Current Affairs of 31 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (31 मार्च 2016)

चालू घडामोडी (31 मार्च 2016)

रिझर्व्ह बॅंकेचे नवीन सूत्रे जाहीर :

 • देशातील सर्व बॅंकांना कर्जदर निश्‍चित करण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नवीन सूत्र आणले आहे.
 • ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडिंग’नुसार आता बॅंकांना किमान कर्जदर निश्‍चित करावा लागेल.
 • बॅंकांना तीन वर्षांपर्यंतचे कर्ज आता ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडिंग’नुसार निश्‍चित करावे लागणार आहे.
 • रिझर्व्ह बॅंकेचे नवीन सूत्र एक एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे.
 • तसेच नवीन सूत्रानुसार ठेवीचे दर हे रिझर्व्ह बॅंकेच्या दराशी संलग्न असतील.
 • रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात कपात केल्यास त्याचा थेट आणि तातडीने कर्जदारांना (ग्राहकांना) लाभ मिळणार आहे.
 • मात्र तीन वर्षांपेक्षा अधिकच्या निश्‍चित व्याजदर लागू असणाऱ्या कर्जावर हा नियम लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 मार्च 2016)

म्यानमारच्या अध्यक्षपदी तिन क्‍याव :

 • लष्करी राजवटीकडून लोकशाहीवादी राष्ट्राच्या दिशेने प्रवास करत असलेल्या म्यानमारच्या अध्यक्षपदी (दि.30) तिन क्‍याव यांनी शपथ घेतली.
 • लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांचे विश्‍वासू सहकारी असले तिन क्‍याव यांनी माजी लष्करप्रमुख थेन सेन यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
 • स्यू की यांना अध्यक्षपद स्वीकारण्यास लष्करी राजवटीदरम्यान करण्यात आलेल्या कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे.
 • तसेच त्यामुळे स्यू की यांनी आपले विश्‍वासू सहकारी असलेल्या तिन क्‍याव यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती.
 • स्यू की यांच्या पक्षाला बहुमत असल्यामुळे तिन क्‍याव यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड झाली.
 • लष्करी राजवटीच्या काळात बांधण्यात आलेल्या संसदेच्या इमारतीमध्ये (दि.30) शपथविधी समारंभ झाला.

टाटा स्टील ब्रिटनचा व्यवसाय विकणार :

 • ‘टाटा स्टील’ या भारतातील आंतराष्ट्रीय कंपनीने ब्रिटनमधील आपल्या संपूर्ण व्यवसायाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • प्रामुख्याने स्टीलच्या घसरत्या किंमती, वाढता उत्पादन खर्च आणि चीनशी निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे कंपनीला तेथील व्यवसायात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
 • मुंबईत पार पडलेल्या दीर्घ बैठकीनंतर कंपनीने ब्रिटनमधून पुर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
 • ब्रिटनमध्ये टाटा स्टीलमध्ये 15,000 कर्मचारी कार्यरत आहेत.
 • स्टील उद्योगाला मागणी कमी झाली असून भविष्यातदेखील सुधारणेचे कोणतेही संकेत नसल्याने कंपनीने लवकरात लवकर व्यवसायाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • चीनने स्टीलचे उत्पादन वाढविल्यामुळे ब्रिटन तसेच जगातील इतर देशांच्या स्टील उद्योगासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
 • ब्रिटनच्या ‘कोरस’ कंपनीचे अधिग्रहण केल्यापासून टाटा स्टीलला नफा मिळणे बंद झाले आहे.
 • कंपनीने 2007 साली कोरसचे तब्बल 8.1 अब्ज डॉलरला अधिग्रहण केले होते.

गुरूत्वीय भिंग तंत्राचे बाह्यग्रह शोधण्यात यश :

 • आपल्या आकाशगंगेच्या जवळ शनीसारखा दिसणारा एक ग्रह सापडला असून त्याचा शोध घेण्याऱ्या वैज्ञानिकात एका भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश आहे.
 • नवीन शोधलेला बाह्य़ग्रह शनी व गुरूच्या मधल्या वस्तुमानाचा असून तो सूर्याच्या निम्मे वस्तुमान असलेल्या ताऱ्याभोवती फिरत आहे.
 • जर एक तारा दुसऱ्या ताऱ्याच्या समोर फिरत असेल तर त्याचा प्रकाश जवळच्या ताऱ्याच्या गुरूत्वीय बलामुळे वाकतो.
 • संशोधकांच्या मते गुरूत्वीय सूक्ष्मभिंगाच्या तंत्राने हा ग्रह शोधला असून तो मातृताऱ्याच्या प्रकाशाआधारे शोधलेला नाही.
 • मातृताऱ्याचे अस्तित्व माहिती नसतानाही यात ग्रह शोधता येतो, असे फिजिक्स ओआरजीच्या वृत्तात म्हटले आहे.
 • अमेरिकेतील नोत्रेडेम विद्यापीठातील वैज्ञानिक अपर्णा भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले.
 • हा ग्रह वायूंचा बनलेला असून तो गुरू त्वीय भिंग पद्धतीने शोधला आहे, ही गुरूत्यीय भिंगे ऑगस्ट 2014 मध्ये शोधली गेली होती; त्यांना ओजीएलइ 2014, बीएलजी 1760 अशी नावे दिली होती.
 • ओजीएलइ हा पोलंडचा खगोल प्रकल्प असून त्यात वॉर्सा विद्यापीठातील संशोधक कृष्णद्रव्यसौरमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेत आहेत.
 • संशोधकांच्या मते गुरूत्वीय भिंग प्रणाली 22000 प्रकाशवर्षे दूर असून ती आकाशगंगेसारखी आहे.

प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारणार :

 • राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर उभारण्याचा विचार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी (दि.30) विधानसभेत सांगितले.
 • गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालय 2016-17 च्या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येईल.
 • सरकारी दरानेच होणार उपचार गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाची परवानगी मिळावी म्हणून आवश्यक ते निकष राज्य शासन तातडीने पूर्ण करेल.
 • पीपीपी मॉडेलनुसार उभारण्यात येणाऱ्या महाविद्यालय-इस्पितळांमध्ये सरकारी दरानेच उपचार केले जातील.

टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड :

 • टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
 • जेसन रॉयची धडाकेबाज पाऊणशतकी खेळी व बेन स्टोक्सच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडने किवींचा पराभव केला.
 • नाणेफेक जिंकून इंग्लंडने न्यूझीलंडला फलंदाजीला आमंत्रित करीत 20 षटकांत 8 बाद 153 धावांवर रोखण्याची किमया केली.
 • तसेच या आव्हानाला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने जेसन रॉयने केवळ 44 चेंडूंत 78 धावांची फटकेबाजी करीत संघाच्या विजय निश्चित केला.  
 • रॉय व अ‍ॅलेक्स हेल्स (20) यांनी पहिल्या विकेटसाठी 82 धावांची सलामी दिली.
 • तसेच इंग्लंड ने 17.1 षटकांत 3 बाद 159 धावा करून विजय मिळवला.  

दिनविशेष :

 • 1843 : बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, मराठी रंगभूमीचे जनक यांचा जन्म.
 • 1865 : आनंदीबाई गोपाळराव जोशी, पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक यांचा जन्म.
 • 1867 : प्रार्थना समाजाची स्थापना झाली.
 • 1927 : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
 • 1942 : हिन्दी स्वांतत्र्य संघाची स्थापना झाली.
 • 1966 : रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह ‘ल्युना 10’ अवकाशात सोडला.
 • माल्टा मुक्ती दिन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 एप्रिल 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World