 911 या एकाच क्रमांकावर या सर्व सेवा उपलब्ध होतात.

विद्यापीठाचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर :

  • मुंबई विद्यापीठाचा 2016-17 आर्थिक वर्षाचा शिलकीचा अर्थसंकल्प (दि.28) पार पडलेल्या अधिसभेत मंजूर करण्यात आला आहे.
  • विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी 6 कोटी 39 लाख 54 हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.
  • तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात विविध नावीन्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
  • यामध्ये कौशल्य विकास केंद्र, मेक इन इंडिया केंद्र, डिजिटल विद्यापीठ, संरक्षित जागेचा विकास, स्मार्ट गाव योजना, शैक्षणिक विद्वत्तेची जोपासना, विद्यार्थी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, रेल्वे संशोधन केंद्र, विद्यापीठाची सामाजिक जबाबदारी यांचा समावेश आहे.
  • विद्यापीठाच्या 160 व्या वर्धापन दिनासाठी अर्थ संकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.

जाट समुदायाला आरक्षण देणारे विधेयक मंजूर :

  • जाट समुदायाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणारे विधेयक हरियानाच्या मंत्रिमंडळाने (दि.28) मंजूर केले.
  • तीन एप्रिलपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा जाट समुदायाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाट आणि इतर चार जातींना आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले.
  • आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समुदायाने गेल्या महिन्यात केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
  • ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे.
  • तसेच, या सर्व जातींना ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सरकारी नोकऱ्यांमध्ये सहा टक्के आरक्षणाचा सरकारचा प्रस्ताव आहे.
  • जाट समुदायाला आरक्षण देण्याबरोबरच हरियाना सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यासाठी स्वतंत्र विधेयक मांडण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे.

नांदेड संमेलनाध्यक्षपदी डॉ. एस.एन. पठाण :

  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दीनिमित्त नांदेड येथे 3 एप्रिल रोजी होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.एस. एन. पठाण यांची निवड करण्यात आली आहे.
  • संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
  • अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ, गुरुकुंज आश्रम (जि. अमरावती) व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • डॉ. पठाण हे अखिल भारतीय सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष आणि पुणे येथील एम. आय. टी. विश्वशांती केंद्राचे सल्लागार आहेत.
  • तसेच ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.
  • साहित्य संमेलनात ‘राष्ट्रसंतांचे राष्ट्रनिर्मितीत योगदान’, ‘राष्ट्रसंतांच्या साहित्यातील कृषीविषयक धोरण’ आणि ‘ग्रामगीता एक जीवनग्रंथ’ हे तीन परिसंवाद होणार आहेत.

63 वे राष्ट्रीय पुरस्कार :

  • सर्वोच्च मानाचे समजले जाणा-या 63 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून ‘बाहुबली’ चित्रपटाची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली आहे.
  • तर चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आणि बॉलवूडची ‘क्वीन’ कंगना राणावतला दुस-यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • राष्ट्रीय पुरस्कार यादी –
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ज्युरी) – कल्की (मार्गारिटा विथ स्ट्रॉ)
  • सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री- तन्वी आझमी (बाजीराव मस्तानी)
  • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – दम लगा कै हैशा
  • सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – बजरंगी भाईजान
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – रिंगण
  • सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – रेमो डिसूझा (बाजीराव मस्तानी)
  • सर्वोत्कृष्ट गायक – महेश काळे (कट्यार काळजात घुसली)
  • सर्वोत्कृष्ट गायिका-  मोनाली ठाकर (मोह मोह के धागे, दम लगा कै हैशा)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा – विशाल भारद्वाज (तलवार)
  • सर्वोत्कृष्ट संवाद (विभागून) – जुही चतुर्वेदी (पिकू) आणि हिंमाशू शर्मा (तनू वेड्स मनू रिटर्न्स)
  • विशेष दखल – व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट – हरीश भिमानी (मला लाज वाटते)
  • विशेष दखल – रिंकू राजगुरू (सैराट)

दिनविशेष :

  • 1849 : ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीने पंजाब खालसा केले.
  • 1962 : भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले.
  • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक बोगांडा दिन.
  • तैवान युवा दिन.
  • राष्ट्रीय नौका दिवस.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 मार्च 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.