Current Affairs of 29 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (29 जानेवारी 2016)

चालू घडामोडी (29 जानेवारी 2016)

ऑलिम्पिक 2020 साठी विशेष मोहीम :

  • पदकप्राप्त खेळाडूंना 2020 च्या ऑलिम्पिकसाठी घडविण्याची एक विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्याची चाचणी, निवडपद्धती अंमलात येत आहे, असे राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
  • खेळाडूंना घडविणा-या प्रशिक्षकांनाही घडविण्याची मोहीम क्रीडा विभाग राबविणार असून याद्वारे प्रशिक्षकांची कमतरता दूर करणार आहे.
  • प्रत्येक खेळानुसार विशेष व्यायामाचे धडे देणारी एक आगळी वेगळी व्यायामशाळा मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.
  • जनसेवा मंडळाच्या पुष्पकांत म्हात्रे क्रीडा अकादमीच्या वतीने खास खेळाडूंसाठी सुरू करण्यात आलेल्या या व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा क्रीडामंत्र्याच्या हस्ते झाला.
  • तसेच क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेळाडू तसेच प्रशिक्षक यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

तामिळनाडू सरकारव्दारे पुरस्कारानं सन्मानित :

  • चेन्नईतील पुरात अडकलेल्या तब्बल 2100 जणांना वाचवणाऱ्या 26 वर्षीय एस. मोहम्मद युनूस या वीराला तामिळनाडू सरकारने ‘अण्णा मेडल फॉर गॅलन्ट्री’ या पुरस्कारानं सन्मानित केले आहे.
  • मुख्यमंत्री जयललिता यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी झालेल्या कार्यक्रमात त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 17 नोव्हेंबरला मुसळधार पावसामुळे चेन्नईवर पुराचे संकट कोसळले होते, त्यावेळी युनूसने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सहकाऱ्यांच्या मदतीनं 1500 जणांचे प्राण वाचवले होते.
  • 2 डिसेंबरलाही चेन्नई पाण्याखाली गेली होती, त्यावेळी 600 जणांना त्यानं वाचवलं होते.

‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या पहिल्या यादीत पुणे आणि सोलापूर :

  • देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मागे टाकून पुणे आणि सोलापूर या शहरांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या पहिल्या यादीत स्थान पटकावले आहे.
  • शहरांना आधुनिक बनवून या योजनेतील 20 शहरांची यादी केंद्रीय शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केली. त्यात नवी दिल्ली, भुवनेश्वर, गुवाहाटी, अहमदाबाद या प्रमुख शहरांचा समावेश आहे.
  • केंद्र सरकार या योजनेसाठी 97 शहरांची निवड करणार आहे, त्यासाठी सुमारे 47 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • पहिल्या यादीतील शहरे
  • भुवनेश्वर, पुणे, जयपूर, सुरत, कोची, अहमदाबाद, जबलपूर, विशाखापट्टणम, सोलापूर, दावणगिरी, काकिनाडा, नवी दिल्ली, इंदूर, कोईम्बतूर, बेळगाव,उदयपूर, गुवाहाटी, लुधियाना, चेन्नई, भोपाळ.

आघाडीच्या श्रीमंतांमध्ये तीन भारतीय उद्योजक :

  • जगातील पन्नास आघाडीच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये मुकेश अंबानी, अझीम प्रेमजी आणि दिलीप संघवी या तीन आघाडीच्या उद्योजकांची नावे आहेत.
  • ‘वेल्थ-एक्‍स’ या संस्थेने ‘बिझिनेस इनसायडर’ या नियतकालिकाच्या सहकार्याने ही यादी तयार केली होती.
  • यात ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे चेअरमन मुकेश अंबानी 27 व्या स्थानी असून त्यांची संपत्ती 24.8 अब्ज डॉलरएवढी आहे.
  • ‘विप्रो’चे अझीम प्रेमजी आणि ‘सन फार्मा’चे दिलीप संघवी हे अनुक्रमे 43 व्या आणि 44 व्या स्थानी आहेत.
  • ‘मायक्रोसॉफ्ट’चे सर्वेसर्वा बिल गेट्‌स हे यादीत पहिल्या स्थानी असून, त्यांची संपत्ती 87.4 अब्ज डॉलर एवढी आहे.
  • स्पॅनिश उद्योजक अमानसियो ऑर्तेगा गाओना हे दुसऱ्या, तर वॉरन बफे तिसऱ्या स्थानी आहेत.

इम्रान फरहातची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :

  • पाकिस्तानच्या कसोटी संघातील सलामीचा क्रिकेटपटू इम्रान फरहात याने (दि.28) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
  • दुबईत होणाऱ्या मास्टर्स चॅम्पियन्स लीग (एमसीएल) स्पर्धेला (दि.29) सुरवात होत असून, त्यापूर्वीच त्याने निवृत्ती घेतली.
  • या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत.

स्थलांतरितांच्या मौल्यवान वस्तू डेन्मार्कमध्ये होणार जप्त :

  • सीरियन स्थलांतरितांच्या सर्व मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यास संमती देणारे वादग्रस्त विधेयक डेन्मार्कच्या संसदेने मंजूर केले आहे.
  • स्थलांतरितांकडून दहा हजार क्रोनरपेक्षा (1340 युरो, 1000 पौंड) जास्त असणारी संपत्ती पोलिसांना ताब्यात घेता येणार आहे.
  • गेल्या वर्षात डेन्मार्कमध्ये 21,000 स्थलांतरितांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे स्थलांतरितांच्या लोंढ्याचा अर्थव्यवस्थेवर संभाव्य परिणाम रोखण्यासाठी डेन्मार्कने हे पाऊल उचलले आहे, डेन्मार्कच्या संसदेत 81 विरुद्ध 27 अशा मतांनी यास मंजूरी मिळाली.

भारताला मालिका विजयाची संधी :

  • पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विजयासह मालिका जिंकण्याचा निर्धार केला आहे.
  • पहिला सामना 37 धावांनी जिंकून भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
  • दुसरा सामना जिंकल्यास सिडनीत अखेरच्या टी-20 त प्रयोग करण्याची भारताला संधी असेल.

जोकोवीच फायनलमध्ये :

  • जागतिक क्रमवारीत क्रमांक एकचा खेळाडू नोवाक जोकोवीचने आपला प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर याला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात हरविले.
  • महिला एकेरीच्या गटात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने पोलंडच्या एग्निएस्का रंदावास्का हिला हरवून 26 व्या वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची फेरी गाठली आहे.
  • स्पर्धेच्या लक्षवेधी लढतींपैकी असलेल्या पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये सर्बियाचा जोकोवीच आणि तृतीय मानांकित फेडररला 6-1, 6-2, 3-6, 6-3 असे हरवून 18 वे ग्रँडस्लॅम जिंकण्यापासून रोखले, जोकोवीचची लक्ष आता आठव्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या किताबावर आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.