Current Affairs of 30 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (30 जानेवारी 2016)

चालू घडामोडी (30 जानेवारी 2016)

ऑस्ट्रेलियात भारतीयांचा विजय :

  • भारतीय महिला आणि पुरुष खेळाडूंनी (दि.29) मैदानावर इतिहास घडवला.
  • महिला आणि पुरुष क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ‘टी-20’ मालिका जिंकताना ऑस्ट्रेलियात प्रथमच एखादी मालिका जिंकण्याची कामगिरी केली.
  • त्याच वेळी सानिया मिर्झाने मार्टिना हिंगीसच्या साथीत ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीतील आणखी एक विजेतेपद मिळविले.
  • पुरुष संघाचाही मालिका विजय
  • भारतीय पुरुष संघाने ऑस्ट्रेलियात फारशा द्विपक्षीय मालिका खेळलेल्या नाहीत.
  • महेंद्रसिंह धोनीच्या संघाने टी 20 सामन्यांची मालिका जिंकून इतिहास घडवला.
  • आतापर्यंत कसोटी, एकदिवसीय आणि ‘टी 20’ क्रिकेट प्रकारात भारताला येथे मालिका विजय मिळविता आला नव्हता, या वेळी तो त्यांनी साध्य केला.
  • रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवन यांची अर्धशतके निर्णायक ठरली.
  • महिला क्रिकेट – ऐतिहासिक विजय मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर सर्वांत प्रथम भारतीय महिला संघाने तीन वेळच्या विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध टी 20 मालिका जिंकली.
  • या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाचा आधार घेत त्यांनी ऑस्ट्रेलियावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला.
  • आतापर्यंत भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान महिलांचे अकरा सामने झाले असून, त्यात केवळ तिसऱ्यांदाच भारतीय महिलांना विजय मिळविता आला आहे.
  • सानियाचा विजय कायम
  • महिला टेनिसमध्ये दुहेरीत सानिया मिर्झाने मार्टिना हिंगीसच्या साथीत आपला विजय कायम राखला.
  • त्यांनी अँड्रिया हॅलावाच्कोवा-ल्युसी ऱ्हादेच्का जोडीचा पराभव करून ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा जिंकून मोसमाची ‘ग्रॅंड’ सुरवात केली.
  • ऑस्ट्रेलियन स्पर्धेत त्यांचे पहिलेच विजेतेपद असले, तरी त्यांनी सलग तिसऱ्यांदा ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले.

  • सानियाचे हे कारकिर्दीमधील सहावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले.

इराणच्या अर्थव्यवस्था :

  • अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि युरोपीय महासंघासोबत झालेल्या अणुकराराचे पालन केल्यामुळे, इराणवरील कठोर आर्थिक निर्बंध उठवत असल्याचे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केले.
  • इराणमधील 1979 च्या इस्लामी क्रांतीनंतर तेथील बंडखोरांनी 52 अमेरिकी अधिकाऱ्यांना तब्बल 444 दिवस ओलिस ठेवले होते.  
  • क्रांतीत इराणमधील मोहंमद रझा शाह पहलवींचे सरकार उलथवून लावल्यानंतर आजतगायत अयातोल्ला अली खोमेनी यांच्या आणि त्यांच्या समर्थक गटाचे वर्चस्व इराणमध्ये आहे.
  • 1979 च्या क्रांतीपर्यंत अमेरिकेचा पश्‍चिम आशियामधील भरवशाचा मित्र असलेल्या इराणवर नंतर मात्र संक्रांत आली.

मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त :

  • मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून दत्तात्रय पडसलगीकर असतील, यांच्यापूर्वी अहमद जावेद हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते.  
  • भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) 1982 च्या तुकडीचे पडसलगीकर यांच्या नियुक्तीचा आदेश राज्य सरकार 30 जानेवारी रोजी जारी करील.  
  • साधारण पंधरवड्यापूर्वी पडसलगीकर यांना गुप्तचर विभागातून (आयबी) पुन्हा महाराष्ट्र केडरमध्ये सामावून घेण्यात आले. ते अहमद यांच्याकडून पदाची सूत्रे स्विकारतील.
  • अहमद जावेद यांची सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली असून दोन आठवड्यांत ते रुजू होतील.
  • पूर्ण नऊ वर्षांनंतर मुंबईत मराठी माणून पोलीस आयुक्तपदी लाभला आहे. डी. एन. जाधव हे 2007 मध्ये पोलीस आयुक्त होते.
  • आयबीमध्ये पडसलगीकर विशेष संचालकपदी कार्यरत होते, त्यांचा आयुक्तपदाचा कार्यकाळ ऑगस्ट 2018 पर्यंतचा आहे.

