Current Affairs of 31 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (31 जानेवारी 2016)

चालू घडामोडी (31 जानेवारी 2016)

आवश्यक परवानग्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी :

  • हॉटेल आणि आदरातिथ्य उद्योगासाठी गृहविभागाकडून घ्याव्या लागणाऱ्या पाच परवानग्या रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
  • राज्यातील उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ या मोहिमेंतर्गत शासकीय परवानग्यांची संख्या कमी करण्यात येत आहेत.
  • त्यानुसार, गेल्या वर्षभरात उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक परवानग्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी करण्यात सरकारला यश आले आहे.
  • हॉटेलांना आता खाद्यनोंदणी प्रमाणपत्र, स्विमिंग पूल परवाना, सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणासाठी परवाना, तसेच सादरीकरण परवाना या पाच परवानग्यांची आवश्यकता राहणार नाही, त्यामुळे विलंब कमी होऊन हॉटेल उद्योगास चालना मिळेल.
  • आता स्थानिक स्वराज्य संस्थेने आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवान्यानंतर हॉटेल व आदरातिथ्य व्यवसाय सुरू करतायेईल.

आयपीएलसाठी 351 खेळाडूंचा लिलाव :

  • इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रासाठी येत्या 6 फेब्रुवारीस खेळाडूंचा लिलाव होत आहे.
  • एकूण 714 खेळाडूंच्या पूलमधून 351 खेळाडू लिलावास उपलब्ध राहतील.
  • ईशांत आणि युवराजसह आठ खेळाडूंची बेसप्राईस (आधारभूत किंमत) दोन कोटी असेल.
  • लिलावात भारताचे 230, तसेच विदेशातील 121 खेळाडूंचा समावेश राहील.
  • आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी ही माहिती देताना सांगितले, की खेळाडूंच्या लिलावासोबतच नवव्या सत्राला सुरुवात होईल.

स्मार्ट सिटीजच्या दुसऱ्या टप्प्या :

  • स्मार्ट सिटीजच्या निवडीत पहिल्या यादीत महाराष्ट्रातील दहापैकी पुणे आणि सोलापूर शहरांचा क्रमांक लागल्याने उर्वरित आठ शहरांची निवड दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.
  • स्मार्ट सिटीजच्या दुसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेत देशातील 54 महाराष्ट्रातील 8 शहरांचा समावेश असून, 1 एप्रिल 2016 रोजी ही स्पर्धा सुरू होईल.
  • त्यासाठी शहरांना विकास योजना व प्रकल्प 30 जूनपर्यंत नव्याने सादर करायचे आहेत, दुसऱ्या टप्प्याचा निकाल ऑगस्टमध्ये लागेल आणि 54 पैकी अंदाजे 40 शहरांची स्मार्ट सिटीजसाठी निवड होईल.
  • स्मार्ट सिटीजसाठी 97 स्पर्धक शहरांचे गुणवत्तेनुसार मूल्यमापन जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, लंडन स्कूला ऑफ इकॉनॉमिक्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अ‍ॅफेअर्स आदी संस्थांच्या तज्ज्ञांनी काटेकोर निकषांवर व पारदर्शी पद्धतीने केले.
  • तसेच त्यात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 20 शहरांची पहिल्या टप्प्यात निवड झाली, अन्य स्पर्धक शहरांनाही त्यांच्या 100 पैकी गुण व क्रमांक देण्यात आले.
  • पहिल्या 20 शहरांना 2015-16 या आर्थिकवर्षापासून स्मार्ट सिटीज मिशनतर्फे नियोजित विकासासाठी आर्थिक सहाय्य सुरू होईल, त्या शहरांच्या विकासाचा अग्रक्रम, तज्ज्ञांच्या सूचना व सल्ल्यानुसार ठरेल.
  • 20 शहरांची निवड पहिल्या टप्प्यात निवड झाली, त्यात निवड झालेल्या पुणे आणि सोलापूर या दोन शहरांनी अनुक्रमे 77.42 टक्के आणि 60.83 टक्के गुण मिळवून दुसरा आणि नववा क्रमांक पटकवला होता.

विद्यापीठाचे विभाजन होणार :

  • आरोग्य विद्यापीठाच्या विभाजनाची चर्चा रंगत असताना आता थेट मुख्यमंत्र्यांनीच ‘आयुष’ चे स्वतंत्र विद्यापीठ नागपूरला स्थापन करण्यासाठी ‘आयुष’ संचालनालयाला समिती गठित करण्याचे आदेश दिल्यानंतर विभाजनाच्या हालचालींनी वेग घेतला आहे.
  • उपरोक्त समितीने त्याचा अहवाल संचालनालयाला सादरही केला आहे.
  • युती शासनाच्या काळात नाशिकमध्ये आरोग्य विद्यापीठाची स्थापना झाली आणि आघाडी सरकारच्या काळात विद्यापीठाने बाळसे धरले.
  • नागपूर येथील एका आयुर्वेद महाविद्यालयाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडे नागपूरला ‘आयुष’चे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, अशी मागणी काहींनी केली होती.
  • त्यावर मुख्यमंत्र्यांनी नागपूरला ‘आयुष’चे स्वतंत्र विद्यापीठ होणे आवश्यक असल्याचे जाहीर करून संचालनालयाला त्यात लक्ष घालण्याचे सूचित केले.
  • त्यानुसार ‘आयुष’ संचालनालयाने समिती स्थापन करून जागेचा शोध घेण्यास आणि विद्यापीठ स्थापनेच्या अनुषंगाने 31 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
  • समितीने नुकताच त्याचा अहवाल संचालनालयाला सादर केला.