मुलींसाठी पोलीस व्हॅनची सेवा :

  • शहरांमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या गावांकडच्या मुलींना सडक सख्याहरींचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो.
  • या जाचातून त्यांची सुटका करण्यासाठी बसस्थानक ते महाविद्यालयापर्यंत त्यांना पोलीसगाडीतून पोहोचवण्याची व्यवस्था पोलिसांनी केली आहे.
  • या सेवेचा प्रारंभ पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला, पोलिसांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
  • फलटण शहरात मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालयासाठी ग्रामीण भागातून मुली येतात. यातील बहुसंख्य तरुणी मुधोजी कॉलेज येथे जातात.
  • बसस्थानकापासून महाविद्यालय दोन किलोमीटरवर असल्याने पायी जाताना त्यांना छेडछाडीचा सामना करावा लागत होता, याबाबत तक्रारी आल्यानंतर पोलीस व्हॅन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय देखमुख यांनी घेतला.
  • व्हॅनमध्ये महिला पोलिसांचीही नेमणूक केली आहे, महाविद्यालयाला जाण्या-येण्याच्या वेळेत ही सेवा दिली जाणार आहे.

महिन्यात रेल्वेचे जास्तीत जास्त 6 तिकीटे बूक करता येणार :

  • दलालांकडून होणारा रेल्वे तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी एक नवा नियम आणला आहे.
  • या नव्या नियमानुसार, आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील एका युजर आयडीवरून एका महिन्यात जास्तीत जास्त 6 तिकीटे बूक करता येणार आहेत.
  • 15 फेब्रुवारीपासून हा नवा नियम लागू होणार आहे.

‘सायबर वॉरफेअर’साठी चिनी लष्कराची सज्जता :

  • भविष्यातील संभाव्य सायबर युद्धासाठी चीनची बलाढ्य पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सज्ज करण्यावर सध्या चीन सरकारचा भर आहे.
  • पीएलए’ अधिक मजबूत करण्यासाठी नवे विशेष दल स्थापन करण्यात आले आहे.
  • व्यूहरचनात्मक मदत दलाची (एसएसएफ) स्थापना करण्यात आली असून, या माध्यमातून ‘पीएलए’ची ताकद काही पटीने वाढविण्याचा प्रयत्न चीन करते आहे.
  • चीन सरकारने मागील वर्षाच्या अखेरीस मोठ्या लष्करी सुधारणांची घोषणा केली होती.
  • तसेच त्या अंतर्गत ‘एसएसएफ’ची स्थापना करण्यात आली असून, त्यामुळे चीनच्या सैन्य दलांची ‘सायबर वॉरफेअर’ची क्षमता, अंतराळातील सुरक्षा आणि ऑनलाइन हल्ला करण्याची ताकद काही पटींनी वाढणार आहे.

उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी :

  • उत्तर कोरिया लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचणीची तयारी करीत आहे.
  • काही दिवसांपासून उत्तर कोरिया क्षेपणास्त्र सोडण्याची तयारी करीत आहे, क्योडो या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र सोडण्याची तयारी डोंगचँग येथे सुरू केली असून आठवडाभरात क्षेपणास्त्र सोडले जाणार आहे. 
     
  • जपानचा मित्र देश असलेल्या अमेरिकेचे उपग्रह अवकाशातून उत्तर कोरियातील घडामोडींवर लक्ष ठेवत असून जपाननेही 2003 पासून उपग्रहामार्फत उत्तर कोरियाच्या प्रदेशावर अवकाशातून टेहळणी सुरू ठेवली आहे.

दिनविशेष :

  • भारत : शहीद दिन
  • 1994 : पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.