संशोधकाने अभ्यासला भारतातील रात्रौ प्रकाश :

  • अमेरिकेच्या एका संशोधकाने गेल्या 20 वर्षांत उपग्रहाद्वारे दररोज रात्री घेतलेल्या छायाचित्रांचे अध्ययन करून भारतात विजेमुळे पडणाऱ्या प्रकाशाच्या इतिहासाला लेखणीद्वारे उद्धृत केले आहे.
  • प्रसिद्धीमाध्यमांसाठी जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
  • तसेच त्यात म्हटले आहे की, मिशिगन विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्रोफेसर ब्रियान मिन यांनी जवळपास 8 हजार रात्रीतील 6 लाखांपेक्षा जास्त गावांतून येणाऱ्या प्रकाशाची उपग्रहातून घेण्यात आलेली छायाचित्रे आणि 4.4 अब्ज डाटा बिंदूंना जोडले आहे.
  • मिन म्हणाले की, हा प्रकल्प भारतातील गावांत आलेल्या प्रकाशातील नाट्यमय बदल दाखवितो.
  • पंजाब आणि हरियाणा येथील ग्रामीण भागात प्रकाशाचे प्रमाण वाढले आहे.  
  • 1993 ते 2013 या काळात गावात विजेसाठी गोबर गॅसचा वापर कमी झाला असून, रॉकेलवरील दिव्यांचा वापरही कमी झाला आहे. मात्र, अजूनही मोठा भूभाग अंधारातच राहतो.
  • या अभ्यासातून निघालेले निष्कर्ष विश्व बँक, यू एस नॅशनल ओशियानिक अँड अ‍ॅटमॉसफेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट सीड यांच्या सहकार्याने बनविण्यात आलेली वेबसाईट नाईट लाईटस्डॉट आयओवर टाकण्यात आले आहेत.

भारत रंग महोत्सव 1 फेब्रुवारीपासून :

  • देशोदेशीच्या नाटय़कलाकार, रसिकांसाठी पर्वणी असलेल्या भारत रंग महोत्सवास 1 फेब्रुवारीपासून दिल्लीत प्रारंभ होत आहे.
  • दहा देश व भारतातील सर्व राज्यांचा सहभाग हे यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे.
  • महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात अभिनेते नाना पाटेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
  • केवळ नाटकच नव्हे तर नाटय़क्षेत्राशी संबंधित विविध वस्तू, उपकरणांचा बाजार, खाद्य विविधता व संगीत-नृत्य कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात असेल.
  • यंदा भारत रंग महोत्सवात ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इटली, पोलंड, बांगलादेश, स्पेन, चीन, ऑस्ट्रिया तसेच पाकिस्तानची नाटके सादर केली जातील.
  • ‘थिएटर के जादू की फिरसे खोज’– या संकल्पनेभोवती या महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे.
  • महोत्सवात भारतीय भाषांमधील एकूण 65 तर 15 विदेशी भाषांमधील नाटके सादर केली जातील, तब्बल 125 नाटकांचे प्रयोग या महोत्सवादरम्यान होणार आहेत.
  • 1999 भारत रंग महोत्सव सुरू झाला. यंदा अहमदाबाद, भुवनेश्वर, तिरुवनंतपूरम व जम्मू-काश्मीरमध्ये ‘भारत रंग’च्या धर्तीवर 3 ते 14 फेब्रुवारीदरम्यान समांतर नाटय़ महोत्सव आयोजित केले जाणार आहेत.

माजी लष्करप्रमुख के. व्ही. कृष्णराव यांचे निधन :

  • बांग्लादेश मुक्तियुद्धात कळीची भूमिका बजावणारे माजी लष्करप्रमुख जनरल के. व्ही. कृष्णराव (92 वय) यांचे (दि.30) लष्करी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
  • त्यांच्याच पुढाकाराने ऐंशीच्या दशकात भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला होता.
  • काश्मीरमध्ये दहशतवादाने थैमान घातले असतानाच्या काळातच त्यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती.
  • तब्बल चार दशके लष्करी सेवा बजावणारे कृष्णराव देशाचे 14वे ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ होते.
  • 9 ऑगस्ट 1942 रोजी ते लष्करात दाखल झाले, दुसऱ्या महायुद्धादरम्यान म्यानमार, ईशान्य भारत व बलुचिस्तान आघाडीवर त्यांनी शत्रूशी दोन हात केले.
  • देशाच्या फाळणीनंतर पूर्व व पश्चिम पंजाबमध्ये उसळलेला हिंसाचाराचा वणवा शांत करण्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले.
  • 1965-66 या काळात लडाखमध्ये एका ब्रिगेडचे, तर 1969-70 या काळात जम्मू विभागातील पायदळाचे त्यांनी नेतृत्व केले.
  • 1970-72 या काळात नागालँड व मणिपूरमधील घुसखोरी हाणून पाडणाऱ्या पहाडी तुकडीचेही त्यांनी नेतृत्व केले, याच काळात 1971 च्या बांग्लादेश मुक्तियुद्धात पूर्व आघाडीवर लढणाऱ्या भारतीय लष्कराचे नेतृत्व करताना त्यांनी आसामचा सिल्हेट जिल्हा ताब्यात घेण्यात व ईशान्य बांग्लादेश मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
  • तसेच त्यांनी बजावलेल्या अतुलनीय लष्करी सेवेबद्दल त्यांचा परमविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवही करण्यात आला होता.

दिनविशेष :

  • 1896 :’ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेते सुप्रसिध्द कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे यांचा जन्म.
  • 1920 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’ या पाक्षिकाची सुरुवात केली.
  • 1992 : 65 वे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.